काव्यशिल्प Digital Media: ताडोबा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label ताडोबा. Show all posts
Showing posts with label ताडोबा. Show all posts

Friday, September 28, 2018

1 अक्टूबर से फिर खुलेंगे ताड़ोबा के द्वार

1 अक्टूबर से फिर खुलेंगे ताड़ोबा के द्वार

Image result for ताडोबा होणार सुरुचंद्रपूर/प्रतिनिधी:
ताड़ोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प के द्वार 1 अक्टूबर से फिर शुरू होने जा रहे हैं. जिससे अब पर्यटक अगले वर्ष मानसून तक सफारी का भरपूर मचा उठा सकेंगे. मानसून के 3 महीनों जुलाई, अगस्त व सितंबर में व्याघ्र प्रकल्प को पूरी तरह से बंद कर दिया जाता है. हालांकि अच्छे रास्तों के चलते बफर जोन में कुछ स्थानों पर सफारी शुरू रखी गई थी. जबकि सम्पूर्ण कोअर क्षेत्र में पर्यटन बंद होने से पर्यटक पर्यटन का लाभ नहीं उठा पा रहे थे.
शुक्रवार से शुरू होगी तत्काल बुकिंग
सोमवार से ताड़ोबा अभयारण्य पर्यटकों के लिए शुरू हो रहा है. लिहाजा 3 दिन पूर्व शुक्रवार से तत्काल बुकिंग प्रारंभ हो जाएगी. साधारणत: ऑनलाइन बुकिंग के लिए 60 गाड़ियों का आरक्षण होता है. 6 प्रवेशद्वारों से प्रवेश दिया जाता है. सर्वाधिक गाड़ियां मोहुर्ली गेट से प्रतिदिन 32 वाहनों को प्रवेश दिया जाता है. कोलारा से 12, नवेगांव से 06, खुटवंडा से 04, झरी से 04, पांगडी से 02 वाहनों को प्रतिदिन प्रवेश दिया जाता है.
तत्काल बुकिंग के लिए कुल 18 गाड़ियों को प्रतिदिन प्रवेश दिया जाता है. इसमें मोहुर्ली से 08, कोलारा से 06, नवेगांव से 02,खुटवंडा से 02 वाहनों को प्रवेश दिया जाता है. सप्ताह में केवल मंगलवार को कोअर बफर में पर्यटन नहीं होता है. शेष दिनों के लिए अभयारण्य पर्यटन के लिए शुरू रहता है. सुबह 6 बजे और दोपहर 2.30 बजे 2 टाइम में प्रवेश दिया जाता है. साधारणत: 6 घंटे तक पर्यटक सफारी कर सकते हैं. प्रवेश शुल्क के रुप में 120 से 60 दिन पूर्व ऑनलाइन बुकिंग के लिए प्रतिवाहन 4,000 रूपये जो कि सोमवार से शुक्रवार तक लिए होता है. वहीं सप्ताहांत के दिन शनिवार और रविवार को प्रतिवाहन 8 हजार शुल्क लिया जाता है. 59 दिन पूर्व की बुकिंग के लिए सोमवार से शुक्रवार का शुल्क अग्रिम 1000 रूपये और शनिवार से रविवार का अग्रिम शुल्क 2000 रुपये लिया जाता है. तत्काल बुकिंग के लिए यह राशि 4,000 रुपये है.
(स्त्रोत;नवभारत)

Saturday, August 04, 2018

चंद्रपूर येथे जंगल सफारी डीपीआर तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट समवेत करार

चंद्रपूर येथे जंगल सफारी डीपीआर तयार करण्यासाठी टाटा ट्रस्ट समवेत करार

मुंबई/प्रतिनिधी:
 चंद्रपूर येथे जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पदमापूर येथे सल्लागार समितीने सुचविल्याप्रमाणे सफारीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या जंगल सफारीसाठी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा ट्रस्ट ला सोपविण्यात आले आहे. काल यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत ही सफारी तयार करण्यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता घेण्याची कार्यवाही करावी, प्रकल्पातील जी कामे तत्काळ सुरु करता येतील त्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घ्यावी, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून मंजूरी प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रकल्पाची माहिती देणारा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Sunday, July 29, 2018

Tigers of Chandrapur short film

Tigers of Chandrapur short film

implemented by Poonam and Harshawardhan 
Dhanwatey with their field team
Providing information/lalit lanjewar:(9175937925)
 29 july international tiger day special
The Chandrapur district of Central India is known for its tigers. Made famous by the Tadoba Andhari Tiger reserve, this region has had a dark history of Human - Tiger conflict. 2008 saw an unprecedented scale of attacks in this region, escalating to more than 40 deaths over a span of 3 years.
The reasons for conflict became clearer with a in-depth study of these conflict cases by conservationists of Tiger Research and Conservation Trust (TRACT). What they found was surprising and illuminating. More than 50 tigers live outside the protective areas 
This short film by Evanescene studios gives an insight into the life of local communities co-habiting with tigers and leopards in fringe forests of Tadoba Andhari Tiger Reserve; the reasons for conflict and its mitigation as recognised and implemented by Poonam and Harshawardhan Dhanwatey with their field team; the interventions by the Central and State government through policies and benefits to local communities of Chandrapur.
(This video has been uploaded on Tiger Research and Conservation Trust India's YouTube account)




Monday, July 02, 2018

ताडोबा व्याघ्र प्रकल्प झाले बंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प झाले बंद

संबंधित इमेजनागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पट्टेदार वाघांचा हक्काचा अधिवास. या प्रकल्पात वाघांचे नैसर्गिक स्थितीतील दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटकांची वर्षभर रीघ लागते. पावसाळ्यात देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद केले जात असताना ताडोबा मात्र त्याला अपवाद होता. मात्र आता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने पावसाळी पर्यटन बंद करण्याचे कठोर निर्देश जारी केल्यामुळे १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. गेली काही वर्षे ताडोबातील प्रवेश ऑनलाईन झाले आहेत. यामुळे देशातील शेकडो पर्यटकांनी कित्येक दिवस आधीच ताडोबातील पावसाळी पर्यटनासाठी बुकिंग केले होते. याशिवाय ताडोबा आता पर्यटन नकाशावर असल्याने शेकडोंच्या संख्येत रिसॉर्ट ताडोबाच्या आसपास उभारले गेले आहेत. मोठा गाजावाजा करून ताडोबाचे जागतिक पर्यटन करण्याचा घाट घातला गेल्यावर आता अचानक ताडोबा पूर्ण बंदचा निर्णय झाल्याने रिसॉर्ट मालक आणि पर्यटक हिरमुसले आहेत. यंदा राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यासाठी येणारे मंत्री , लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना वाघांच्या दर्शनासाठी प्रकल्प सुरु ठेवण्याचा दबाव होता. मात्र एनटीसीए च्या निर्देशांमुळे यावर पूर्णविराम मिळाला आहे. याशिवाय ताडोबाच्या बाह्य भागात सुरु असलेले पर्यटन देखील बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने ताडोबातील एकूणच व्यवहार ३ महिने ठप्प होणार आहेत.

Friday, June 22, 2018

ताडोब्यात माधुरीच्या बछड्याला आवरता नाही आला बाटलीतून दुध पिण्याचा मोह

ताडोब्यात माधुरीच्या बछड्याला आवरता नाही आला बाटलीतून दुध पिण्याचा मोह

नागपूर/ललित लांजेवार:
ताडोबाच्या जंगलातील वाघांचे किस्से आजवर आपण बरेच ऐकले असेल.त्यात कधी जंगलातून मजुरांच्या जेवणाचा डबा पळवने,कधी मजुरांच्या कामावरचे घमेलेच पळवने तर कधी याच ताडोबाच्या वाघांचा आक्रमक पवित्रा ,तर कधी मायाळूपणा असे बरेच किस्से ताडोबात नेहमीच आपण बघितले आहेत.मात्र आता एक उपद्‌व्याप परत ताडोबाच्या आगाझरी बफर झोन परिसरात बघायला मिळाला."माधुरी" नावाच्या वाघिणीच्या बछड्याने १२ जून रोजी कमालच केली. ताडोबा फिरायला आलेल्या एखाद्या लहान बाळाच्या दुधाची बाटली ताडोबाच्या जंगलात पडली आणि हि हाती लागली माधुरीच्या बछड्याच्या हाती लागली.
पर्यटकाची चुकून पडलेली दुधाची बाटली माधुरीच्या बछड्याच्या हाती लागली अन या बाटलीने दूध पिण्याचा त्या बछड्याने हट्टच केला.बाटली हातात सापडताच बाटलीला खेळतच त्याने दूध बाटलीच्या बुचाला चोखून पिण्याचा सरावही केला. मात्र त्याला ते नेमके काय आहे समजल नाही. बारामतीच्या पर्यटकांना दोन दिवस सलग दिसलेले हे चित्र माणूस, निसर्ग आणि जनावरांमधील बदलाची प्रचिती देत होते.ताडोबा जंगलात अनुभवलेले हे क्षण ताडोबा फिरायला आलेल्या बारामतीकरांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. बारामतीचे हौशी निसर्ग छायाचित्रकार संदीप तावरे, सतीश परजणे, प्रवीण जगताप, अमर बोराडे, नितीन रणवरे, चेतन पाटील आदी चार पर्यटक काही दिवसांपूर्वी ताडोबाच्या जंगलात सफरीसाठी आले होते. ११ व १२ जून रोजी त्यांनी ताडोबाची सफर केली. त्या वेळी त्यांना "माधुरी' वाघिणीचे दर्शन झाले. माधुरी वाघीण आपल्या चार बछड्यांसह रस्त्यावरच बसलेली असल्याने शांतपणे अर्धा तास फक्त तिला न्याहाळण्याशिवाय या पर्यटकांच्याही हातात काही नव्हते. मात्र यादरम्यानची आश्‍चर्याची गोष्ट घडली. माधुरी व तिच्या बछड्यांचे फोटो व व्हिडिओ काढताना संदीप तावरे यांच्या लक्षात आले, की एका बछड्याला रस्त्याच्या कडेला अचानक एक दुधाची बूच असलेली बाटली सापडली आहे. त्याने ती तोंडाला लावल्यानंतर त्यातून थोडे आलेले दूध त्याने पिले असावे, त्यानंतर या बाटलीत काहीतरी गोड आहे असा त्याचा समज झाला आणि त्याने त्या बाटलीचे तोंड उघडण्यास सुरवात केली. बराच वेळ तो हे तोंड उघडत होता. त्याने एकट्यानेच त्या बाटलीच्या बुचाला तोंड लावले आणि दूध गट्टम केले, असे निरीक्षण तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंदवले आहे.असाच हा उपद्‌व्याप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.या संपूर्ण प्रकारावरून हि बाटली आली कुठून याचा शोध घेणे सुरु आहे.
 खरेतर ताडोबा जंगलात प्लॅस्टिकचे काहीही घेऊन दिले जात नाही, तेथील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपमध्येही त्याविषयी सक्ती केली जाते, मात्र अशा स्थितीत प्लॅस्टिकची बाटली तेथे आढळणे व ती वाघाच्या तोंडात जाणे हा एक चिंताजनक विषय वन्यप्राण्यासाठी आहे.

Friday, June 08, 2018

अधिवेशन काळात ताडोबा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी दबाव

अधिवेशन काळात ताडोबा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी दबाव

ताडोबा गर्दी साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
४ जुलैपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ही बाब लक्षात घेऊन काही रिसॉर्ट मालकांनी लोकप्रतिनिधींना हाताशी धरून दबाव तंत्राचा वापर करीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पावसाळय़ात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) पावसाळी पर्यटनाला स्पष्ट शब्दात नकार दिला असतानाही अशा पद्धतीचे प्रयत्न पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. बक्कळ नफा कमावण्यासाठी व्याघ्र संरक्षणाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे.
व्याघ्र संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता पावसाळय़ात दरवर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील पावसाळी पर्यटन बंद असते. मोहर्ली ते ताडोबा हा २० किलोमीटरचा रस्ता सोडला तर कोअर परिसरात पर्यटनाला पूर्णत: बंदी असते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसारच पावसाळय़ात पावसाळी पर्यटनाला मनाई करण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती न लक्षात घेता मुंबई, नागपूर व चंद्रपुरात बसलेले काही रिसॉर्ट मालक दबाव तंत्राचा वापर करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मान्सून पर्यटन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनातही मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील मंत्री व आमदारांची तसेच अतिविशिष्ट लोकांची ताडोबात गर्दी होईल. त्यामुळे व्यवसायात तेजी येईल, या उद्देशानेच ही रिसॉर्टचालकांची लॉबी कामाला लागली आहे. दरम्यान, या वृत्ताने अधिकाऱ्यांच्या वर्तुळात तीव्र नाराजी आहे. पावसाळय़ात शिकारी अधिक सक्रिय राहत असल्याने प्राण्यांच्या रक्षणाकडे अधिक लक्ष दिले जाते. अशाही स्थितीत केवळ मंत्री, आमदार व व्हीआयपींसाठी अभयारण्य खुले ठेवले जाणार असेल तर हा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. विशेष म्हणजे, नागपुरातील वन्यजीव विभागाच्या प्रमुखावरही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी दबाव असल्याची माहिती आहे.

Thursday, June 07, 2018

ताडोबातील काळ्या बिबट्याची दुसरी झलक सोशल मीडियावर व्हायरल

ताडोबातील काळ्या बिबट्याची दुसरी झलक सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर/ललित लांजेवार:
ताडोबा अभयारण्यातील कोळसा वनपरिक्षेत्रात बुधवारी पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे  दर्शन झाले आहे.
मंगळवारी २२/०५/२०१८ रोजी बेल्जीयमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट हे ताडोबा भ्रमंतीसाठी आले होते,जंगलात सफारी सुरु असतांना त्यांना कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी काळ्या बिबट्याने दर्शन दिले होते.त्या नंतर प्रसार माध्यमात या काळ्या बिबट्याची चांगलीच चर्चा रंगली होती.तेव्हा पासून ठीक 15 दिवसांनी परत या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली नावाचे जंगलप्रेमी हे कोळसा वनपरिक्षेत्रात जंगल भ्रमंती करत असताना त्याच परिसरात हा काळा बिबट पुन्हा एकदा दिसून आला आहे. 15 दिवस अगोदरच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बिबट्याचा रंग हा

पूर्ण काळा दिसून आला होता मात्र श्वेतकुमार यांनी टिपलेल्या छायाचित्रात या बिबट्याचा रंग हा गर्द काळा नसून त्याच्या अंगावर सामान्य बिबट्याच्या कातळीवरचे ठिपके दिसून येत आहेत.२०१४ साली ताडोबात काळा बिबट बछडा आढळल्याची नोंद आहे. मात्र त्या नंतर तब्बल ४ वर्ष नंतर या बिबट्याचे ताडोब्याच्या या जंगलात दर्शन दिले.त्यानंतर 15 दिवसाच्या अंतरावर पुन्हा एकदा या सेलिब्रिटी बिबट्याने आपले वेगळ्या अंदाजात झलक दिली आहे .त्यामुळे वन्य प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.
शिवणझरी भागात पाणवठ्यावर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हा दुर्मिळ आढळणारा काळा बिबट Black Panther पुन्हा याच ठिकाणी येण्याची शक्यता लक्षात घेत वनविभागाकडून या भागात आणखी कॅमेरा ट्रॅप लावले आहे मात्र हा बिबट वनविभागाच्या कॅमेऱ्यात न येता हौशी पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे,

निसर्गात रंगसंगतीला, त्यातही सरूपतेला (कॅमाफ्लॉज) अत्यंत महत्त्व असते. काळ्या बिबट्याला हा रंग फायद्याचा ठरतो. तिन्हीसांजा किंवा रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्या या प्राण्याला काळ्या रंगामुळे फायदाच होतो. अंधारात एकरूप होणाऱ्या रंगामुळे बिबट्या दिसणे कठीण होते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात तसेच आसाम मध्ये आढळतात,महाराष्ट्रात चांदोली अभयारण्यात त्याचे अस्तित्व जाणवले आहे, पण तो दिसलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्‍यातील माणगाव खोऱ्यात काही वर्ष पूर्वी काळा बिबट्या दिसला होता. आंबोली-चौकूळपर्यंत त्याचा वावर असल्याचे आढळले आहे. जुन्या नोंदींनुसार, आंबोली-महादेवगड परिसरात १६ मार्च १९३३ रोजी काळ्या बिबट्याचीशिकार झाली होती. त्यानंतर आता विदर्भातील ताडोबाच्या घनदाट जंगलात या काळ्या बिबट्याची अधिकृत नोंद झाली आहे.
आज परियंत "जंगलबुक' मालिकेच्या माध्यमातून बघिरा या नावाने काळ्या बिबट्याची ओळख होती मात्र मंगळवारी ताडोबात या काळ्या रंगाच्या बिबट्याने दर्शन दिल्यानंतर आता ताडोबात देखील एक बघिरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे गेल्या काही वर्षांत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वनविभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळांच्या प्रयत्नांमुळे ताडोबाकडे पर्यटकांचा कायम ओढा असतो. असे असतांना देखील ताडोबात आढळलेला हा काळ्या रंगाचा बिबट आणखी ताडोबात पर्यटकांची गर्दी खेचून आणेल हे मात्र नक्की ....


Thursday, May 31, 2018

ताडोबात वाघाची पर्यटक जीप्सीवर झडप

ताडोबात वाघाची पर्यटक जीप्सीवर झडप

नागपूर/ललित लांजेवार 
व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकात नेहमी उत्सुकता असते,त्यासाठीच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली जाते. पण जंगल सफारी करतांना हि सफारी आपल्या जीवावर बेतणार नाही याची पूर्ण खबरदारी करूनच हि सफारी केली पाहिजे.सध्या सोशल मिडीयावर एक विडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा विडीओ आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या आक्रमक पवित्र्याचा, 
चिमूर तालुक्याच्या हद्दीतील मदनापुर बफर झोन येथे काही दिवसा अगोदर पर्यटक सफारीचा आनंद घेत असतांना पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाले.या बफर झोनमध्ये सुख्या गवता लगत पर्यटकांना पट्टेदार वाघ दिसला वाघाला बघण्यासाठी जिप्सी थांबविण्यात आली. तितक्यात वाघाने धावत येत जीप्सीवर झडत घेण्याचा प्रयत्न केला मात्र जिप्सी चालकाच्या सतर्कतेने वाघाचा पर्यटक जीप्सिवरील हल्ला टळला.गेल्या काही दिवसांपासून हा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होत होता.मात्र याला दुजोरा मिळू शकत नव्हता. आता ही घटना घडल्याची पुष्टी वनविभागाकडून करण्यात आली असून व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बफर क्षेत्र कार्यालयाने या घटनेची गंभीर नोंद घेतली आहे. 
जंगल सफारी करतांना ज्या गेट वरून जंगल सफारी सुरु होते त्या ठीकानहून  पर्यटक,जिप्सी चालक व गाईड यांना विशेष सूचना केल्या जातात.मात्र या सूचनांचे पालन होत नसल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.नियमानुसार जंगल सफारी करतांना वाहन हे वन्य प्राण्यांपासून २० मीटर अंतरावर ठेवावे असा नियम आहे.मात्र या नियमाला राज्यातील व्याघ्र प्रकल्पात तिलांजली दिली जात आहे.
गेल्या काही दिवसा अगोदर असाच एक विडीओ वायरल झाला होता. ताडोबातील सेलिब्रिटी वाघीण असलेल्या माया वाघिणीने पर्यटकांना जवळून दर्शन दिले होते. मात्र तिच्या खुनखार नजरेसोबत तिची गाडीवर उडी घेण्याची तयारी बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. प्रसंगावधानाने जिप्सी चालकाने गाडी सुरु केली आणि समोर नेली. आणि जीव मुठीत घेऊन पर्यटनवारी करायला निघालेल्या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबा जंगलात सध्या उन्हाळयामुळे वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रकल्पात गर्दी दिसून येत आहे. पण अशातच ताडोबा वनपरिक्षेत्रातील अश्या घटनेने पर्यटक चांगलेच धास्तावले आहेत. 
या संपूर्ण प्रकारावरून व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाच्या बफर क्षेत्र कार्यालयाने पर्यटकांना कोअर व बफर क्षेत्रात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
        -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo











ताडोबाच्या ‘ब्लॅक पँथर’चा शास्त्रीय अभ्यासातून शोध

ताडोबाच्या ‘ब्लॅक पँथर’चा शास्त्रीय अभ्यासातून शोध


नागपूर/प्रतिनिधी:
ताडोबा जंगलात ब्लॅक पँथरदिसल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. या ब्लँक पँथरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वनविभागानेही आता या ब्लॅक पँथरचा शोध सुरू केला आहे. शास्त्रीय पद्धतीने हा शोध सुरू असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
वनामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांपूर्वीही रत्नागिरीच्या परिसरात हा ब्लॅक पँथर दिसला होता. आता ताडोबात दिसून आल्याची माहिती आहे. कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. काळा देह, मांजरीसारख्या मिशा आणि धीरगंभीर आवाज असलेला ब्लॅक पँथर ताडोबात खऱ्या रूपात आला आहे. ही एक बिबट्याचीच जात आहे. शरीरातील काही हार्मोन्सच्या बदलांमुळे त्याच्या अंगावर काळे ठिपके उठतात. म्हणूनच याला काळा बिबट्या किंवा ब्लॅक पँथर म्हटले जाते, अशी माहितीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 
सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जंगल सफारीसाठी जगभरातून पर्यटक ताडोबाच्या अभयारण्याला भेट देतात. बेल्जियमचे पर्यटक जेन फ्रॅकोइस आपल्या कुटुंबासहित जंगल सफारीला गेले असता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिवणझरी परिसरात त्यांना याचे दर्शन झाले. पर्यटकांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कळवले आहे. २०१४ मध्ये ताडोबात काळा बिबट आढळून आल्याचीही नोंद आहे. मात्र, यानंतर ही दुसरीच नोंद असल्याचेही बोलले जात आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील परिसरात कास परिसरात अतिदुर्मिळ अशा काळ्या बिबट्याने दर्शन दिल्याची माहितीही सोशल मीडियावर यापूर्वी फिरली. उपलब्ध माहितीच्या आधारावर ब्लॅक पँथरचा शोध घेतला जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Tuesday, May 29, 2018

ताडोब्यात ५ वाघांचे एकत्र दर्शन

ताडोब्यात ५ वाघांचे एकत्र दर्शन

नागपूर/ललित लांजेवार:
घनदाट जंगल व पट्टेदार वाघांसाठी जगप्रसिध्द असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ५ वाघ पर्यटकांना एकत्र बघायला मिळाले.मंगळवारी सकाळच्या सत्रात सफारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोहुर्ली गेटवरून निघाले असता, ताडोबातील मोहुर्ली वनपरिक्षेत्रात तेथील पानवठ्या जवळ प्रसिद्ध वाघीण सोनम व तिच्या ४ पिल्लांनी पर्यटकांना एकाच वेळीस दर्शन दिल्याने पर्यटकात आनंद बघायला मिळाला.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोनम वाघिणीचा सांबारीचा शिकार करतांना एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. त्यानंतर हि सोनम बराच वेळ लुप्त झाली होती. मात्र पुन्हा महिना भरानंतर सोनम हि चर्चेत आली आहे. 
विशेष म्हणजे, सोनम वाघिण चार बछड्यांची आई आहे. ‘सोनमने’ पर्यटकांसमोर सुमारे १० ते १५ मिनिटे एकाच ठिकाणी दर्शन दिले.सध्या नवतपाच्या झळा व अतिउष्णता आहे,अश्या परिस्थिती जास्तीत जास्त वाघ हे पाणवठ्या नजीक राहणे पसंद करतात अश्यातच सोनम व तिचे पिल्ले देखील पाणवठ्याजवळ पाण्यात बसून गारव्याचा आनंद घेत होते.तेव्हा सोनमने डरकाडी देखील फोडली. याच कालावधीत पर्यटकांनी त्यांची मनसोक्त छायाचित्रे घेतली. अनेक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर किंवा सर्वसामान्य पर्यटकांनीही सोनमची माहिती जाणून घेतांना तिच्या पिल्लांची छायाचित्रे घेऊन जंगल भ्रमंतीचा मनमुराद आनंद लुटला. 
याच ताडोबात सेलिब्रेटी असणारी वाघीण माया हि आपल्या पिल्लांबरोबर दररोज पर्यटकांना दर्शन देत चर्चेत राहते.अश्यातच माया पाठोपाठ सोनमसुद्धा आपल्या पिल्लांबरोबर चर्चेत आली आहे.

ऑनलाईन बुकिंग असल्याने वर्षभर पर्यटक या ठिकाणी जंगल भ्रमंतीला येत असतात.तापमानात वाढ असो कि घट ताडोबात पर्यटकांची गर्दी ही कमी झालेली नाही.अश्यातच माया व सोनम यांचे आपल्या पिल्लांसोबत सहाजिक होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांना चांगलाच आनंद बघायला मिळत आहे.


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo


Thursday, May 24, 2018

ताडोबाच्या जंगलात आढळला काळा बिबट

ताडोबाच्या जंगलात आढळला काळा बिबट

नागपूर/ललित लांजेवार:
घनदाट जंगल व पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात बऱ्याच वर्षानंतर काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे, मंगळवारी २२/०५/२०१८ रोजी बेल्जीयमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट हे ताडोबा भ्रमंतीसाठी आले होते,जंगलात सफारी सुरु असतांना त्यांना कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी हा काळा बिबट आढळला. या काळ्या बिबट्याला सर्वप्रथम  जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट यांनी सगळ्यात आधी संध्याकाळी ५.१५ च्या दरम्यान पहिले व आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.त्यांच्या पाठोपाठ नागपूर वरून आलेले पर्यटक अमृत नाईक यांना देखील त्या काळ्या बिबटाचे अचूक दर्शन झाले.सन २०१४ साली ताडोबात काळा बिबट बछडा आढळल्याची नोंद आहे. मात्र नंतर हा बिबट कोणालाच दिसला नसल्याचे बोलले जात आहे,तब्बल ४ वर्ष नंतर या बिबट्याचे ताडोब्याच्या या जंगलात दर्शन दिल्याने आता त्यावरठाम पणे शिक्का मोर्तब करता आला आहे. 
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता नेहमीचे ठिपके दिसतात.
निसर्गात रंगसंगतीला, त्यातही सरूपतेला (कॅमाफ्लॉज) अत्यंत महत्त्व असते. काळ्या बिबट्याला हा रंग फायद्याचा ठरतो. तिन्हीसांजा किंवा रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्या या प्राण्याला काळ्या रंगामुळे फायदाच होतो. अंधारात एकरूप होणाऱ्या रंगामुळे बिबट्या दिसणे कठीण होते.  भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात तसेच आसाम मध्ये आढळतात,महाराष्ट्रात चांदोली अभयारण्यात त्याचे अस्तित्व जाणवले आहे, पण तो दिसलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्‍यातील माणगाव खोऱ्यात काही वर्ष पूर्वी काळा बिबट्या दिसला होता. आंबोली-चौकूळपर्यंत त्याचा वावर असल्याचे आढळले आहे. जुन्या नोंदींनुसार, आंबोली-महादेवगड परिसरात १६ मार्च १९३३ रोजी काळ्या बिबट्याची शिकार झाली होती. त्यानंतर आता विदर्भातील ताडोबाच्या घनदाट जंगलात या काळ्या बिबट्याची अधिकृत नोंद झाली आहे. 
आज परियंत "जंगलबुक' मालिकेच्या माध्यमातून बघिरा या नावाने काळ्या बिबट्याची ओळख होती मात्र  मंगळवारी ताडोबात या काळ्या रंगाच्या बिबट्याने दर्शन दिल्यानंतर आता ताडोबात देखील एक बघिरा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
  शिवणझरी भागात पाणवठ्यावर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हा दुर्मिळ आढळणारा काळा बिबट   Black Panther पुन्हा याच ठिकाणी येण्याची शक्यता लक्षात घेत वनविभागाकडून या भागात आणखी कॅमेरा ट्रॅप लावले असल्याचे समजते आहे, वाघांच्या मुक्त संचारामुळे गेल्या काही वर्षांत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वनविभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळांच्या प्रयत्नांमुळे ताडोबाकडे पर्यटकांचा कायम ओढा असतो. असे असतांना देखील ताडोबात आढळलेला हा  काळ्या रंगाचा  बिबट आणखी  ताडोबात पर्यटकांची गर्दी खेचून आणेल हे मात्र नक्की .....


-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

























Sunday, May 13, 2018

ताडोबात माया वाघिणीचा अनोखा अंदाज;व्हिडीओ व्हायरल

ताडोबात माया वाघिणीचा अनोखा अंदाज;व्हिडीओ व्हायरल

नागपूर/ललित लांजेवार:
कधी आपल्या पिल्लांसोबत तलावावर पाणी पिण्यासाठी आलेली माया तर कधी चितळाची शिकार करतांना पाठलाग करणारी,तर कधी बिनधास्त मुक्त संचार करणारी,तर कधी जीप्सितल्या  पर्यटकांची घाबर गुंडी करणारी ताडोबाची सेलिब्रेटी वाघीण माया तुम्ही नेहमीच बघितली असेल, वाघांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ताडोबाच्या घनदाट जंगलात शनिवारी म्हणजेच मातृ दिनाच्या पूर्व संध्येला माया हि वाघिन एका अनोख्या अंदाजात पर्यटकांना बघायला मिळाली. ताडोबाच्या जंगलात दुपारी बांबूंच्या वेढ्याने वेढलेल्या परिसरात माया वाघीण ही आपल्या दोन पिल्लांना स्तनपान करत असल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून ही माया  आपल्या दोन पिलांसोबत जंगल परिसरात भ्रमण करतांना दिसते आहे. या मुक्त भ्रमंतीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतात.मात्र शनिवारी ती आपल्या दोन पिल्लांना स्तनपान करताना पर्यटकांना दिसली. पर्यटकांनी देखील मायाला ह्या अंदाजात बघण्याचा मोह आवरता आला नाही.आणि गाडी थांबवून पर्यटकांनी व्याघ्र दर्शन केले.ह्या वाघीनीने गेल्या  डिसेंबर महिन्यात ताडोबा येथे २ पिल्लांना जन्म दिला होता.
त्यानंतर हि वाघीण ताडोबात चर्चेचा विषय ठरली आहे.  सध्या चंद्रपूरचे तापमान ४७ अंश  सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे.असे असले तरी देखील ताडोबात पर्यटकांची गर्दी ही कमी झालेली नाही.ऑनलाईन बुकिंग असल्याने दिवसेंदिवस पर्यटक या ठिकाणी जंगल भ्रमंतीला येत आहेत.अश्यातच मायाचा अंदाज पर्यटकांना चांगलाच आनंद देऊन गेला.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).



Wednesday, April 11, 2018

वाघिणीचा आक्रमक पवित्रा बघून पर्यटक घाबरले

वाघिणीचा आक्रमक पवित्रा बघून पर्यटक घाबरले

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:   
 वाघाच्या दर्शनासाठी पर्यटकांना उत्सुकता असते, नव्हे त्यासाठीच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी केली जाते. पण ताडोबातील माया वाघिणीने पर्यटकांना जवळून दर्शन दिले   तर खरे, मात्र तिच्या खुनखार नजरेसोबत तिची गाडीवर उडी घेण्याची तयारी बघून पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. प्रसंगावधानाने जिप्सी चालकाने गाडी सुरु केली आणि समोर नेली. आणि जीव मुठीत घेऊन पर्यटनवारी करायला निघालेल्या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.
जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबा जंगलात सध्या उन्हाळयामुळे वाघोबांचे दर्शन सुलभ झाले आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रकल्पात गर्दी दिसून येत आहे. पण अशातच ताडोबा वनपरिक्षेत्रातील एका घटनेने पर्यटक चांगलेच धास्तावले आहेत. या भागात टी-१२ या वनविभागाच्या दफ्तरी नोंद असलेल्या माया या वाघिणीने पर्यटकांना दर्शन दिले. ती दिसताच पर्यटक काही क्षण खुश झाले. पण जिप्सीमधील पर्यटकांना निरखून बघत दोन पावले मागे जात चक्क चढाईची तिने तयारी केली आणि पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. माया गाडीवर उडी घेण्याच्या तयारीत असताना गाडीत बसलेल्या पर्यटकांना चांगलाच घाम फुटला. मायाच्या मागे चालत येणाऱ्या बछड्यांसाठी कदाचित आईने मार्ग मोकळा करून दिला असेल. मात्र मायाचा आक्रमक मूड ओळखून जिप्सी चालकाने सफाईदारपणे वाहन पुढे नेले आणि दुर्घटना टळली. माया आणि बछडे यांचे हे कुटुंब पर्यटकांनी डोळ्यात साठवले. सध्या हा व्हिडीओ  हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवरून ताडोबात फिरताना पर्यटकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Tuesday, April 10, 2018

ताडोब्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू

ताडोब्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू

चंद्रपूर/रोशन दुर्योधन :

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहूर्ली वनपरिक्षेत्रात जंगलात लाकड आणि टेम्भूर फळ वेचण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला.  हि घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मोहूर्ली वनपरिक्षेत्रात घडली. शंकर मेश्राम वय ५० वर्षे असे या वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकर मेश्राम हे दररोज प्रमाणे मंगळवारी देखील जंगलात लाकूड व टेम्भूर फळ वेचण्यासाठी गेलेलं होते मात्र तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला.त्यांच्या गळयावर वाघाच्या हल्ल्याचे घाव असून वाघांची तब्बल अर्धा तास बसून त्यांच्या डाव्या हाताला फस्त केले,शंकर मेश्राम यांचे सोबर आणखी ४ लोक हे जंगलात होते.  मात्र ते वेगळ्या ठिकाणी होते,व ज्या परिसरात शंकर मेश्राम लाकूड आणायला गेले नेमका त्याच परिसरात वाघ हा दबा धरून बसला होता आणि त्याने हल्ला चढविला. 
मिळालेल्या माहितीवरून शंकर मेश्राम यांना त्याला २ मुलं एक मुलगीआहे. याआधी जवळच असलेल्या सीताराम पेठ गावात वाघाने एकावर हल्ला चढविला होता. सदर घटना माईन्स रोडपासून 1कि.मी अंतरावर घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी RFO सचिन शिंदे व RO राऊत आदीनी घटनास्थळी धाव घेतली.

Friday, April 06, 2018

चंद्रपूर तापले @४३ ;ताडोबातील पाणवठ्यावर वाघोबांची फॅमिली टूर

चंद्रपूर तापले @४३ ;ताडोबातील पाणवठ्यावर वाघोबांची फॅमिली टूर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ऊन्हाच्या वाढत्या तडाख्याने मानवासह वन्यजीवही मेटाकुटीला आले आहेत. राज्यभरात अनेक शहरात पारा चाळीशीपार पोहोचल्याने घामाच्या धारा निघत आहेत. चंद्रपूर जिल्हयातही उन्हाळ्याचे चटके बसायला लागले असून पारा ४३ अंशावर पोहचला आहे. कडक उन्हामुळे जंगलातील पाणवठे सुकल्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन विभागाने कृत्रीम पानवठे तयार केले असून या पाणवठयावर वन्य प्राण्यांनी गर्दी केली आहे.
ऊन्हाळ्यात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांच्या लकबी टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार व पर्यटकांनी ताडोबामध्ये गर्दी झाली आहे. कोळसी येथील एका पाणवठ्यावर पट्टेदार वाघीन आपल्या दोन छाव्यांसह पाणी पिण्याकरीता आल्याचे छायाचित्र हौशी पर्यटक आणि छायाचित्रकार श्वेतकमार रंगा राव (Mr. Swethakumar Ranga Rao) यांनी टिपले आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच चंद्रपूरमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असलयामुळे वन्य प्राण्यांसाठी वनविभागाला पाणवठयाची संख्या वाढवावी लागण्याची शक्यता आहे. अन्यथा वन्य प्राण्यांचा मोर्चा पाण्याच्या शोधासाठी गावाकडे वळेल आणि मानव विरुद्ध प्राणी असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Friday, February 23, 2018

 ताडोबातील नंदिनीचा मृत्यू

ताडोबातील नंदिनीचा मृत्यू

चंद्रपूर (ललित लांजेवार):
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २ वर्षीय नंदिनी नामक हत्तीनीचा गुरुवारी रात्री जर्जर आजाराने  मृत्यू झाल्याची घटना घडली.ताडोबातील या बाल हत्तीच्या जाण्याने ताडोबातील नंदिनीच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताडोबाचे आकर्षण हे वाघ जरी असले तरी मात्र मोहुर्ली प्रवेशद्वारावर हे हत्ती मात्र पर्यटकाचे मन जीकतात व  स्वागत करतात.गुरवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी सकाळीच वनविभागाचे बडे अधिकारी घटना स्थळावर दाखल झाले, मिळालेल्या माहितीवरून हर्पिस नावाच्या वायरसने नंदिनीचा मृत्यू झाल्याचे कडते आहे. याकरिता तिचे अवयव देखील फोरेन्सिक लेबोट्रीला पाठविण्यात आले आहे. वन्यजीव डॉक्टर्सच्या देखरेखीत मृत हत्तीवर पोस्टमॉर्टम होणार असून मृत्यूचे खरे कारण शनिवारी  पुढे येणार आहे.  याआधी देखील २०१४ मध्ये एका हत्तीचा मृत्यू झाला होता,या हत्तीच्या मृत्युमागे ताडोबाचे वातावरण कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आता या विषयाला वनविभागाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.


  

Sunday, February 11, 2018

फुलपाखरांचे जग ताडोबा :नक्की वाचा काय आहे

फुलपाखरांचे जग ताडोबा :नक्की वाचा काय आहे

फुलपाखरू साठी इमेज परिणामचंद्रपूर /प्रतिनिधी:
 वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे भावना शिकवणार आहे. त्यामुळे ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.
यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मनपा स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती ब्रिजभुषण पाझारे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, डॉ.किशोर मानकर आदी उपस्थित होते. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धतेसोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी बटरफ्लाय वर्ल्ड नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येणार आहे. येत्या दोन वर्षांत ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ राहील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार वाघांमुळे मिळणार आहे. आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणाऱ्या पर्यटकांना पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाप्रसंगी पद्मापूर, आगरझरी, अडेगाव, उडीयाटोला, मोहर्ली येथील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय वनअधिकारी शिंदे आणि सहकारी कर्मचाºयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
रोजगाराला चालना
फुलपाखरु प्रत्येकाच्या लहानातील आकर्षण असते आणि ते कधीच संपत नाही. अगदी १४ दिवसांचे जीवनक्रम असणारे फुलपाखरु जगाला आनंदाने जगण्याचे संदेश देते. या ठिकाणी हजारो फुलपाखरे जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. फुलपाखरु उद्यान व माहिती केंद्र व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र राहणार आहे. यातून पर्यटनाचा विकास होणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
असे आहे बटरफ्लाय वर्ल्ड
लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीची मांडणी बटरफ्लाय वर्ल्डमध्ये करण्यात आली. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार आहेत. फुलपाखरांच्या जीवनपटाची शास्त्रीय माहितीही उपलब्ध राहील. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार, लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकते पूल, मचान सवारी आदी सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावकऱ्यांकडून चालविला जाणार आहे.


Thursday, February 01, 2018

मित्रानेच केला मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार: ताडोबातील MTDC च्या रेस्टहाऊसमधील घटना

मित्रानेच केला मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार: ताडोबातील MTDC च्या रेस्टहाऊसमधील घटना

चंद्रपूर/प्रतीनिधी:
ps-durgapur-749
ताडोबामध्ये व्याघ्रदर्शनासाठी सोबत आलेल्या 21 वर्षीय मैत्रिणीवर चाकूचा धाक दाखवून सलग लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घटनेच्या १५ दिवसानंतर  बुधवारी उघडकीस आली. 
 17 जानेवारी रोजी ताडोबाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली येथील MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात  पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी मित्र शुभम काळबेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सध्यातरी आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात यात आहे .आरोपी व त्याची २१ वर्षीय मैत्रीन हे दोघेही १७ जानेवारीला ताडोबा भ्रमंती करण्यासाठी आले होते.ते MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये थांबले होते. दुपारी जेवण केल्यानंतर तो मैत्रिणीसह खोली क्रमांक १०१ मध्ये गेला या नंतर त्याने तिच्यावर चाकूचा धाक दाखावत अत्याचार केला. रात्रभर दोघेही तेथेच थांबले होते रात्रीही त्याने चाकूचा धाक दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकरणाचा विडीओ त्याने केला होता .18 जानेवारी रोजी दोघेही जेवण करून नागपूरला निघुन गेले दरम्यान त्याने पीडित मुलीला आपल्या सोबत लग्न करण्याचा अट्टाहास केला.  मात्र तिने नकार दिल्याने त्याने अश्लील चित्रफीत व्हायरल केली.  यावरून संपूर्ण घटनेचे बिंग फुटले.  घटनेच्या पंधरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी पीडित युवतीने दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून आरोपी शुभम काळबेंडे विरुद्ध तक्रार केली ,दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणी शुभम काळबेंडे यांचेवर कलम ३७६ (अ ) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Monday, January 08, 2018

 अन वाघोबा घेऊन पळाला मजुराचा घमेला

अन वाघोबा घेऊन पळाला मजुराचा घमेला

चंद्रपूर/प्रतिनिधी:   
आधी जेवणाचा डब्बा आणि मग मजुरांचा घमेला, हि  गोष्ट आहे जगभरात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा वाघ्र प्रकल्पातली, या अभयारण्यात सध्या वाघ हा शिकारीसोबत अन्य उपद्रव कामे सुद्धा करू लागला आहे, चक्क जंगलाचा राजाने जंगलात काम करणाऱ्या मजुराचा मजुरीच्या कामाचा घमेला घेऊन पडकाढल्याचे चित्र ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना बघायला मिळाले आहे.  
   
वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर येथील ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्याही लक्षणीय आहे. ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास चिमूर तालुक्यात यात असलेल्या नवेगाव गेटच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्यासाठी प्लास्टिक फायबरचे टोपले ठेवले होते. वाघ देखील त्याच परिसरात बसलेला होता.  अचानक  या वाघाने झुडपातून निघून चक्क टोपले तोंडात घेऊन पळ काढला. हा संपूर्ण प्रकार हा तेथिल पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला व तो सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आला,  देश-विदेशातील पर्यटक वाघाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे.  

ताडोबातील वाघांची संख्या वाढल्याने वाघाच्या वावरासाठी जंगल कमी पडू लागल्याचे वन्यजीव प्रेमींकडून ओरड केली जात आहे, वाघ जास्त असल्याने कुठल्या ना कुठल्या स्थळी वाघ पर्यटकांना दिसत आहे. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरू आहे, या कामावर गिट्टी मुरूम पसरवण्यासाठी मजूर काम करीत होते त्याच वेळेला हा संपूर्ण आश्चर्यकारक प्रकार घडला 

असाच काहीसा प्रकार महिनाभर पहिले मोहुर्ली परिसरात घडला होता, तेव्हा वाघाने तेथे ठेवलेल्या मजुराच्या  जेवणाच्या डब्यावर ताव मारला होता , तेव्हा या वाघाने जेवनाचे टिफीन तोंडात घेवून झुडपात निघून गेला होता.परत वाघाने दुसऱ्यांदा मजुरांचा घमेला पडविल्याचा प्रकार केल्याने जगभरात चर्चेचा विषय बनला आहे, या संपूर्ण प्रकारामुळे मजुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र या घटनेपासून पर्यटक अत्यंत आनंदी आहेत.याच कारणाने ताडोबात पर्यटकांचा कल वाढत चाललेला दिसत आहे  .

Tuesday, January 02, 2018

लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

लिंगभेदावरून कामाची समानता नाकारणाऱ्या वनविभागाच्या मुख्य वनसरंक्षकांसह संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडसोबत लिंगभेद करून कामाची समानता नाकारणाऱ्या मुख्य वनसरंक्षकांसह उपवनसंरक्षक व आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यप्राणी संरक्षण समिती अध्यक्षाविरुद्ध महिला गाईडने दूर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली. सदर मुख्य वनसंरक्षकांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणीही तक्रारीत केली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.
कामाच्या ठिकाणी महिला-पुरूष असा भेदभाव करता येत नाही. भारतीय संविधानाचे अनुच्छेद १४ नुसार लिंगभेद करता येत नाही. परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महिला गाईडना काम देताना महिला-पुरूष असा भेदभाव करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तक्रारीतून केली आहे.

यापूर्वीच केली होती तक्रार...
महिला गाईड म्हणून काम करताना या कामात आधीपासून असलेल्या पुरूष गाईडनी महिला गाईडना सन्मानाची व समानतेची वागणूक दिली नाही. या महिलांचा अपमान होईल, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी बोलणे व वागणे सुरू केले.
याबाबत त्याचवेळी भद्रावती पोलिसात तक्रार केली होती. तत्कालीन ठाणेदार यांनी याची दखल घेत पुरुष गाईडना याबाबत तंबी दिली होती. तरीही महिला गाईडना पुरूष गाईडसारखी वागणूक व कामे न दिल्याने या असमानतेबाबत १९ आॅगस्ट २०१६ रोजी मुख्य वनसरंक्षक कार्यालयाला लेखी पत्र दिले आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वारंवार या कार्यालयाशी व उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
उपसंचालक मानकर यांनी याबाबीची गंभीर दखल घेत असल्याचे सांगून आश्वस्त केले होते व पुरूष गाईडप्रमाणेच महिला गाईडनाही कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही, अशी माहिती अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.

श्रमिक एल्गारचे धरणे...
या प्रकाराच्या विरोधात महिलांनी सोमवारी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. महिला-पुरूष असा गैरकायदेशीर भेदभाव दूर करण्याबाबत श्रमिक एल्गारने वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी या महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय दर्जाच्या व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड असल्याचा अभिमान वनविभागाला असायला हवा होता. मात्र या महिलांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचा या महिलांचा आरोप आहे. धरणे आंदोलनात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार तसेच महासचिव घनश्याम मेश्राम व महिला गाईड सहभागी झाले होते.