সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, November 30, 2013

राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सुनील देशपांडे

राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सुनील देशपांडे

चंद्रपूर: येथील सुप्रसिद्ध नाट्यलेखक व नाट्य दिग्दर्शक पत्रकार सुनील देशपांडे यांची राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या (सेन्सार बोर्ड) सदस्यपदी निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, देशपांडेंनी नागपूर केंद्रावरून दिग्दर्शनाच्या पारितोषिकांची हॅट्ट्रिक साधली होती. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून या सदस्यत्वाकडे बघितले जात आहे. राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळात संपूर्ण राज्यातून ३४ सदस्य आहेत. यात विदर्भातील १0 जणांचा समावेश असून, यापूर्वी मंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांची निवड झाली. हे मंडळ तीन वर्ष कार्यरत राहणार असून, देशपांडेंनी आतापर्यंत आपुलकी, जीवंत मरण व आसरुबा या तीन नाटकांचे लेखन केले. सोबतच त्यांनी ९ नाटके आणि १२ एकांकिकांचे दिग्दर्शन केल्याने त्यांना ही संधी चालून आल्याची चर्चा रंगकर्मी व मित्रपरिवारात आहे. या खेळाला अंतच नाही, गेले द्यायचे राहूनी, आकाश शोधतांना, या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यांनी पारितोषिकांची हॅट्ट्रिक साधली. २00६ साली त्यांना 'वणी वैभव पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. मागील ३0 वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या देशपांडेंनी राज्य नाट्यस्पध्रेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे.

Friday, November 29, 2013

गृहमंत्र्यांचा पोलीसांवर वचकराहिलेला नाही

गृहमंत्र्यांचा पोलीसांवर वचकराहिलेला नाही

एकनाथरावखडसे
मुंबई, दि. 28 : गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राज्यातील पोलीसदलावर वचक राहिलेला नाही. महिला व लहान मुलांवरील अत्याचाराचे प्रमाणदिवसेंदिवस वाढतच असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोषपसरला आहे. अलिकडच्या काळातील अनेक घटना पाहता रक्षकच भक्षकबनल्याचे चित्र निर्माण झाले आहे अशी टिका विधानसभेतील विरोधी पक्षनेतेव भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. यासंदर्भातश्री.खडसे यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना राज्यातील पोलीसीअत्याचाराच्या घटनांबद्दल पत्र पाठवुन, पोलीसांना कायदा व सुव्यवस्थाराखण्यात आलेल्या अपयशाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. श्री.खडसेयांनी श्री.पाटील यांना पाठविलेले पत्र सोबत जोडले आहे....

Thursday, November 28, 2013

जंगल विदर्भात; फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात!

जंगल विदर्भात; फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात!


चंद्रपूर- संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जंगल चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. येथील जंगलव्याप्त परिसरामुळे अनेक प्रकल्प आजही रखडले आहेत. परिणामी, या दोन्ही जिल्ह्य़ाचा पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही. फॉरेस्ट लॅण्डच्या नावाखाली पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते वैदर्भियांच्या तोंडाला पाने पुसतात आणि आता फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात स्थापनेची घोषणा करून शासनाने विदर्भावर आणखी एक अन्याय केला आहे. असा आरोप र्शमिक एल्गार संघटनेच्या सर्वेसर्वा अँड. पारोमिता गोस्वामी यांनी आज बुधवार (२७ नोव्हेंबर) ला पत्रपरिषदेत केला.
यावेळी र्शमिक एल्गारच्या विजय सिद्धावार, प्रवीण चिचघरे, छाया सिडाम, संगीता गेडाम, गजानन सिडाम, लहू आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अँड. गोस्वामी म्हणाल्या, केंद्र शासनद्वारा संचालित देशातील महत्त्वाची ठरणारी चौथी फॉरेस्ट अँकेडमी सांगली जिल्ह्य़ात होत आहे. यापूर्वी शासनाने कोईंबतूर, देहरादून, हैद्राबाद येथे फॉरेस्ट अकॅडमीची स्थापना केली. आणि आता पहिल्यांदाच महाराष्ट्रात चौथी अकॅडमी होणार आहे.
असे असताना मात्र विदर्भातील लोकप्रतिनिधी गप्प बसले आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा विचार केल्यास सर्वाधिक जंगलव्याप्त परिसर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात ७0.0४ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्य़ात ३५.६४ टक्के, गोंदिया जिल्ह्य़ात ३५.0८ टक्के, नागपूर जिल्ह्य़ात २0.४५ टक्के, अमरावतीत २६.१0 टक्के वनजमीन आहे. विदर्भातील हे जिल्हे वनसंपदेने समृद्ध असताना केवळ १.६८ टक्के जंगल असणार्‍या सांगली जिल्ह्य़ात फॉरेस्ट अँकेडमी स्थापन करणे, कितपत योग्य असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शासनाला फॉरेस्ट अँकेडमी स्थापन करावयाची असेल तर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा विचार करावा, असेही त्या म्हणाल्या. चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, देशाच्या तुलनेत वाघाच्या संख्येत झालेली तुलनात्मक वाढ, देशासाठी गौरवाची बाब आहे. याच जिल्ह्य़ातील वरोरा भागात माळढोक हे दुर्मिळ पक्षी आढळून आले. शिवाय देशातील एकमेव साग संशोधन केंद्र येथेच असून ७0 हेक्टरवर वनराजिक महाविद्यालय असण्याचा मान याच जिल्ह्य़ाला दिला जातो. १९८८-९0 या कालावधीत वनपरिक्षेत्राधिकारी यांचे एका तुकडीचे प्रशिक्षण झाल्यानंतर हे प्रशिक्षण केंद्र राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आले. फॉरेस्ट अँकेडमीसाठी तयार संसाधन चंद्रपूर जिल्ह्य़ात असताना सांगली येथे अँकेडमी करणे ही बाब जिल्ह्य़ावरच नव्हे तर विदर्भावर अन्याय करणारी आहे. त्यामुळे शासनाने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ातील वनवैभवाचा विचार करून याच जिल्ह्य़ात फॉरेस्ट अँकेडमी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले असून विदर्भातील आमदार, खासदारांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. फॉरेस्ट अँकेडमीसाठी होणारी गुंतवणूक १00 कोटींच्या आसपास असणार आहे. शिवाय यासाठी आवश्यक असलेली ११ हेक्टर जमीन शासनाला सहज मिळू शकते. परिणामी, जिल्ह्य़ात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळेही फॉरेस्ट अँकेडमी येथेच करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Tuesday, November 26, 2013

 चंद्रपुर के चांदा पब्लिक स्कूल में 'इंटरव्यू विथ इंडियन दिवा-2013' प्रेरणात्मक कार्यक्रम में स्कूल के छात्रों ने ब्रह्मंड सुंदरी प्रतियोगिता में भारत का प्रतिनिधित्व करने वाली सुंदरी मानसी मोघे के साथ काफी समय बिताया. फुर्सत के  समय बच्चों को अपना 'ऑटोग्राफ' देती मानसी.                                                    
पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पुरूषांनी आपल्या हेकेखोरपणापायी नाकारलेलं स्त्रीचं प्रेम आणि त्यामुळे त्या महिलांची होणारी शोकांतिका व त्यातून पुरूषांनी आलेले नैराश्य मांडणारे 'पगला घोडा' हे नाटक यवतमाळच्या अस्मिती रंगायतन या संस्थेनं सादर केलं. अशोक आष्टीकर यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाचा मराठी अनुवाद प्रख्यात अभिनेते अमोल पालेकर यांनी केला आहे. मुळातच कठीण असलेली ही संहिता प्रत्यक्षात रंगमंचावर सादर करणे खरे तर कसोटी ठरते. परंतु अशोक आष्टीकर यांनी या कसोटीला उतरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. प्रतिकात्मक अशा कथानकाला दिग्दर्शनाची उत्तम जोड मिळाल्याने हे नाटक रसिक प्रेक्षकांना आनंद देणारे ठरले.
एका स्मशानात दोन तास घडणारे हे नाटक सुरूवातीला फार वेग पकडत नाही. त्यामुळे रसिकांनाही रंगमंचावर काय घडते आहे, हे कळत नाही. एका अनोळखी मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी रात्रीच्यावेळी स्मशानात आलेले कार्तिक (राजन टोंगो), शशी (सौरभ अंजनकर), हेमंत (केतन पळसकर) व लालू (अशोक आष्टीकर) हे चौघेजण चिता संपूर्णपणे जळण्याची वाट पाहत त्याच ठिकाणी एका चबुतर्‍यावर बसतात. लालूने सोबत दारूच्या बाटल्या आणलेल्या असतात. त्यामुळे एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे गप्पांचा फड रंगतो. गप्पांच्या ओघात प्रत्येकाला आपली प्रेमकथा आठवते. ते सर्वजण आपापल्या आयुष्यात आलेल्या ुमुलींचे प्रसंग एकमेकांशी शेअर करतात. हेकेखोर स्वभावामुळे स्त्रीला नाकारण्याचं दु:ख प्रत्येकाच्या कथेतून व्यक्त होतं. स्वीकारल्यानंतर आयुष्य किती सुंदर झालं असतं, याची जाणिवही यावेळी सर्वांना होते. हीच या नाटकाची कथा.
गेली अनेक वर्षे नाटकाशी जुळून असलेल्या अशोक आष्टीकर, राजन टोंगो यांनी आपल्या भूमिका सर्मथपणे पार पाडल्या. सौरभने साकारलेला शशीही उत्तम होता. केतन पळसकर मात्र अभिनयात किंचीत मागे पडला. प्रेमकथा सांगताना प्रत्येक प्रेयसीची भूमिका मुक्तीका वाटखेडकर हिने साकारली. तिने दज्रेदार अभिनयातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. नाटकाचा विषय जड असला तरी प्रेक्षक मात्र अखेरपर्यंत नाटकात रममाण झाले, हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. अशोक आष्टीकर, राजन टोंगो, मुक्तीका वाटखेडकर यांच्यासह अन्य कलावंतांनीही प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवले. उत्तम संवादफेक, आंगिक अभियन यातून हे नाटक अधिक फुलत गेले. या नाट्यकृतीच्या सादरीकरणाला अधिक वाव होता. कमकुवत प्रकाश योजना या नाट्यकृतीतील मोठी उणिव होती. या नाटकाला सिद्धार्थ जयस्वाल यांनी संगीत दिले. अशोक कार्लेकर यांनी प्रकाश योजना सांभाळली. निरज खराबे, किशोर माहुरे यांचे नेपथ्य, तर रंगमंच व्यवस्था मंगेश इंगळे, अंकुश पांडे, भूषण जोशी यांनी सांभाळली. वेशभूषा निवेदिता आगलावे यांची होती.
 विवेकहीन कृत्य : महिला लैंगिक अत्याचाराला बळी

विवेकहीन कृत्य : महिला लैंगिक अत्याचाराला बळी

 विवेकहीन कृत्य   महिला लैंगिक अत्याचाराला बळी

महिला सुरक्षेसाठी शासनकर्ते कडक धोरण, कायद्याच्या अंमलबजावणीचा कांगावा करीत असले, तरी राज्यात दररोज 44 महिला बलात्कार, अपहरण, पती व नातेवाइकांच्या छळाने ग्रस्त असल्याचे वास्तव पुढे आले आहे. राजधानी मुंबईत चार, तर उपराजधानी नागपुरात दररोज एक महिला अत्याचाराची बळी ठरत आहे. राज्यात दररोज पाच महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

मानवी संवेदना बोथड झाल्याचे चित्र स्पष्ट करणारी महिलांच्या अत्याचाराबाबतची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केली. महिलांवरील अत्याचारात सहाव्या क्रमांकावर असले, तरी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे चित्र आहे. कायदे कडक करूनही वर्ष 2011च्या तुलनेत 2012 मध्ये दररोज अत्याचारग्रस्त महिलेच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. 2011मध्ये राज्यात 15 हजार 728 महिलांच्या अत्याचाराबाबत तक्रारींची नोंद केली होती. पुढच्याच वर्षी यात 625 अत्याचारग्रस्त महिलांची वाढ झाली. महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य सरकारच्या योजनांना समाजातील पाषाणांनी धक्का लावला आहे. पोलिसांच्या संवेदनशीलतेबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अनास्था, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे 2012 मध्ये राज्यात दररोज पाच महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद आहे. राज्यात वर्षभरात 1829 बलात्कारांची, 1140 अपहरण, हुंडाबंदी असतानाही 329 आणि पती व नातेवाइकांकडून छळाची 7 हजार 15 प्रकरणांची नोंद आहे. 2011 च्या तुलनेत ही आकडेवारी थोड्याफार फरकाने अधिक आहे. महिलांसाठी कायदे असल्यानंतर या आकडेवारीत घट होण्याची अपेक्षा केली जात असताना त्यात वाढ होणे हे राज्यातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे. राज्यातील महिला सुरक्षित नसल्याचेच हे द्योतक असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अधिका-याचे विवेकहीन कृत्य  
शासकीय सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत सर्वच ठिकाणी रंगेल कारनाम्याने वादग्रस्त ठरलेले येथील जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) विवेक बोंदरे यांच्या कृत्याचे चंद्रपुरातही दर्शन झाले आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ग्रामसेवक संघटनांनी कंबर कसली आहे.

राजुरा तालुक्यातील हरदोना येथे कार्यरत ग्रामसेविकेने दोन महिन्यांपूर्वी तिचे पती यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असल्याने त्याच जिल्ह्यात बदलीची मागणी केली. ३१ सप्टेंबरला बोंदरे यांनी कार्यालयात बोलाविल्यावर आपली नियुक्तीच नियमबाह्य असल्याचे सांगून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. हे टाळण्यासाठी लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. यापूर्वी अहमदनगर, वर्धा आणि सावली येथे कार्यरत असताना महिला कर्मचाèयांना शारिरिक सुखासाठी त्रास दिल्याचा आरोप झाला होता. वर्धा येथील प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच चंद्रपुरात ङ्केब्रुवारी २०१३ मध्ये लोहारा जंगल परिसरात रंगेल कृत्याची घटना उघड झाली होती. मात्र, तेव्हा तक्रारीसाठी कुणी पुढे न आल्याने प्रकरण दबले. आता तब्बल १० महिन्यांनी महिला ग्रामसेविकेने झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा, यासाठी रामनगर पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे होणारी ही बदनामी टाळण्यासाठी श्री. बोंदरे यांनीही ही तक्रार खोटी असल्यासंदर्भात प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सत्य काय, हे उघड करण्यासाठी पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर कारवाईचा मार्ग मोकळा होईल.


बोंदरेंच्या चौकशीसाठी महिला समिती

चंद्रपूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) विवेक बोंदरे यांनी लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप एका ग्रामसेविकेने केल्यानंतर चौकशीसाठी महिला समिती गठित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांनी दिली. या समितीत आठ महिला आणि एक पुरुष अधिकारी असून, येत्या दोन दिवसांत अहवाल सादर होणार आहे. या अहवालानंतर जिल्हा परिषद प्रशासन पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविण्यात येईल.


आमदार मुनगंटीवार गृहमंत्र्यांना भेटणार
उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक बोंदरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार मंगळवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार आहेत. ग्रामसेविकेच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, ग्रामविकास मंत्री उपबल्ध न झाल्याने प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.



मनसेचे जिल्हाधिका-यांना निवेदन
महिला कर्मचाèयांना शारिरिक सुखासाठी त्रास देणाèया विवेक बोंदरे यांना सेवेतून बडतङ्र्क करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने जिल्हाधिकाèयांमाङ्र्कत ग्रामविकासमंत्र्यांना पाठविले. या निवेदनात एक महिन्याच्या आत बोंदरे यांच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा सचिव राजू कुकडे, बळीराम शेळके, संदीप सिडा, भरत गुुप्ता, अर्चना डोंगरे, माया मेश्राम, पियूष धुपे, सुजय अवधरे, सुरेश रविदास उपस्थित होते.


ग्रामसेवक संघटनेचे निदर्शने
शारिरिक आणि आर्थिक मागणीसाठी ग्रामसेवकांना त्रस्त करणाèया विवेक बोंदरे यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्हाभरातून आलेल्या ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. बोंदरे यांनी रुजू झाल्यापासूनच कर्मचाèयांना त्रास देणे सुरू केले असून, दौèयादरम्यान ग्रामसेवकांना धमकावणे, बदली करून देण्यासाठी पैशाची मागणी करणे, महिला कर्मचाèयांकडे वाईट भावनेतून बघणे, आदी कारनाम्यांचा निषेध करण्यात आला.

३ डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे यांच्यावर दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे २ डिसेंबर रोजी पंचायत समिती स्तरावर निषेध नोंदविण्यात येणार असून ३ डिसेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.


महिला तक्रार कमेटीची स्थापना करण्यात आली आहे. सदर प्रकरण चौकशी कमेटीकडे सोपविण्यात आले आहे.चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- संपदा मेहता
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, चंद्रपूर

Monday, November 25, 2013

रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'

रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'

'चिंधी बाजार' हे नाटक रविवारी सकाळी ११.३० वाजता चंद्रपूरच्या नवोदिताने सादर केले. या नाटक बघण्यासाठी हाउसफुल गर्दी होती. संपूर्ण नाटक बघितल्यानंतर कथेचा मर्म समजाला. गोरगरिबांची व्यथा हृदय हेलावणारी आहे. नूतन धवणे यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. कसं काय हाय…। बर हाय म्हणत नाटकात खलनायक प्रशांत कक्कड यांनी विनोदी रूपाने हसू फुलविले. महात्म्याची छायाचित्रे विकणारा तरुण साम्यवादी विचाराचा भावाला. कायद्याची भाषा आणि बाबासाहेबाचे संविधान तो पटवून देत होता. नाटकाचे दिग्दर्शक प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांनी छोटीशी भूमिका सादर करीत कलाकृतीला जोड दिली. लेखक हेमंत मानकर यांच्या कथेला सर्वच कलावंतानी न्याय दिला. शिवाय हे नाटक संगीत आणि प्रकाश योजना, स्टेज सजवट यामुळे अधिक सरस ठरले…. एका शब्दात सांगायचे म्हणजे… रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'     

Sunday, November 24, 2013

नव्या वळणाचं 'साटंलोटं'

नव्या वळणाचं 'साटंलोटं'

कामानिमित्त एकत्र आल्याने वाढलेली सलगी. त्यानंतर स्वत:ला सावरूनही एकमेकांच्या प्रेमात पडलेल्यांचे मानसिक द्वंद आणि आपल्या आई, काकावर जिवापाड प्रेम करणार्‍या या युगलाने भावी आयुष्यासाठी आपल्यासोबत त्यांच्याही लग्नाचा घातलेला घाट अशा काहीशा विचित्र वळणावर येऊन ठेपणारे 'साटलोटं' हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पार पडले. रत्नाकर मतकरी यांची कलाकृती असलेल्या या नाटकाचे सादरीकरण यवतमाळच्या सिद्धीविनायक प्रतिष्ठानने केले. पूर्वार्धात थोडे रटाळ वाटणारे कथानक नंतरच्या दोन-तीन प्रवेशानंरत मात्र वेग घेते. पुढे दुसर्‍या अंकानंतर मात्र ते मुळ धरत जाते. सर्व काही ठिक चालले असताना दुसर्‍या अंकात अचानकपणे बदललेला क्लायमॅक्स, त्यामुळे निर्माण झालेली भावनांची वादळे आणि नाटकातील 'उर्मी'ने आपल्या स्वभानुरूप सावरलेली परिस्थिती व त्यामुळे नाटकाचा झालेला सुखांत शेवट, असेच या नाटकाचे थोडक्यात वर्णन करावे लागेल.

विधवा-विधुरांच्या पूनर्वसनाचा काहीसा संदेश देणारे हे नाटक. रोटी-बेटीच्या सामाजिक व्यवहारातील साटंलोटंचा आधार घेत नाटककाराने उभारलेल्या प्रतिमा आणि त्यांना रंगभूमिवर न्याय देण्याचा हा सिद्धीविनायकचा प्रयत्न तसा कौतुकास्पद राहिला. नव्या जुन्या कलावंतांच्या साथीने सादर केलेला हा प्रयोग काही तांत्रिक दोष वगळता तसा यशस्वीच ठरला. अवंतिकाच्या मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या कल्पना जोशी यांनीही आपल्या परिने भूमिकेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, उर्मीची भूमिका साकारलेल्या अपूर्वा बेनोडकर या नवोदित कलावंताने हे नाटक बरेच तोलून धरले. अपूर्वाची रंगमंचावरील धिटाई, अवांतिकासोबतच्या संवादात तिच्यावर केलेली मात, आपले म्हणणे कधी लडीवाळपणे, कधी रागाने, तर कधी आग्रहाने पटवून देताना कलावंत म्हणून तिचा लागलेला कस प्रेक्षकांना भावला. संजय माटे यांनी साकारलेली देसाईची भूमिकाही कसदार ठरली. राहूल रेणकुंटलवार या युवा कलावंताने साकारलेली रमोलची भूमिका अधिक सकस झाली असती तर, नाटकातील रंग पुन्हा गहिरा झाला असता. अवांतिकाच्या घरात अध्येमध्ये डोकावणारी आणि आपले दु:ख मांडणारी मैत्रिण नेहाच्या भूमिकेत असलेल्या अपूर्वा बेनोडकर यांनाही बराच वाव होता, पण तो कमी पडल्याचे दिसले. पहिल्या अंकात आणि सुरूवातीच्या एक-दोन प्रवेशात थोडी संकोचलेली कलावंतांची अवस्था नंतरच्या दुसर्‍या अंकात सावरल्याचे प्रयोगात दिसले. 'साटलोटं' हे नाटकाचे नाव असल्याने अखेरच्या गोड प्रसंगातील छायाचित्रणाच्या क्षणी ते स्पष्ट करण्यास दिग्दर्शकाला बराच वाव होता. पण ती संधी घेता आली नाही. सर्वच कलावंतांचे पाठांतरण उत्कृष्ठ असले तरी, काही प्रसंगात पात्रांच्या शब्दोच्चरणातील चुका वगळता नाटक सुंदरच झाले. अशोक कार्लेकर यांनी प्रकाश योजनेची बाजू सांभाळली. या सोबतच, कल्पना जोशी (दिग्दर्शन), विनोद नायडू-धनंजय जोशी (नेपथ्य), प्रा. चंद्रशेखर कुडमेथे-विशाखा जोशी (संगीत), संजय उइके-अभिषेक यादव (रंगमंच व्यवस्था), बासुरी तिवारी (वेषभूषा), वैशाली माटे (रंगभूषा), प्रसाद देशपांडे-ओम जोशी (पार्श्‍वगायन), प्रविण पेशवे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.

Saturday, November 23, 2013

पॉलिटेक्निकचा पेपर फुटला,  4 डिसेंबर रोजी परीक्षा

पॉलिटेक्निकचा पेपर फुटला, 4 डिसेंबर रोजी परीक्षा

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण शाखेचा मॅथेमॅटिक्स 1 चा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. आज होणारा या विषयाचा पेपर, परीक्षा विभागाने रद्द केला . हा पेपर शुक्रवारी रात्रीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब परीक्षा नियंत्रकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता या विषयाचा पेपर 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं औरंगाबाद पॉलिटेक्निक विभागाने जाहीर केलंय. तंत्रशिक्षण शाखेच्या औरंगाबाद विभागानं या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवलीय.
३० नोव्हेंबरपासून चंद्रपुरात शिर्डी के साईबाबा

३० नोव्हेंबरपासून चंद्रपुरात शिर्डी के साईबाबा


चंद्रपूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनावर आधारित शिर्डी के साईबाबा हे महानाट्य येत्या ३० नोव्हेंबरपासून तीन दिवस चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा ते १० वाजेपर्यंत चालणा-या या नाटकात साडेतीन हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. संस्कार मल्टी सव्र्हिसेसद्वारा प्रस्तुत, आसावरी तिडके निर्मित हे महानाट्य नटराज सांस्कृतिक कला केंद्र आणि पीक प्लॅनेटच्या वतीने सादर करण्यात येईल. संपूर्ण वैदर्भीय २०० कलावंत यात कला सादर करतील.
इंदिराजींचा जीवनपट सांगणारा प्रियदर्शिनी चौक

इंदिराजींचा जीवनपट सांगणारा प्रियदर्शिनी चौक

देवनाथ गंडाटे 
चंद्रपूर, ता. २२ : बसगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी वाहकाला पाण्याच्या टाकीजवळ थांबवा, असे सांगतात. गेली अनेक वर्षे पाण्याच्या टाकीमुळे प्रसिद्ध झालेला हा प्रियदर्शिनी चौक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवनपट सांगतोय. सांस्कृतिक सभागृह, मुख्य डाकघर, बसथांब्यामुळे हा चौक नेहमीच गर्दीने ङ्कुललेला असतो.

शहरातून नागपूर, मूलकडे जाताना जटपुरा गेट ते बसस्थानक मार्गावर असणारा हा प्रियदर्शिनी चौक. शहरात पाणीपुरवठा योजना आली, तेव्हा इथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. तेव्हापासून या चौकाची पाण्याची टाकी चौक अशी ओळख झाली. पूर्वी इथे पथकर नाका होता. दुर्गापूर, सिनाळा, भटाळी, चिचपल्ली येथून भाजीपाला विक्रीसाठी येणारे विक्रेते या नाक्यावर शुल्क भरून पावती घेत असत. पूर्वी या भागात केवळ बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मुख्य डाकघर होते. याच परिसरात हवेली हॉटेल होते. ते त्याकाळी प्रसिद्ध होते. काही काळाने हॉटेल गेले. पण, त्याजागी आज हवेली कॉम्प्लेक्स उभे झाले. पेट्रोलपंप, मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखासुद्धा या चौकात होती. मागील काही वर्षांपूर्वी या चौकात माजी पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांचा पुतळा साकारण्यात आला. त्याचे भूमिपूजन १८ ङ्केब्रुवारी १९८७ मध्ये झाले. पुतळ्याची स्थापना झाल्यानंतर तिथे सौंदर्यीकरण करण्यात आले. २००१ मध्ये शेजारीच इंदिराजींच्या नावे सांस्कृतिक सभागृहाची स्थापना करण्यात आली. समोरचा परिसर सौंदर्यीकरण करून त्यांचा राजकीय जीवनपट दाखविण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर बैलगाडीच्या चाकाची रचना करण्यात आली आहे. ती भारतीय शेतकèयांचे प्रतीक असून, इंदिराजींचे शेतकèयांवरील प्रेम दर्शविते. षटकोनी आकाराच्या ६७ ङ्करशा लावण्यात आल्या आहेत. त्या इंदिराजींच्या ६७ वर्षांच्या जीवनकाळातील आठवणी करून देतात. त्यातील लाल रंग लाल किल्ला, तर हिरवा रंग देशाच्या समृद्धीचे प्रतीक आहे. ङ्कुलझाडांच्या कुंड्यांनी परिसर सजविण्यात आला असून, त्यात इंदिराजींच्या २० कलमी कार्यक्रमाची आठवण करून देते. येथे अशोकाची वृक्षे आहेत. महान सम्राट अशोकाच्या समृद्ध कार्यकाळाचे प्रतीक म्हणून ते लावण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी पुतळ्यावर दोन वीजदिव्यांचा प्रकाश पडतो. त्यातून महात्मा गांधीजींची प्रेरणा आणि पंडित नेहरूंचे मार्गदर्शक म्हणून स्थान दर्शविते. चबुतèयावर २० आडव्या पट्ट्या आहेत. या श्वेत रंगाच्या पट्ट्या २० वर्षांच्या राजकीय जीवनाचे द्योतक आहेत. चबुतèयावर दाखविण्यात आलेले स्मृतिचिन्ह इंदिराजींच्या प्रमुख घटना सांगतात. यात आशियाड, सातवी अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षस्थान, राष्ट्रीय एकता, विश्वशांती, बालवीर चक्र पुरस्कार, राष्ट्रकुल शिखर परिषद या घटनांचा समावेश आहे.

Friday, November 22, 2013

फोटो स्टुडिओ अन् चष्माघरांचा छोटा बाजार

फोटो स्टुडिओ अन् चष्माघरांचा छोटा बाजार

देवनाथ गंडाटे सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूरता२१ शहरात कुणालाही पासपोर्ट फोटो काढायचा असो कीडोळ्यांसाठी चष्माते मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे छोटा बाजारस्वातंत्र्यपूर्व काळात येथे भाजीबाजार भरायचाकिराणा दुकाने आणि सरपणगवतासाठी हा चौक प्रसिद्ध होताकाळाच्या ओघात भाजीबाजार बंद झालामात्रचौकाची छोटा बाजारङ्क अशी ओळख कायम राहिली.
गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर असलेल्या छोटा बाजार चौकात १९९० पर्यंत बाजार भरायचातेव्हा शहरातील नागरिक येथे भाजी खरेदीसाठी यायचेशेजारीच एक विहीर होतीत्या काळात शहरात नळयोजना नव्हतीत्यामुळे इथल्या गोड पाण्याच्या विहिरीची ख्याती होतीकाही काळानंतर ती विहीरसुद्धा बुजली७० वर्षांपूर्वी जानबाजी मोगरे यांनी या चौकात आशा फोटो स्डुडिओची स्थापना केलीत्यांच्यापूर्वी विश्वेजवाररंगारी आणि दीपक फोटो स्टुडिओ होतेमात्रशहराच्या मध्यवर्ती भागातील छोटा बाजार चौकातील मोगरे यांच्या स्टुडिओने गर्दी खेचलीपुढे जानबाजींचे पुतणे भालचंद्र मोगरे यांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून कॅमेरा हाती घेतलाआता भालचंद्र मोगरे यांचे वय ७५ वर्षे आहेतत्यामुळे त्यांचा व्यवसाय मुलगा सांभाळतोयगेल्या १० वर्षांत या चौकात चार फोटो स्टुडिओ स्थापन झालेया चौकाने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट ते कलर असा प्रवास अनुभवला आहेभालचंद्र मोगरे यांचे आजोबा धोंडोबाजी मोगरे व हजारेंची मिठाईची दुकाने प्रसिद्ध होतीसायकलघड्याळ दुरुस्तीचे दुकानसुद्धा या चौकात होतेआता ही दुकाने बंद पडलीतवडाचे झाड आणि कुंभार मोहल्ला ही छोटा बाजार चौकाची आणखी एक ओळखया वडाच्या झाडाखाली गत ४० वर्षांपासून विड्याच्या पानाची विक्री होतेमोतीराम पेटले यांनी सुरू केलेला व्यवसाय पुढे सुधाकर पेटले आणि आता त्यांचा नातू प्रवीण पेटले सांभाळत आहेझाडाखाली शंकर महादेवाच्या नंदीबैलाचे छोटेसे मंदिर आहेया चौकात मिळणारी मामा जिलेबी सर्वदूर प्रसिद्ध आहे.
छोटा बाजार चौकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे नेत्ररोगाचे क्लिनिक आणि चष्माघरे आहेतत्यांची संख्या जवळपास १० आहेत्यामुळे डोळ्यांची तपासणी आणि चष्मा खरेदीसाठी याच चौकात यावे लागतेजवळच जिल्हा सामान्य रुग्णालय असल्याने चौकात औषधालये आहेतकाही वर्षांपासून गांधी मार्गावर इलेक्ट्रिकइलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आहेतएलोरा स्टेशनरीठकरे मेडिकलअंदनकर यांचे पुस्तकालयसोरते आइस्क्रीम अनेक वर्षांपासून सुरू आहे.
तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी :  ना. एकनाथराव खडसे

मुंबई  : केंद्र व राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्येशेतकऱ्यांना मदत देतांना वादळ, भुकंप, आग, पूर, अतिवृष्टी, अवेळी पाऊस,दुष्काळ, वीज कोसळणे, कडाक्याची थंडी आदी निकष जाहिर केले होते यानिकषानुसार देण्यात येणारी मदत यापुढेही चालु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळानेकाल मान्यता दिली. परंतु, या निकषामध्ये तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेझालेले नुकसान हा निकष समाविष्ट केलेला नाही. त्यामुळे राज्यातीलशेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष व तत्सम पिकांचे तीव्र उष्णतामानामुळे नुकसानझाल्यास त्यांना मदत मिळू शकत नाही, म्हणुन राज्य शासनाने या भागातीलशेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे होणारेनुकसान ही नैसर्गिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी केली आहे.

श्री.खडसे पुढे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी 1 एप्रिल ते 15 जुनदरम्यान दरवर्षी कडाक्याचे ऊन पडलेले असते. काही ठिकाणी तापमान 47-48अंशांपर्यंत पोहोचलेले असते. केळी, द्राक्ष व तत्सम पिकांना साधारणत: 43-44अंश सेल्सीअसच्या वर तापमान मानवत नाही. त्यामुळे पिकांवर कडकउन्हाचा विपरीत परिणाम होऊन पिकांचे अतोनात नुकसान होते. परंतुशासनाच्या निकषात बसत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनानुकसानीची भरपाई मिळत नाही म्हणुन तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेनुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे त्यांनीशेवटी सांगितले.

Thursday, November 21, 2013

 गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी योजना :  सोनिया गांधी

गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी योजना : सोनिया गांधी

 ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात
नागपूर - यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कस्तुरचंद पार्कवर जीवनदायी आरोग्य योजनेचे लोकार्पण केले. या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी ही योजना आहे. 
सोनिया गांधी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या जीवनदायी योजनेचे 100 लाभार्थ्यांही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, फौजिया खान यांच्यासह राज्य शासनातील अनेक मंत्री उपस्थित होते. 
फटाक्याच्या आगीत दोन दुकाने भस्मसात

फटाक्याच्या आगीत दोन दुकाने भस्मसात

चंद्रपूर, २० नोव्हेंबर

विवाहाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्याच्या आगीने परिसरातील दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यात सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकांनी वर्तविला असून, ही घटना बायपास मार्गावरील अष्टभुजा वॉर्डात मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
बायपास मार्गावरील अष्टभुजा वॉर्डात मुजीबुल रहमान यांच्या मालकीचे टायर-ट्युबचे दुकान आहे. याच परिसरात असलेल्या एका सभागृहात मंगळवारी रात्री लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. दरम्यान, फटाक्याच्या आगीची ठिगणी पडून रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत दुकानातील ४० ते ५० हजार रुपये किंमतीची सर्व्हिसिंग मशिन व टायर ट्युब जळून खाक झालेत. यात रहमान यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर थोड्या वेळाने तसलिम खान यांच्या भंगार दुकानाला आग लागली. यात रद्दी व ५ हजार रुपये रोख जळून खाक झालेत. यात खान यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते.
गोरगरिबांचा थांबा आंबेडकर पुतळा चौक

गोरगरिबांचा थांबा आंबेडकर पुतळा चौक


चंद्रपूर, ता. २० : दीनदलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्मृतिनिमित्त गांधी मार्गावर डॉ. आंबेडकरांचा पुतळा बांधण्यात आला. तेव्हापासून या चौकाला त्यांच्या नावाची ओळख झाली. आज हा चौक गोरगरिबांचा थांबा म्हणून ओळखू लागला आहे.
२० मे १९६९ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चंद्रपुरात आल्या होत्या. तेव्हा रिपब्लिकन नेते, राज्यसभेचे माजी सभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुढाकारातून गांधी मार्गावर साकारलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण या दिवशी इंदिराजींच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांचीही उपस्थिती होती. तेव्हापासून या चौकाला आंबेडकर पुतळा चौक म्हणून ओळखू लागला.
पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट आणि गांधी चौक ते बिनबा गेट मार्गाला जोडणारा हा चौक. गोलबाजाराच्या शेजारी हा चौक असल्याने येथे छोटे व्यावसायिक बसतात. पूर्वी येथे दिवाळीला ङ्कटका विक्री, तर रक्षाबंधनला राख्यांची विक्री व्हायची. गत दोन वर्षांपासून महानगरपालिकेने ही जागा राखीव केली आहे. दरवर्षी १५ आणि १६ ऑक्टोबरला धम्मचक्र अनुवर्तनदिनाची रॅली, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांची जयंती आणि सहा डिसेंबरला महापरिनिर्वाणाचा कार्यक्रम
येथे होतो. पुतळ्याच्या शेजारी असलेली मोकळी जागा आता सुशोभित करण्यात आली असून, तिथे बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांकडून येथे विविध कार्यक्रम घेतले जातात. पुतळ्याच्या शेजारी भरणारा qचधीबाजार प्रसिद्ध आहे. काही महिला शहरात ङ्किरून भांड्यांच्या बदल्यात जुने कपडे खरेदी करून येथे विक्रीला आणतात. कामगारवर्ग, झोपडपट्टीवासी आणि अत्यंत गरिबांसाठी हे कपडे केवळ १० ते २० रुपये किमतीला विकण्यात येते. शहरातील व्यापारपेठ दर रविवारी बंद असते. त्याचा ङ्कायदा छोटे व्यावसायिक घेतात. शटर बंद दुकानांपुढे कपड्यांची दुकाने लागतात. हे कपडेदेखील ५० ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. शिवाय येथे मिळणारे समोसे, भजे, कचोरी केवळ पाच रुपये प्लेटनुसार मिळते. पूर्वी येथे एक धाबा होता. तिथे केवळ १० ते २० रुपयांत भोजन मिळायचे. याशिवाय लहान मुलांची खेळणी, अंतर्वस्त्रे हेदेखील २० ते २५ रुपयांत मिळतात. पुतळ्याच्या मागे पत्रावळी, चुना, प्लॅस्टिक प्लेटांची विक्री होते. बॅण्डपथकाचे कलावंत नोंदणीसाठी येथे दिवसभर बसून असतात. त्यामुळे आंबेडकर पुतळा ते श्री टॉकीज चौक या मार्गावर गोरगरिबांची नेहमीच गर्दी दिसते.

Wednesday, November 20, 2013

तीन महिन्यानंतरही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

तीन महिन्यानंतरही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

मुंबई - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या हत्येला बुधवारी तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट फिरत असून, पोलिसांना त्यांना पकडता आलेले नाही.

मारेक-यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ३४ पथके स्थापना केली आहेत मात्र माहिती आणि संशयितांव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती विशेष काही लागलेले नाही. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत राज्यातील आणि राज्याबाहेरील अडीज हजार पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे. मात्र अजूनपर्यंत ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पोलिस फक्त वेगवेगळे अंदाज काढत आहेत.
           तीन महिन्यांपूर्वी २० ऑगस्ट रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर सकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात मारेक-यांनी डॉ. दाभोलकरांची गोळी झाडून हत्या केली होती.पोलिसांनी दाभोलकर यांच्यावर हल्ला झालेल्या परिसरातील १६९ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यापैकी ११७ ठिकाणचे फुटेज तपासण्यात आले. अस्पष्ट फुटेज लंडन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले मात्र त्यातूनही पोलिसांना काहीही मिळाले नाही.
          पोलिसांची काही पथके गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये आरोपींचा शोध घेत आहेत. सराईत गुन्हेगार, सुपारी किलर, बेकायदा शस्त्रास्त्र विक्री करणारे याची चौकशी सुरु आहे. मात्र अजूनही पोलिसांना मारेक-यांपर्यंत पोहोचता आलेले नाही. पुणे पोलिसांना या तपासत मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, एटीएस, सीआयडी मदत करत आहे.
आर्थिक गुन्ह्यांसाठी खास सेल

आर्थिक गुन्ह्यांसाठी खास सेल

चंद्रपूर : जिल्ह्यात आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज नवनवीन प्रकरणे स मोर येत आहे. मात्र, या प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलिसांची सक्षम यंत्रणा नाही. त्या मुळे जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहे. या पाश्र्वभूमिवर आर्थिक गुन्हे हाताळणारे स्वतंत्र सेल सुरु होणार आहे.

पैसे दा मदुप्पट करून देण्याचे आ मिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची ङ्कसवणूक करणाèया कंपन्या व दलालांचे जाळे मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात सक्रिय आहेत. आठ वर्षांपुवी चंद्रपूर शहरातील एका प्रतिष्ठित बँकेचा घोटाळा झाला होता. मात्र, पोलिसांना हे प्रकरण कळण्यासाठीच दोन वर्ष लागले. या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेत-घेत हे प्रकरण पुढे नेण्यात आले. यात कि मान सहा ते सात वर्षांचा कालावधी गेला. अजूनही या प्रकरणाचा पाहिजे तसा तपास झाला नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता अशाच प्रकारची वेगवेगळी प्रकरणे स मोर येवू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी पैसे दुप्पट करण्याचे आ मीष दाखवून राजुरा येथील गो मती पाचभाई व राकेश वरङ्कटकर या दाम्पत्याने मनी मंत्र ङ्कायनान्स कंपनीच्या नावाखाली अनेकांना गंडविले. राजुरा येथील सेवानिवृत्त नागरिक, व्यापारी, शिक्षक, वेकोली येथील कर् मचारी, डॉक्टर, का मगार व चंद्रपूर येथील मोठ्या व्यापाèयांची यात ङ्कसवणुक झाली. रा मनगर पोलिस तपास करीत असलेल्या सिल्वर लाइन कॅपिटल या कंपनीनेही कोट्यवधींचा चुना लावला आहे. या प्रकरणा मध्ये काही तांत्रिक अडचणी मुळे पोलिसांना या घटनांचा तपास करण्यासाठी वेळ लागत असल्याचे बोलले जात आहे. या कंपनीचे संचालक कर् मविर तेलंग हे आहेत. त्यांच्या विरुद्ध गुंतवणूकदार विजय बल्की यांनी काही दिवसांपुवी रा मनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी ४२०, ४०९ गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांना तपासाला गती देता आली नाही. आर्थिक गुन्ह्यांचा तपास इतर गुन्ह्यांच्या तुलनेत वेगळा असतो. यात एकाचवेळी कंपनी कायदा, रिझव्र्ह बॅकेंचे निर्देश, सेबीने केलेले निय म याची गुंतागुंत सोडवून तपास करावा लागतो. सर्वसा मान्य स्वरूपाचे गुन्हे हाताळणारे अधिकारी अशा प्रकरणांचा तपास करण्यात क मी पडतात. उलट आरोपीच वेगवेगळ्या निय मांचा दाखला देऊन अलगद निसटून जातो qकवा प्रकरणे न्यायालयात तग धरत नाही. खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ सहसा अशा प्रकरणात मार्गदर्शकांची भू मिका बजावण्यात मागे पडतात. त्या मुळे असे गुन्हे वाढण्यास आपोआप मदत होते. अलीकडच्या दोन वर्षांत अशी अनेक प्रकरणे स मोर आली आहेत. मात्र, ङ्कसवणुकीचे प्रकार बंद झालेले नाहीत. त्या मुळे जिल्हा पोलिसांनी आर्थिक ङ्कसवुणकीचे प्रकरणे सांभाळण्यासाठी स्वतंत्र सेल उभे करावे, अशी मागणी पुढे आली आहे. मूळात स्थानिक गुन्हे शाखेचा उग म आर्थिक गुन्हे तपासासाठीच झाला होता. मात्र, या शाखेचा हा उद्देश केव्हाच मागे पडला आहे. खून, दरोडे यासारखे प्रकरणेच अधिक हाताळावे लागतात. त्या मुळे स्वतंत्र तपास गट सुरु होणार आहे.
मुरलीधर शिंगोटे यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

मुरलीधर शिंगोटे यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

 परभणी : भांडवलशाहीविरुद्ध जोरदार लढा देत मराठी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. 'पुण्य नगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै. बाबा आमटे पुरस्कार जाहीर झाला आहे.

६ जानेवारी २0१४ रोजी अक्षदा मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे सायंकाळी ६ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हरिओम सेवाभावी संस्था, परभणी यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कार वितरण सोहळय़ाला डॉ. विकास आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प सुविधेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यापूर्वीही मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांना विविध प्रकारचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

दै. 'पुण्य नगरी'चे संस्थापक-संपादक असलेले मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांनी सुरुवातीला वृत्तपत्रात वितरण व्यवसाय आणि त्यानंतर मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, दै. पुण्य नगरी ही वृत्तपत्रे सुरू करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडलेली आहे. कुठल्याही प्रकारचा आधार, राजकीय पाठबळ नसताना शून्यातून विश्‍व निर्माण करून त्यांनी अलौकिक असे यश संपादन केलेले आहे. ही गोष्ट केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरवास्पद अशी आहे. त्यांचे हे यश वाखाणण्याजोगे असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हरिओम सेवाभावी संस्थेने कै. बाबा आमटे पुरस्कार जाहीर केला आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष असलेले बाळासाहेब जाधव यांनी याबाबत पत्र पाठवून बाबा आमटे पुरस्कार जाहीर झाल्याचे मुरलीधर शिंगोटे यांना कळविले आहे. त्यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोक बिरादरीचे छायाचित्रांचे प्रदर्शन

लोक बिरादरीचे छायाचित्रांचे प्रदर्शन

महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पातल्या गेल्या ४० वर्षातल्या वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचे प्रदर्शन “कलादालन, केशवराव भोसले सभागृह”, खासबाग मैदाना जवळ, कोल्हापूर (दिनांक १ ते ३ डिसेंबर २०१३, वेळ सकाळी ९ ते रात्री ९) व भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, औंध, पुणे, (दिनांक ६ ते १० डिसेंबर २०१३, वेळ सकाळी १० ते रात्री ८) येथे आयोजित करण्यात आले आहे.

बांबू क्राफ्ट प्रदर्शन: छायाचित्रांबरोबरच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या बांबू हस्तकलेच्या वस्तूही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा म्हणून लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत बांबू क्राफ्ट प्रशिक्षण व विक्री केंद्र चालविल्या जाते.

पुस्तके व फिल्म: लोक बिरादरी प्रकल्पाच्या कार्यावर आधारित विडीओ फिल्म तसेच प्रकाशवाटा¸ समिधा¸ नेगल¸ रानमित्र¸ एका नक्षलवाद्याचा जन्म इत्यादी पुस्तके सुद्धा प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्राच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात चालणाऱ्या या निरलस कार्याचा प्रारंभ स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांनी १९७३ मध्ये केला. त्यानंतर डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अन्य कार्यकर्त्यान समवेत ही जबाबदारी उचलली. आज हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. लोक बिरादरी च्या आश्रमशाळेत सुमारे ६५० आदिवासी विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. तसेच जंगलतोड आणि शिकारीमुळे मरणाच्या तोंडाशी पोहोचलेल्या अनाथ वन्य जीवांना आमटेज् अनिमल आर्क (वन्यप्राणी अनाथालय) मध्ये अभय देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.

हे कार्य शहरातील जनते पर्यंत पोहोचावे या हेतूने हे प्रदर्शन गेली ६ वर्षे आम्ही नीर निराळ्या शहरात भरवित असतो. सुसंस्कृत-सजाण-जागृत-संवेदनशील नागरिकांनी सह कुटुंब-सह परिवार या प्रदर्शनाला भेट द्यावी व प्रकल्पात नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोफत आरोग्यसेवा देणाऱ्या सर्वोपचार दवाखान्याला आर्थिक मदत करून लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा असे आव्हान लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे तर्फे करण्यात येत आहे. देणगीचा चेक "महारोगी सेवा समिती, वरोरा" या नावाने काढावा.

ऑन लाईन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येते.

S.B. Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
S.B. Account No.: 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch)
IFSC: MAHB0001108

अधिक माहिती करिता श्री. सचिन मुक्कावार - 7588772858 यांच्याशी अथवा लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे च्या कार्यकर्त्या सौ. शिल्पा तांबे – 9850666729, कोल्हापुरातील श्री. प्रशांत जोशी - ९७६४२२१९१७, श्री. अमोल कोरगावकर - ९४२२४२४७६३ यांच्याशी संपर्क करावा.

Tuesday, November 19, 2013

'शांतारामजी' व 'मदनराव' चंद्रपूरकरांचे आधारवड

'शांतारामजी' व 'मदनराव' चंद्रपूरकरांचे आधारवड

न्या. धर्माधिकारी यांचे गौरवोद्गार
'शांतारामजी' व 'मदनराव' , न्या. धर्माधिकारी 

चंद्रपूर- दोन जीवलग मित्र कसे असावे, त्यांचे ऋणानुबंध किती घट्ट असावे, आपल्या कार्याने इतरांना प्रेरित करणारे, सदैव दुसर्‍यांचा विचार करणारे, प्रसंगी सवरेतोपरी मदत करणारा सखा जर आपल्याला मिळाला, तर जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटते. चंद्रपूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक जगतात ज्यांनी आपला अमूल्य ठसा उमटविला. असे दोन तपस्वी जर कुणी असेल तर ते म्हणजे 'शांताराम पोटदुखे' व 'मदनराव धनकर' होत. म्हणूनच ते खर्‍या अर्थाने चंद्रपूरकरांचे आधारवड आहेत, असे गौरवोद्गार गांधी विचारांचे पुरस्कर्ते न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी काढले.
हा अभिनव प्रसंग होता प्राचार्य मदन धनकर यांना देण्यात आलेला चंद्रपूरभूषण पुरस्कार व शांतारामजींचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळय़चा. येथील प्रियदर्शिनी सभागृहात रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 वाजता हा विलोभनीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी मानातल्या भावनांची उकल केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पालकमंत्री संजय देवतळे, लोकाग्रणी प्रतिष्ठानचे सचिव अँड. चंद्रकांत देशमुख यांची उपस्थिती होती.
न्या. धर्माधिकारी म्हणाले, कोणताही स्नेह सोहळा हा केवळ सोहळा किंवा एखादा कार्यक्रम नसतो. तर आपण आयुष्यभर जी माणसं जोडली, जी नाती जोपासली, जे सहकार्य केले त्याला कुठेतरी उतराई होता यावे, प्रेम व्यक्त करता यावे यासाठी अश्याप्रकारचे एकत्रीकरण करण्यासाठी असतो. आधुनिक जागात आपण याच गोष्टीला मुकलो असून त्याला आपल्या प्रेमाची, विश्‍वासाची झालरं बनून चिरकाळ टिकवून ठेवण्याचे काम या दोघांनीच केल्याची पावती त्यांनी दिली. महात्मा गांधींनी मांडलेली रामराज्याची संकल्पना आजच्या उथळ व बेशिस्त समाजाला जागृत करण्यासाठी होती. आपल्याला प्रत्येक गोष्टीत हक्क सांगण्याची सवय असते. राजकारण्यांना ती सवय जरा जास्तच असते. जिथे अशाप्रकारचे हक्कदार नसतात ते रामराज्य आणि जिथे ते असतात ते हराम राज्य. जिथे चंद्रपूरकरांचा आधारवड बनून शांतारामजींनी सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक चळवळीला आधार दिला; त्याच आधारवडाला मदनरावांनी अतिशय कुशलतेने हाताळले. या दोघांशिवाय कोणतीच चळवळ यशस्वी होऊ शकली नसती, हे तितकेच खरे. निरपेक्ष भावनेतून जोपासलेली मैत्री ही चिरकाळ टिकते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी चंद्रपूरकरांना सांस्कृतिक विषयाची शितलता इतके वर्ष नि:स्वाथपणे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दोघांनी केल्याचे नमूद करून आपल्या भावनांना वाट मोकळी क रून दिली. चंद्रपूरच्या वातावरणातील प्रदूषण कधीही दुर होऊ शकेल, पालकमंत्री त्यासाठी सक्षम आहेतच. पण मनातील प्रदूषण दूर करण्याची आज जास्त गरज आहे. या दोन नरर%ांचा सत्कार करताना संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली. या दोन्ही विभूतींचा कार्यकाळात जरी चारशे वर्षांचे अंतर असले तरी महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांना 'ज्ञानबा तुकाराम' या विशेषणानेच ओळखल्या जाते. हाच वारसा मदनराव व शांतारामजींनी आयुष्यभर जोपासला. यापुढेही ही जोडी नवचैतन्य निर्माण करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मदनराव धनकर यांना ११ व्या चंद्रपूरभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांची सहचारिणी इंद्रायनी यांचाही सत्कार करण्यात आला. आपल्या वडिलांवर केलेल्या कविताचे वाचन व मदनरावांचे विचार शब्दरूपाने प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी वाचून दाखविले. मदनरावांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. शांतारामजींच्या सहस्त्रचंददर्शन सोहहय़ाप्रसंगी ८0 दिव्यांची रोशनाई करण्यात आली. अँड. चंद्रकांत देशमुख यांनी प्रास्ताविकेतून लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहांकितचे सचिव राजा बोजावार यांनी केले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, धनकर कुटुंबीय व नागरिकांची उपस्थिती होती.
प्रेमविरहात घेतला प्रियकराने वाघाचा बळी

प्रेमविरहात घेतला प्रियकराने वाघाचा बळी

चंद्रपूर - "तुम मेरी हो नही सकती, तो मैं तुम्हे किसी ओर की होने नही दूँगा' हा संवाद आहे "धडकन' चित्रपटातील. असाच किस्सा येथेही घडला. ज्या तरुणीवर जिवापाड प्रेम केले, ती तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर दुसऱ्याची झाली आणि तेव्हापासून हा प्रेमवीर वेडा झाला. बदला घेण्यासाठी चक्क त्याने मुलीच्या वडिलाविरुद्ध वाघाला जिवंत मारल्याची तक्रार केली आणि पुरलेल्या वाघाचे तुकडे शोधण्यासाठी वनविभागाने दिवसरात्र एक केले. अखेर आठ दिवसांनी खोटी तक्रार दिल्याचा उलगडा झाला.

राजुरा तालुक्‍यातील सुमठाणा बिटात येणाऱ्या माथरा येथील तक्रारकर्त्या तरुणाचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिच्यासोबतच लग्न करण्याचा निश्‍चय त्याने केला. पण, ऐनवेळी गावातील राजकारण आडवे आले. त्यामुळे त्याला ती मिळू शकली नाही. उलट तिच्या वडिलाने दुसऱ्या मुलाशी थाटात तिचे लग्न लावून दिले. त्यामुळे व्यथित झालेला हा प्रेमवीर वधूपित्याचा सूड घेण्यासाठी पुढे आला.

शेतातील कुंपणाला लावलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन वाघाचा मृत्यू झाला आणि ही बाब कुणालाही कळू नये, यासाठी त्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी तोंडी तक्रार या प्रेमवीराने दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावात चौकशी करू लागले. कधी शेतात, तर कधी जंगलात मृतदेह दडवून ठेवल्याची माहिती तो तरुण देत होता आणि त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी शोध घेत होते. या तरुणाने ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिली, त्यांच्यासह काहीजणांचे बयाण नोंदविण्यात आले. पण, त्यानंतरही काहीच हाती लागले नाही. मात्र, जाणीवपूर्वक बदनामी आणि फसविण्यासाठी हा तरुण इतक्‍यावरच थांबला नाही, तर चंद्रपूर वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तोंडी तक्रार दिली. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीला प्रारंभ झाला. गाव, शेत आणि जंगल शोधूनही वनाधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. रिकाम्या हाती परतलेल्या वनाधिकाऱ्यांनी मोहीम थांबविली. दरम्यान, तक्रारकर्त्या तरुणाच्या "प्रेम'कथेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. या घटनेसंदर्भात राजुरा येथील वनाधिकारी श्री. काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीही ही खोटी तक्रार द्वेषभावनेतून दिल्याचे सांगितले.
बदलत्या शहराचा साक्षीदार गांधी चौक

बदलत्या शहराचा साक्षीदार गांधी चौक

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर, ता. १७ : राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, महानगरपालिका, गोलबाजार, पोलिस ठाणे, सराङ्का बाजार आणि शतकानुशतके विविध घडामोडींचा केंद्रqबदू राहिलेला गांधी चौक बदलत्या शहराचा साक्षीदार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या चौकाला गांधीजींचे नाव देण्यात आले.

१९ मे १८६७ ला येथे नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर या शहराच्या विकासाला प्रारंभ झाला. आता मागील दोन वर्षांपासून शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. सातमजली इमारत आणि पुगलिया गल्ली ही या चौकाची आणखी एक ओळख. शेजारी नेताजीनगर भवन, शहर पोलिस ठाणे आहे. पूर्वी तिथे कोतवाली भरायची. त्यातूनच पालिकेचा कारभार सुरू झाला होता. पुढे पालिकेची इमारत व टाऊन हॉल बनविण्यात आले. आता पालिकेची जुनी भव्य इमारत पाडून नवीन संकुल उभारण्यात येत आहे.

गांधी चौकातच गोल बाजार, सराङ्का बाजार, कापड मार्केट, अपना बाजार असल्यामुळे येथे दिवसभर गर्दी असते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात माळी समाज भाजीपाला पिकवायचे आणि तेली समाज तेलाचे घाणे चालवून किराणा व व्यापारपेठ चालवीत असत. त्यामुळे तेव्हाच्या चांद्याचा भाजीपाला आणि तेलघाणा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होता. आता सर्व बदलले आहे. गोलबाजारातील भाजीपाला आणि किराणा दुकाने आता विविध समाजाचे लोक चालवीत आहेत. शिवाय व्यापार qहदी भाषिकांच्या हाती आला आहे.

गांधी चौकातील वर्दळ पहाटेपासूनच सुरू होते. सकाळी ङ्किरायला जाणारे नागरिक गांधी चौकातूनच जातात. ङ्किरून आल्यानंतर अनेक समवयस्क नागरिक गांधी चौकात चर्चा करीत असतात. त्यामुळे येथे पहाटेपासूनच चहा आणि ओलूपोह्याची विक्री जोरात होते. सकाळी आठ वाजल्यानंतर हे विक्रेते निघून जातात. त्यानंतर भाजीपाला, ङ्कळविक्रेते बाजारात येऊन बसतात. मग, वर्दळ सुरू होते ती रात्री नऊवाजेपर्यंत कायम असते.

येथील पुगलिया गल्लीत घडणाèया घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होतो. येथे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे निवास, कार्यालय, काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. स्वातंत्र्यानंतर पुगलिया घराण्याचे राजकारणात महत्त्वाचे योगदान राहिले. त्यामुळे पुगलिया गल्लीतील घडामोडींवर अन्य राजकारण्यांसह प्रसिद्धी माध्यमांचे विशेष लक्ष असते. याच गांधी चौकाच्या शेजारी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे जन्मस्थळ आहे. पोटदुखे घराण्याचेदेखील राजकारण आणि समाजकारणात मोठे योगदान असल्याने गांधी चौकाने अनेक महत्त्वपूर्व घटनांची साक्ष देते. पूर्वीच्या नगरपालिकेच्या इमारतीशेजारी मैदान होते. त्यामुळे विविध राजकीय पक्षाच्या जाहीर सभा येथे व्हायच्या. येथे शत्रुघ्न सिन्हा, सुशीलकुमार qशदे, विलासराव देशमुख यांच्यासह विविध कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत.

Monday, November 18, 2013

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 81 कोटी 84 लाखाची  मदत- पालकमंत्री

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 81 कोटी 84 लाखाची मदत- पालकमंत्री

अद्याक्षराप्रमाणे गुरुवारपासून वाटपास सुरुवात

    अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या 50 टक्के वरील शेतमालाच्या नुकसानीच्या संबंधाने भात पिकाकरीता प्रति हेक्टरी 7500 रुपये तर इतर पिकांकरीता प्रती हेक्टरी 5 हजार प्रमाणे 133 कोटी 39 लाख 77 हजार 500 रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.  त्यापैकी 60 टक्के म्हणजे 81 कोटी 84 लाख 62 हजार रुपयाचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे.  उर्वरीत निधी लवकरच प्राप्त होईल तो सुध्दा वाटप करण्यात येईल असे देवतळे यांनी सांगितले.
    जिल्हयातील 1413 गावे खरीपांचे असून नजर आणेवारीमध्ये 565 गावांची आणेवारी 50 टक्क्याच्या आत आली होती.  सुधारीत आणेवारीत 754 गावाची आणेवारी 50 टक्केच्या आत असल्याचे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.   या सर्व शेतक-यांना शासकीय मदत वाटप करण्यात येईल असे ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसांनीसाठी 368 कोटी रुपये  निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला होता.  त्यापैकी 268 कोटी रुपये मुलभूत सुविधेकरीता मागितले होते असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
    अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलाचे नुकसान झाले असून रस्त्यासाठी 7 कोटी रुपये प्राप्त झाले असून रस्ते दुरुस्तीच्या कामास सुरवात झाली आहे.   त्याचप्रमाणे मनपा अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयाची मागणी केली असून ती लवकरच प्राप्त होतील असे यावेळी सांगण्यात आले. दाताळा पुलासाठी 23 कोटी व राजूरा पूलासाठी 68 कोटीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे पालकमंत्री म्हणाले. महानगर पालिकाअंतर्गत मूलभूत सोयीसुविधांकरीता 60 कोटी रुपयांच्या प्रस्तावास आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली असून 30 कोटीचा निधी राज्य शासन देणार असून  30 कोटी रुपये मनपा चंद्रपूर खर्च करणार आहे.  यातून 148 कामे घेण्यात येणार असल्याचे देवतळे यांनी सांगितले.
    डब्ल्युसिएलच्या ओव्हर बर्डनचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला असून समितीने या संबंधी काही शिफारशी केल्या आहेत.  त्या शिफारसीवर अंमल करण्यासंबंधी  डब्ल्युसिएलला लेखी निर्देश दिले असून एक महिण्याच्या आत अंमल न केल्यास कायदेशिर कारवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 
    पूरपरिस्थितीमध्ये ज्या गावांचा संपर्क सतत तुटतो अशा गावांना जोडणा-या पुलांची उंची वाढविण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.  महानगर पालिका क्षेत्रातील ब्ल्यु लाईन रेड लाईनच्या सॅटेलाईट ईमेज प्राप्त करण्याची कार्यवाही सुरु असून ईमेज प्राप्त होताच पुढील निर्णय घेण्यात येईल असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.          

चंद्रपूर दि.18- चंद्रपूर जिल्हयात जून, जुलै व ऑगष्ट 2013 या महिण्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदान वाटप करण्यासाठी राज्य शासनाकडून 81 कोटी 84 लाख 62 हजार रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असून गुरुवार 21 नोव्हेंबर पासून सर्व तालुक्यात अद्याक्षराप्रमाणे गावातील शेतक-यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय देवतळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकलेवार व कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग उपस्थित होते. 
जटपु-यावर दरवळतो मोग-याचा सुगंध

जटपु-यावर दरवळतो मोग-याचा सुगंध

ब्लॅक गोल्ड सिटी

चौकातील दिवस

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर, ता. १७ : शहरात आगमन आणि अवागमन करताना जटपुरा प्रवेशदारातून जावे लागते. त्यामुळे जटपुरा कुणी बघितला नाही,  कुणी ऐकला नाही, असा व्यक्ती शहरात शोधूनही सापडणार नाही. या जटपुरा गेट चौकाची दिवसभरातील खासियत निरनिराळी असलीतरी येथील मोगरा फुलांचा सुगंध मनाला भुरळ घालणारा आहे.
राज्याच्या एका टोकावर वसलेले चंद्रपूर शहर. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आता विविध उद्योगांनी गजबजलेले हे शहर पूर्वी गोंड राज्यांच्या आधिपत्याखाली होते. त्यांनी बांधलेल्या परकोटाची qभत आणि त्यातीलच एक द्वार म्हणजे जटपुरा. जाट नावाचा सैनिक शहीद झाल्यानंतर या द्वाराला हे नाव पडले.
पूर्वी जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी कचेरी उभारली होती. तिथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होते. आता येथे जिल्हा परिषदेची इमारत आहे. सराई मार्केटसुद्धा इंग्रजकाळापासून आहे. मात्र, ही इमारत आता जीर्ण झाली आहे. काळानुरूप बदलानुसार जटपुरा गेट परिसराचे चित्र बदलले आहे. जिथे पूर्वी कैलारू आणि साधारण सिमेंटच्या इमारती होत्या, तिथे आज मोठ्या आणि सौंदर्यीकरण झालेल्या इमारती उभ्या झाल्या आहेत. या गेटच्या दोन्ही कडेला सुपर बाजार, किराणा व हार्डवेअर दुकाने, मद्यालये आहेत. खासगी रुग्णालयांमुळेही गेट परिसरात नेहमीच वर्दळ असते. बालरोग, स्त्री प्रसूती, सिटी स्कॅन, कान, नाक, घसा आदी रोगांवर येथे उपचार होतो. या परिसरातील वसंत भवन अणि जिल्हा परिषदेची शाळा आहे. ऐतिहासिक वारशामुळे जटपुरा गेट शहराची शान म्हणूनच उभा आहे.

या चौकात पहाटे चार वाजेपासूनच वर्दळीला प्रारंभ होतो. पहाटेच्या वेळी मोगèयापासून बनविलेले गजरे विक्रीसाठी येतात. मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहात नाही, त्यामुळे ग्राहकही आकर्षित होतात. गेटसमोरील वडाच्या झाडाखाली चार-पाच विक्रेते सकाळी-सकाळी कामानिमित्त बाहेर निघणाèयांना गजरा खरेदी करण्याची विनंती करतात. याचवेळी चौकात येतात ते आलूपोहावाले. आलूपोह्यावर तर्री मारून qलब पिळून सकाळचा नास्ता करण्यासाठी गर्दी होते. सोबतच चहा, ब्रेड आणि दुधाच्या पॅकेटची येथे विक्री होते. सात-आठ वाजल्यापासून वस्तरा, कैची आणि ङ्केस काढणारी साबण घेऊन आठ-दहा नाव्ही येतात. महानगरपालिकेच्या व्यापार संकूलासमोर एका रांगेत हे नाव्ही कचकच केस कापायला सुरवात करतात. त्यानंतर पानटपरी, कळविक्रेते, ऊस रसवंतीची दुकाने लागतात. हा व्यवसाय दिवसभर सुरू असतो. सायंकाळ आणि रात्री बारापर्यंत येथील गर्दी कायम असते.
लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ओबीसी करणार घंटानाद

लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ओबीसी करणार घंटानाद

ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन 24 नोव्हेबरला 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने बांडबाजा आंदोलन  

ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन मंत्री,खासदार, आमदारांच्या घरासमोर येत्या एक डिसेंबरल रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय १७ नोव्हेंबर २०१३ला जनता महाविधालय येथे ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी बोलविलेल्या विदर्भतील ओबीसी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
ओबीसी बांधवाच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करुन आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.त्यावेळी प्राचार्य अशोकभाऊ जीवतोडे ,ओबीसी एकता मंच अध्यक्ष सुनील पाल नागपूर, ओबीसी कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष शेषराव येलेकर गडचिरोली, ओबीसी संघटनेचे अनिल बाळसराफ वर्धा, अरुणपाटील मुनघाटे ओबीसी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष गडचिरोली, नंदू नागरकर ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रपूर, प्रा. माधव गुरुनुले ओबीसी सेवा संघ अध्यक्ष चंद्रपूर,बळीराज धोटे ओबीसी फेडरेशन अध्यक्ष चंद्रपूर,दिनेश चोखारे,देविदास बानबले, प्रकाश देवतळे,प्राचार्य राजेंद्र लांजेकर. उपप्राचार्य बबनराव राजूरकर,बबनराव वानखेडे, गजानन अगडे चिमूर,वसुदेव आस्कर, अॅड भगवान पाटील, दिगाबर चोधरी नागभीड,अविनाश पाल सावली,विवेक लेनगुरे, विजय मोरे राजुरा, बंडू डाखरे वरोरा,प्रा. राजेंद्र खाडे बल्लारपूर, गोविन्दा पोडे,सुनील आवरी भद्रावती, दिवसे मामा,केशवराव जेणेकर,संजय पोहनेकर अहेरी, नागपुरे सर उपस्थितीत होते.बैठकीत ओबीसीची शिष्यवृती , नॉनक्रिमीलेअरच्या संदर्भातील परिपत्रक , ओबीसीची जनगणना, इत्यादी मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
शासनाने ओबीसी संदर्भात अन्यायकारक धोरण राबवीत असून, या प्रवर्गाच्या अनेक योजना करण्याचा सपाटा राज्य शासनाने सुरु केला आहे. दि ८ ऑक्टोबर २०१३ मुंबई येते महाराष्ट्राचे मुखमंत्री व दि ०९ ऑक्टोबर२०१३ला मुंबई येथे सायान्द्री सभागुहात सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व विभागाचे सचिव यांचा उपस्थित बैठक झाली त्यावेळी दि ३१ ऑगस्ट २०१३ व दि. २६ सप्टे २०१३ला निघालेले ओबीसी बाबत अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्याचे आस्वासन दिले परतुं अजून पर्यत परिपत्रक रद्द केली नाही. दिनांक १८ ऑक्टोबरला सपूर्ण विदर्भातील शाळा महाविधालय बंद करण्यात आले होते परंतु सरकारची ओबीसी समाजबांधवा बद्दल उदासीनता लक्षात येत आहे. संपूर्ण विदर्भातील ओबीसी संघटनेची सामोतील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या संदर्भात सहविचार सभा घेण्यात आली . त्यावेळी मंत्री,खासदार ,आमदारांच्या घरासमोर येत्या ऐक डिसेंबरल रोजी सपूर्ण विदर्भात घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सचिन राजूरकर ९३७०३२४६०८


झोलबा पाटलाचा वाडा 'शौचालयाविना'

झोलबा पाटलाचा वाडा 'शौचालयाविना'

चंद्रपूर- गावखेड्यात एखाद्या शहाण्या नागरिकाने गावातील नागरिकांना एखादी बाब समजावून सांगितली तर त्याला गावातील नागरिक अहो, साहेब..प्रथमत: स्वत:चे घर सुधारा, नंतर आपला शहाणपणा सांगा, अशी म्हण खेड्यात आजही प्रचलीत आहे. हीच म्हण तंतोतंत चंद्रपूर जिल्हा परिषदेला लागू पडते. जिल्ह्य़ातील ८४७ ग्राम पंचायतींना शौचालय, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा हा पुरस्कृत झोलबा पाटलाचा वाडा शौचालयाविनाच आहे. 

२१ लाख लोकसंख्येसाठी केवळ दोन शौचालय असल्याने येथे येणार्‍या अभ्यागतांची चांगलीच गैरसोय होत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील विभागनिहाय शौचालयाची व्यवस्थाच नाही. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचारीही कामे बाजूला सारून घरचा रस्ता पकडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

शासन निर्देशानुसार गोदरीमुक्त, निर्मलग्राम, स्वच्छ गाव, सुंदर गाव, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी गावखेड्यात दौरे, कार्यशाळा घेऊन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देत आहे. मागिल अनेक वर्षापासून २00१ च्या जनगणनेनुसार २१ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्य़ातील ८४७ ग्राम पंचायतींपैकी अनेक गावे गोदरीमुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे. पण प्रत्यक्षात गोदरीमुक्त गावाचा पुरस्कार मिळालेल्या गावांतच अस्वच्छता पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारी जिल्हा परिषदच शौचालयाविना आहे. जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचे मंत्रालय समजले जाते. पण याच मंत्रायालयात विविध समस्यांचा अंबर आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कक्षात शौचालय व मूत्रीघराची सोय असली तरी त्याच विभागातील कर्मचार्‍यांना मात्र बरेचदा घरचा रस्ता पकडावा लागत आहे. सोबतच ग्रामखेड्यातून आलेल्या नागरिकांची तर मोठी गोची होत आहे. येथे मूत्रीघर व केवळ दोन शौचालय आहेत. पण ते येथे येणार्‍या नागरिकांचा विचार करता ही सुविधा नगण्यच आहे. 

चंद्रपूर जिल्हा परिषदेने कागदी घोडे नाचवून यापूर्वी आयएसओ, गतिमानता, पंचायत राज असे विविध पुरस्कार पटकाविले आहेत. पण जिल्हा परिषदेच्या समस्यांकडे नजर टाकल्यास हे पुरस्कार केवळ कागदी घोड्यांवर मिळविले की काय? असा प्रश्न येथे येणार्‍या नागरिकांसह स्थानिक झोलबा पाटलाच्या वाड्यात कार्यरत कर्मचारीही करू लागले आहेत. याकडे स्थानिक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील लोकसंख्येचा विचार करता येथे शौचालय व मूत्रीघराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Sunday, November 17, 2013

चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले

चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले


चंद्रपूर: जिल्ह्यातील साईबाबा ज्ञानपीठ शाळेच्या पटांगणावर आज अनेक चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले. 
सचिन निवृत्त होऊ नये या मागणीसाठी या चिमुकल्यांनी सचिनला साकडं घातलं. यासाठी त्यांनी चेहऱ्यावर सचिनचे मुखवटे चढवले आणि सचिननं निवृत्त होऊ नये अशी गळ घातली. 
बालदिनानिमित्त आज देशातील विविध शाळांमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी चिमुरड्यांनी सचिनविषयीचं प्रेम अनोखा पद्धतीनं व्यक्त केलं.

माहितीच सादर न केल्याने दीड हजार कर्मचारी वेतनदरापासून वंचित

माहितीच सादर न केल्याने दीड हजार कर्मचारी वेतनदरापासून वंचित

चंद्रपूर - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व विशेष भत्त्याचे दर सुधारित करण्याबाबतचा निर्णय महिनाभरापूर्वी शासनाने घेतला. मात्र, जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची माहितीच शासनाला सादर न केल्याने जवळपास दीड हजार कर्मचारी या नव्या वेतनदरापासून अद्याप वंचित आहेत.

ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 30 ऑक्‍टोबर 2013 ला एक अध्यादेश पारित केला. या अध्यादेशानुसार राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन व विशेष भत्ते लागू करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आले. या अध्यादेशानुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कुशल कर्मचाऱ्यांना सात हजार 100 रुपये, अर्धकुशल 6 हजार 400 आणि अकुशल कामगारांना पाच हजार नऊशे रुपये मूळ किमान वेतन लागू करण्यात आले. पाच ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे सहा हजार नऊशे, सहा हजार 200 आणि पाच हजार 700 रुपये वेतन निश्‍चित करण्यात आले. पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील कुशल कर्मचाऱ्यांना 6 हजार 300, अर्धकुशल पाच हजार 600 आणि अकुशल कामगारांना पाच हजार 100 रुपये मूळ किमान वेतन देण्याचे ठरले आहे. यासाठी शासन अनुदान देणार आहे. अनुदान देताना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा विचार केला जाणार आहे. एक लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायती शंभर टक्के, एक ते पाच लाख 90 टक्के, पाच ते 10 लाख 80 टक्के आणि दहा लाखांच्यावर असलेल्या ग्रामपंचायतींना 70 टक्के अनुदान शासन देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनाचा खर्च संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पन्नातून करायचा आहे. मात्र, ही वर्गवारी अद्याप शासनस्तरावर उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची वर्गवारी शासनाने सर्वच जिल्हा परिषदांना मागितली. राज्यातील काही जिल्हा परिषदांनी ही माहिती पाठविली आहे.
सचिनचा यथोचित सन्मान

सचिनचा यथोचित सन्मान

मुंबई, दि.16 : भारतातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी निवृत्त होतांना भारतसरकारने भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान जाहिर करुन त्याचा यथोचित असा  योग्यवेळीकेलेला सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेता  भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी दिली आहे. श्री.खडसे पुढे म्हणतात, सचिन तेंडुलकर ही देवाने क्रिकेटलादिलेली देणगीच म्हटली पाहिजे. मैदानात जसे त्याने उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळले त्याचप्रमाणे त्याचेमैदाना बाहेरील वर्तनही त्याला साजेसेच राहिले. त्याचा शांत स्वभाव, नम्रपणा, खेळातील शिस्त,आत्मविश्वास या गोष्टींमधुन नव्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.
        सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा देतांना श्री.खडसे पुढे म्हणतात, राज्यात भाजपा-शिवसेनायुतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्तभारतीय क्रिकेट संघ विरुध्द राज्य मंत्रीमंडळातील मंत्री यांच्यात 10-10 षटकांचा सामना ठेवण्यातआला होता. तेव्हा सचिन बरोबर खेळायची  त्याचा खेळ जवळून पाहण्याची मलाही संधी मिळाली,तो क्षण भाग्याचा  खूप आनंद देणारा होता. सचिनच्या जीवनातील दुसरी इनिंगही त्याच्यापहिल्या इनिंग एवढी उत्तुंग होवो अशा शब्दात श्री.खडसे यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.