काव्यशिल्प Digital Media: पुणे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

Wednesday, February 06, 2019

पोलीस कॉन्स्टेबल एस.एल.खाडे यांचा गौरव

पोलीस कॉन्स्टेबल एस.एल.खाडे यांचा गौरव



पुसेसावळी (राजु पिसाळ): 
तडवळे (ता.खटाव) या गावचे रहिवाशी असलेले व औंध पोलिस स्टेशन अंतर्गत पुसेसावळी दुरक्षेत्रामधील पोलिस कॉन्स्टेबल एस.एल.खाडे यांना विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते विशेष प्रशंसापत्राने गौरवण्यात आले,
सन २०१८ मध्ये पुसेसावळी हद्दीतील कळंबी गावाजवळ सोन्याच्या व्यापार्‍याला११ लाखांच्यावर गंडा घालणार्‍या संशयित आरोपींना ४ तासाच्याआत मुद्देमालासह जेरबंद करण्यात मोलाचा वाटा उचलला होता,
या विशेष उल्लेखनिय कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, स.पो.नि 
सुनिल जाधव, पोलिस उपनिरीक्षक विलास कुबले,हवालदार चंद्रकांत पाटील,गोपीनाथ खाडे ,सुनिल खाडे राहुल खाडे, सचिन खाडे, विकास साबळे, काका साबळे आदिंसह तडवळे व पुसेसावळी ग्रामस्थांनी अभिनंदन केले,

Monday, February 04, 2019

शताब्दी शाळेची हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे

शताब्दी शाळेची हटकेश्वर ज्ञानमंदिर गोद्रे


जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्यातील १००%आदिवाशी समाज असलेल्या गोद्रे येथील जिल्हा परिषदेच्या ज्ञानमंदिर शाळेस १००वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर रेंगडे यांनी दिली.
आदिवाशी भागातील हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोद्रे या गावात १जून १९१९ रोजी इंग्रज शासनाने मराठी प्राथमिक शाळा सुरु केली.ही शाळा आता जिल्हा परिषदेमार्फत चालविली जाते.शाळेचे सध्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असे आहे.या शाळेस पूर्वीचेच नाव देण्यात यावे याबाबत जिल्हा परिषदेने ठराव करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पूर्वी ज्ञान मंदिर गोद्रे असे नाव होते.

शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ९व १० फेब्रुवारी  रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
९ फेब्रुवारी सकाळी प्रभात फेरी,महोत्सवाचे उद्घाटन आदिवाशी मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते होत आहे.यावेळी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण व इतर  मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. क्रिडास्पर्धा, राज्यस्तरीय काव्य संमेलन यामध्ये कवी तुकाराम धांडे व अन्य कवी उपस्थित राहणार आहेत.तसेच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा ,महिलांसाठी पारंपारिक गीतगायन ,भजनी मंडळाचा कार्यक्रम
तर १० फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा , राहुल शिंदे यांचे शिवव्याख्याण, आदिवाशी संस्कृती व संवर्धन कांबडानृत्य (उडदावणे ता.अकोले )त्याचप्रमाणे  गुणगौरव सन्मान सोसोनवणे  व माजी मंत्री मधुकर पिचड ,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरददादा सोनवणे व तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थित होत आहे.या शताब्दी महोत्सवास गोद्रे ग्रामस्थ  व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येणार आहेत असेही शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष  मधुकर रेंगडे यांनी सांगितले .

Sunday, February 03, 2019

Marathon मँरेथाँन स्पर्धा 5 फेब्रुवारीला

Marathon मँरेथाँन स्पर्धा 5 फेब्रुवारीला

जुन्नर /आनंद कांबळे 

जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरुवर्य रा.पृ सबनीस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने येत्या ५ फेब्रुवारी भव्य मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष संभाजी बुट्टे पाटील, माजी सेक्रेटरी अँड.सुधीर ढोबळे ,माजी विद्यार्थी संघाचे राजेंद्र जुंदरे ,आनंद सासवडे उपस्थित होते.

गुरुवर्य रा.प सबनीस यांच्या जयंतीनिमित्ताने  मंगळवारी ( ता.५) सकाळी ७.१५ वाजता मँरेथाँन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद् घाटन विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी माजी विद्यार्थी डाँ.दिलीप बांबळे, पोलिस निरिक्षक यशवंत नलावडे उपस्थित राहणार आहेत. 

त्याचप्रमाणे जुन्नर शहरातून शोभायात्रेचे आयोजन केले असून यामध्ये जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखेतील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी , व नागरिक  तसेच आमदार शरददादा सोनवणे ,नगराध्यक्ष शाम पांडे सामील होत आहेत असेही राहुल जोशी यांनी सांगितले .

वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

दुपारी पारितोषिक वितरण होत असून यावेळी सत्यशील शेरकर,अनिलतात्या मेहेर , अप्पासाहेब बुट्टे  पाटील उपस्थित राहणार आहेत.

गुरुवर्य रा.प सबनीस यांनी जुन्नर तालुक्यात केलेल्या भरीव शैक्षणिक कामामुळेच तालुक्याची शैक्षणिक प्रगती झाली आहे.

Friday, February 01, 2019

शिवजन्म सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पायथ्याशी दाखविणार

शिवजन्म सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पायथ्याशी दाखविणार

पू

शिवजयंती सोहळा नियोजनाची आढावा बैठक

मुख्यमंत्री, राज्यपालांसोबत अनेक मंत्र्यांची उपस्थिती.

शिवभक्तांच्या स्वागताची जुन्नरकरांची जंगी तयारी

जुन्नर, दि. १ (वार्ताहर) - संपूर्ण भारताचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जुन्नर येथे आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाची नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी प्रांत अजित देशमुख, उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना व सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षी साजरा केल्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून पाणी अडवा-पाणी जिरवा, बंधाऱ्यांची कामे आदी मोहीम मोठया प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. याकरिता जुन्नर तालुक्यातील जनतेने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.



मंत्रीगणांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळ्याचा मुख्य कार्यक्रम गडावर सुरू असताना किल्ल्यावरील जागेअभावी सर्व शिवभक्तांना गडावर सोडले जात नसून त्यांच्याकरिता प्रथमच किल्ल्यावरील जन्मसोहळ्याचे थेट प्रक्षेपण गडाच्या पायथ्याशी दत्तमंदिराजवळ दोन मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक असून सदर कार्यक्रम झाल्यावर सर्व नागरिकांना किल्ल्यावर सोडण्यात येणार असून स्थानिक नेत्यांनी व येणाऱ्या शिवभक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदारांनी केले.


येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या प्रसंगी येणाऱ्या गाड्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी दत्त मंदिर परिसरात चार ठिकाणी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून गडाच्या पायथ्याशी खाजगी गाड्यांना प्रवेश नसल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सांगितले. किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर प्रकाशव्यवस्था करण्यात येणार असल्याचे महावितारणाचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे यांनी सांगितले. 


येणाऱ्या शिवभक्तांसाठी चार आरोग्य पथके आणि १०८ च्या चार व परिसरातील ११ रुग्णवाहिका कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी दिली. तर पाण्याचे १५ टँकर व १५० फिरती शौचालयांची व्यवस्था याप्रसंगी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी सांगितले. पुरातत्व विभाग व वनविभागाच्या वतीने गडावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय व वृक्षारोपण आदींची व्यवस्था करण्याबाबत पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले. जुन्नर नागरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांची डागडुजी, विविध ठिकाणची रोषणाई, अग्निशामक बंब आदी कामे करणार असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी किल्ले परिभ्रमण मार्गावर विजव्यस्था आणि वाढलेल्या झाडांबाबत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काजळे यांनी सूचना केली. 


याप्रसंगी शिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय दुराफे, मराठा महासंघाचे राजेंद्र कुंजीर, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान घोलप, युवासेनेचे गणेश कवडे, बारवचे सरपंच संतोष केदारी, नगरसेवक समीर भगत, फिरोज पठाण, 

तहसीलदार हनुमंत कोळेकर, संतोष वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वनपाल कृष्णा दिघे, कृषी विभागाचे बापू रोकडे, समीर हुंडारे, सिद्धेश ढोले, संदेश जुंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.


चौकट- विविध विकास कामांचे उदघाटन-

किल्ल्यावरील जन्मसोहळा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री व मंत्रीगण ओझर याठिकाणी विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार.

अष्टविनायक जोड प्रकल्पातील सुमारे ३०० कोटींच्या रस्त्यांची व इतर विकासकामांचे भूमिपूजन झाल्यावर मुख्यमंत्र्यांची ओझर येथे सभा होणार.

२) दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमित् सामाजिक ,शैक्षणिक ,पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींना शिवनेरीभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

Tuesday, January 29, 2019

जुन्नर महाविद्यालय व डॉ. मंडलिक यांना पुरस्कार

जुन्नर महाविद्यालय व डॉ. मंडलिक यांना पुरस्कार

जुन्नर/आनंद कांबळे 

जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना अनुक्रमे “उत्कृष्ठ महाविद्यालय” (ग्रामीण) व “उत्कृष्ठ प्राचार्य” पुरस्कार देवून रोटरी इंटर नॅशनल पुणे डीस्ट्रीकट,यांनी सम्मानित केले.

रोटरी इंटर नॅशनल समाजातील शैक्षणिक, औद्योगिक,शास्त्र, इंजिनिअरिंग,आर्थिक क्षेत्रातील विशेष कार्य करणा-या संस्था.व व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करत असते.जुन्नर तालुक्यातील आदिवासी,डोंगराळ व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचा बौधिकच नव्हे तर सामाजिक व आर्थिक दर्जा वाढविण्यासाठी गेले पन्नास वर्ष श्री शिव छत्रपती महाविद्यालय कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व विश्वस्थांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी महाविविद्यालायाचा विकास करत असून पुणे विद्यापीठ क्षेत्रात एक नामवंत आणि उपक्रमशील महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाचा नाव लौकिक आहे.

महाविद्यालयात अकरावी ते संशोधनापर्यंतचे शिक्षण दिले जात आहे.त्या शिवाय बीबीए,बीसीए,आय.टी.व इलेक्ट्रोनिक्स,अभ्यासक्रम अद्यावत संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून चालविले जातात.परंपरागत शिक्षणाबरोबर महाविद्यालयाने विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी युजीसी प्रस्तुत जी.आय.एस.टॅव्हल.अॅड.टुरिझम,Functional English,Enviornment protection,Womens study Centre,Humanright, Remidial Coaching ,Financial Accounting Etc.सुरु केले आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवत मार्च २०१८ मध्ये १२ वी सायन्स चा निकाल ९७.५ % लागला.आहे विद्यापीठ परीक्षेत कु.श्रेया सर्जीने,कु.प्रियांका शिंदे ( रसायनशास्त्र) कु.पोर्णिमा गवारी (गणित) यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.तर एम.एस्सी.प्राणीशास्त्र विषयाचा निकाल १००% लागला.विद्यार्थांना शिक्षणाची विविध शाखातून ज्ञानाची दारे उघडी केल्याने महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी परदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत देखील आहे.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेंना,कमवा व शिका योजना,महिला अभ्यास केंद्र,विद्यार्थी व विद्यार्थिनी कल्याण मंडळ,वाड्मय मंडळ,प्रभावीपणे विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक हे संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची धुरा प्रभावीपणे सांभाळीत आहे.त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी.केलेली असून जपान,श्रीलंका,इंडोनेशिया इ.देशात भारतीय संस्कृती कार्टून फिल्मस आणि पर्यावरण व मानवी जीवन या विषयावर व्याख्याने दिली असून ३७ शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेली चार पुस्तके लिहिली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदातून रिसर्च पेपर सादर केले आहेत.तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना “आदर्श कार्यक्रम अधिकारी” इतर संस्थांकडून उत्कृष्ठ अभ्यास “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विद्यार्थी शाररिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी महाविद्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असू अद्यावत प्रयोगशाळा सहकार महर्षी कै.शिवाजीराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारत डौलाने उभ्या आहेत.तसेच इंडोर गेम सभागृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्रा.व्ही.बी.कुलकर्णी.प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक मदत करत असतात. या सर्व गोष्ठींचा विचार करून रोटरी इंटरनॅशनल महाविद्यालयास “उत्कृष्ठ महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना “उत्कृष्ठ प्राचार्य”पुरस्कार बहाल केले आहेत त्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्य यांचे विविध संस्थांकडून मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

Saturday, January 26, 2019

पोल्ट्री फिडच्या किंमती आणखी भडकल्या;पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता

पोल्ट्री फिडच्या किंमती आणखी भडकल्या;पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता

पुणे/प्रतिनिधी:20 जानेवारी पासून वाढले 
  पोल्ट्री फिड कंपनीचे भाव 


आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले.ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला आहे.याचा थेट परिणाम कुक्कुटपालन व डेअरी व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. 
सोयाबीन आणि मक्याचे भाव वाढल्याने
 खाद्य विक्रीवर परिणाम
राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी ही योग्य दरपातळी आहे, किमान निम्मा माल या किमतीला विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल ३४०० रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३१०० ते ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. दिवाळीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना मातीमोल भावात सोयाबीन विकावे लागले होते. ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेने माल साठवून ठेवला, त्यांना याचा लाभ होणार आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतीमालाची खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचा फायदा सोयाबीनला झाला. गेल्या तीन महिन्यांत इराणकडून सोयाबीनची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच दुष्काळ आणि अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे देशातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाकडून सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांत जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना राबवली होती. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. या योजनेचे या आठवड्यात सूप वाजणार असून, त्यामुळे बाजारातील फुगवटा कमी होणार आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राज्यात सोयाबीनच्या दरात उसळी आली आहे.



‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे सोयाबीनचे दर ३८०० रुपयांपर्यंत गेले आहेत. हंगाम संपेपर्यंत या दरात आणखी १०० ते २०० रुपयांची वाढ होऊ शकते, परंतु तोपर्यंत माल साठणवुकीचा खर्च आणि व्याज यांचे गणित केले तर आताच माल विकणे फायदेशीर ठरेल,'''' असे शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले.
यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने ‘नाफेड''च्या माध्यमातून सुरू केलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. 

मागील हंगामात मक्‍याची एकट्या जळगाव जिल्ह्यात ७० हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. आवक मार्चपासून वाढली. ती जूनअखेरपर्यंत कायम होती. कमाल दर १२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले होते. परंतु यंदा खरिपातील मक्‍यास १७०० पर्यंत दर मिळाले. सद्यःस्थितीत जे दर आहेत, ते २००० रुपये प्रती क्विंटल पेक्षा जास्त झाल्याने आता पशुखाद्यचे म्हणजेच कुक्कुपालन व्यवसायात लागणाऱ्या पशुखाद्यचे भाव कमी होणार नाही कारण मार्चपर्यंत आवक वाढणार नाही.मागील हंगामाच्या तुलनेत या रब्बीमधील मक्‍याचे दर किमान २००० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. जेव्हा मार्च अखेर भाव उतरणार नाही असे पक्के असल्याने पोल्ट्री फीडचे देखील भाव वाढणार नाही,त्याचे कारण पोल्ट्री फीड बनविण्यासाठी जास्तीत जास्त सोया आणि मका याचा वापर होतो.कच्चा मालाच्या किमती वाढत असल्याने याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि दुध डेअरी व्यवसायावर होणार असल्याने पोल्ट्री फार्मर्सची वाढली चिंता आणखीनच वाढली आहे. 

पोल्ट्री व्यवसायात कोंबड्या मोठ्या झाल्यावरचा विक्री भाव आणि संपूर्ण खाद्य,देखरेख,औषध,यावर केलेला खर्च हा पोल्ट्री व्यवसायिकांना परवडणारा नसल्याने पोल्ट्रीफार्मिंग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.सध्या महाराष्ट्रात  कुक्कुटपाल पशुखाद्य बनवणारी न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फार्मर्सची चिंता मात्र मिटलेली दिसत आहे. कारण या कंपनीच्या खाद्यची डिमांड गेल्या काही दिवसातच २००० टनहून अधिक वाढली आहे. कंपनीचे अधिकृत डीलर यशोधरा कामडी यांचेकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले, गेल्या काही दिवसात बाजारात जरी पशुखाद्य  बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असतील तरी मात्र  न्युट्रीक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या पशुखाद्याचा दर्जा घसरवला नाही,पहिले पासून आज परियंत आम्ही पोल्ट्री व्यवसायिकांना  एकाच प्रकारचे खाद्य पुरवीत आलो असल्याने फार्मर्स ५० रुपये अधिक रक्कम जादा दराने देऊन न्युट्रीक्राफ्ट कंपनीचेच फीड घेत आहेत,याचा दुसरा फायदा सांगतांना  कामडी म्हणाल्या संपूर्ण ब्याच विक्रीसाठी निघतांना फार्मर्सला संपूर्ण  लागणारा खर्च वगळता बऱ्यापैकी फायदा होतो. त्यामुळे आज आमच्या खाद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
  
पोल्ट्री फार्मर हे वारंवार फीड कंपनीला नफा कमवायच्या मागे लागले आहेत व यातून डीलर जास्त नफा कमविणार असल्याचे आरोप करतात.मात्र या संपूर्ण प्रकारावरून पोल्ट्रीफीड का महाग झाले याचे कारण समजू लागले आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मर्सनी चांगल्या कंपनीचे खाद्य वापरावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी असे म्हटले.
संपर्क:९१७५९३७९२५ 

(सदर वृत्त हे सकाळ माध्यम समुहाच्या agrowon या वृत्तपत्रातून घेण्यात आले आहे.)

Monday, January 21, 2019

सह्याद्री ट्रेकर्सच्या सायकलस्वारांनी मायणी ते जगन्नाथपुरी (१६५०किमी) ची मोहीम केली फत्ते

सह्याद्री ट्रेकर्सच्या सायकलस्वारांनी मायणी ते जगन्नाथपुरी (१६५०किमी) ची मोहीम केली फत्ते

पर्यावरण संतुलन व वृक्षलागवडीचा समाजाला दिला संदेश
मायणी/सातारा:

सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या नऊ सदस्यांनी ६ जानेवारीला मायणीतून निघून जगन्नाथपुरी (ओरिसा) पर्यंत सुमारे सोळाशे पन्नास किलोमीटपर्यंत प्रवास सायकलने करीत आज जगन्नाथपुरी येथे सुखरूप पोहचून आपली सायकल रायडींग ची मोहीम फत्ते केली. या संपूर्ण प्रवासादरम्यान सायकल चालवा पर्यावरण वाचवा , इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम सायकल चालवा असा संदेश देत त्यांनी आपले ध्येय साध्य केले.

मायणी येथुन सहा जानेवारीला सर्वांचा निरोप घेऊन मंगळवेढा ,सोलापूर ,नळदुर्ग , ऊमरगा ,भांगुर, हैद्राबाद ,सुर्यापेठ , विजयवाडा , निडादवेल्लू ,नाकापल्ली ,राणास्थलम, हरीपुरम, मालुड, ब्रम्हगिरी यामार्गे प्रवास करीत जगन्नाथपुरी हे १६५० किलोमिटरचा सायकलचा प्रवास पूर्ण केला .या प्रवासादरम्यान सर्व सायकलस्वारना उत्तर भारतात स्थायिक असलेले गलाई व्यावसायिक बंधूनी ठिकाठिकानी स्वागत करून मुक्कामाची सोय उपलब्ध करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या सायकल मोहिमेत विजय वरुडे,शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी,सुनिल कुलकर्णी सर्व रा.मायणी ता.खटाव ,अंबरिष जोशी,किर्लोस्करवाडी ता.पलुस, मिलींद कुलकर्णी , मिरज ता.मिरज, किशोर माने सांगली व सागर माळवदे.पुणे हे नऊजण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या सर्वांचे वर ४० वर्षाहून अधिक आहे.

  यापुर्वी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारीच्या असा सायकलने प्रवास केला आहे. आता जगन्नाथपुरी हे १६५० किलोमीटर आंतर प्रवास करुन येताना रेल्वेने येणार आहेत.

(जगन्नाथपुरी येथे पोहचल्यानंतर एकत्रित आलेले सह्याद्री ट्रेकर्स चे सर्व सायकलस्वार .छायाचित्र--दत्ता कोळी )

  आजच्या धावपळीच्या युगात सर्वजण आपले आयुष्य सुधारण्यासाठी व्यावसायिक गाडा ओढत खऱ्या जीवनशैली विसरत चालले आहेत . परंतु आपल्या व्यवसायिकतेला जपत निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची उत्सुकता आणि गडकिल्ले सर करण्याची आवड असल्याने सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप च्या वतीने आम्ही सर्वांनी मायणी ते जगन्नाथपुरी हे १६५० किमीचे अंतर पार केले आहे यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आहे.
 - शिवाजी कणसे . सायकलस्वार.मायणी.
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास हेच खरे शिक्षण :सहदेव आव्हाड

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास हेच खरे शिक्षण :सहदेव आव्हाड

कारेगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन
 शिक्षकांना मिळाली विविध अध्यापन तंत्राची माहिती
 अण्णापूर - पुणे प्रतिनिधी
  शिक्षण परिषदेच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी सहदेव
आव्हाड यांचा सन्मान करताना पदवीधर शिक्षक गंगाराम थोरात,
 ब्रिटिश कौन्सिलचे राज्यमार्गदर्शक ज्ञानेश पवार , साधन व्यक्ती बेबी तोडमल ,
 शिवाजी पावशे व उपस्थित शिक्षक
 ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी हा स्वतःच्या ज्ञानाचा शोध स्वतः घेवुन ज्ञानाचे संशोधन व निर्मिती करतो. त्यासाठी त्याच्यातील अभिव्यक्ती कौशल्याचा ख-या अर्थाने विकास करणे हेच खरे शिक्षण असुन त्यासाठी शिक्षकांनी विविध अध्यापन तंत्राचा उपयोग उपयोग करायला हवा असे मत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी सहदेव आव्हाड यांनी व्यक्त केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था , लोणी काळभोर व पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. कारेगाव (ता.शिरुर )केंद्राची सहावी शिक्षण परिषद कारेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर व केंद्रप्रमुख श्रीहरी पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी शिक्षकांना संबोधित करताना आव्हाड यांनी हे विचार व्यक्त केले.
याच शिक्षक परिषदेत कारेगाव शाळेचे पदवीधर शिक्षक शिवाजी पावशे यांनी अभिव्यक्ती कौशल्ये व त्याच्या विकासासाठी वापरावयाच्या विविध तंत्राची माहिती दिली तर. पाठ शिकवताना क्यु आर कोड स्कॕनरचा अध्यापनातील वापर या विषयावर ठकाराम पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कारेगाव केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते आठवीला शिकवणारे सत्तर शिक्षक उपस्थित होते.
या परिषदेचे संयोजन पंचायत समितीच्या साधनव्यक्ती बेबी तोडमल यांनी केले. तर परिषदेचे प्रास्तविक कारेगाव शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा खैरे, सुत्रसंचालन ब्रिटिश कौन्सिलचे राज्यमार्गदर्शक ज्ञानेश पवार तर आभार पदवीधर शिक्षक गंगाराम थोरात मानले. सदर परिषद यशस्वी होण्यासाठी कारेगाव शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. एकंदरीत या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने कारेगाव केंद्रातील शिक्षकांना विविध अध्यापन तंत्रासह गटकार्याच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त होता आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याच्या विकासासाठी विविध मार्गांचा नव्याने शोध घेता आला हे विशेष.

राज्यातील लिपीकांचा २२जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा

राज्यातील लिपीकांचा २२जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा

पुणे/प्रतिनिधी:
 राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपीकवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने दिनांक २२जानेवारी रोजी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बोरसे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी त्या त्या जिल्हा शाखेच्या माध्यमातून भव्य इशारा मोर्चा आयोजित करण्यात येणार असलेची माहिती शिरुर तालुका अध्यक्ष इंद्रजित जाधव यांनी दिली. या इशारा मोर्चाच्या पुर्वतयारीसाठी तालुकास्तरीय नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते . तेव्हा ही माहिती त्यांनी दिली . 

आपल्या मागण्यांकरीता संघटनेने अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार केला असुन त्याबाबत राज्यस्तरावर बैठकांचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र शासनाने या न्याय व रास्त मागण्या मान्य न केल्याने लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना मोर्चाचे आयोजन करावे लागत असल्याचेही इंद्रजित जाधव यांनी यावेळी नमुद केले. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी पुणे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्य सरचिटणीस उमाकांत सुर्यवंशी, जिल्हा संघटक शेखर गायकवाड , पुणे जिल्हाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व विभागातील लिपीक वर्गीय कर्मचारी सहभागी सहभागी होणार असुन पदवीधर शिक्षक संघटना तसेच ग्रामसेवक संघटनेनेही या मोर्चाला पाठींबा जाहीर केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . या नियोजन सभेच्या वेळी शिरुर तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्या
१.लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे.२. कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचे अन्यायकारण धोरण रद्द करणे. ३. नवीन अंशदायी पेन्शन ऐवजी जुनी पेन्शन योजना लागु करणे ४. वरिष्ठ सहाय्यकांची ७५ टक्के पदे नियमित पदोन्नतीने व उरलेली २५ टक्के पदे सेवापरीक्षेद्वारे भरण्यात यावीत.५. बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे लिपीकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ १०,२०,व३० या तीन टप्प्यात करण्यात यावा. ६ . शिक्षण विभागात तालुक्यात केंद्रस्तरावर एक कनिष्ठ सहाय्यक व बीटस्तरावर एक वरिष्ठ सहाय्यक पदांची निर्मिती करण्यात यावी. ७.शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरबांधणी व मोटारसायकल अग्रीम मंजुर करणेत यावा. ८. वैद्यकीय उपचारांसाठी कॕशलेख सुविधा तात्काळ सुरु करावी.९.या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणात इतर कर्मचा-यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात. तसेच सुधारित आकृतीबंध तात्काळ तयार करुन त्यानूसार लिपीक पदांची कंत्राटी ऐवजी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची भरती करावी यासह एकुण १४ मागण्या संघटनेच्या आहेत.

Wednesday, January 16, 2019

मलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट

मलठणमधील सावित्रीच्या लेकींची थांबली पायपीट

महिला व बालकल्याण विभागाकडुन विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप
अण्णापूर - पुणे (प्रतिनिधी ) 

वाडीवस्तीवरुन पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिंनीकरीता पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सायकल वाटप केले जाते. यावेळी मलठण ( ता.शिरुर )येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तेरा विद्यार्थिंनींना नुकतेच जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. दरम्यान या सायकली मिळाल्यामुळे सावित्रीच्या या लेकींची शिक्षण घेण्यासाठी होणारी पायपीट थांबली असुन नव्या उत्साहाने व उमेदीने त्या शाळेत येणार आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुनिताताई गावडे यांच्या निधीतुन मंजुर झालेल्या येथील अंगणवाडी इमारतीचे भुमिपुजनही करण्यात आले. यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे, जिल्हा परीषद सदस्य सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्य डाॕ. सुभाष पोकळे, मलठणचे सरपंच सुहास थोरात, माजी सरपंच कैलास कोळपे, पोलिस पाटील अर्चना थोरात, केंद्र प्रमुख रामदास बोरुडे, मुख्याध्यापक पाटीलबा मिडगुले, तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित पदवीधर शिक्षक सुभाष जाधव, तंत्रस्नेही शिक्षिका रेखा पिसाळ, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संपत गायकवाड, प्रकाश गायकवाड, दत्ता गायकवाड, संदीप गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नरवडे, ग्रामसेवक विलास शिंदे, शिक्षक नेते अॅड. युवराज थोरात, नामदेव दंडवते, सुदाम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांचेसह अनेक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक पाटीलबा मिडगुले , सुत्रसंचालन शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मानसी थोरात, यांनी तर आभार संतोष दंडवते यांनी मानले.


Thursday, January 10, 2019

विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेत अवयवदान करा

विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेत अवयवदान करा

जुन्नर /आनंद कांबळे:

जुन्नर तालुक्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेत अवयवदान करा ,याबाबत एक अंध व्यक्ती प्रचार व प्रबोधन करत आहे.

त्यांचे नाव श्री. विनायक विश्वनाथ नावरांगे, (यावली शहिद,) विदर्भ, संत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून आले आहेत विशेष म्हणजे ते एकटे आले आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षी कावीळ या रोगामुळे त्यांनी दृष्टी गेली, नंतर त्यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन मध्ये पुढील शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी अंध लोकांची ब्रेल या शास्त्रज्ञाने विकसित केलेल्या ब्रेल लिपी, वेगवेगळे उपजीविकेसाठी लागणारे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
साधना ताईंनी त्यांचा विवाह एका अनाथ मुलीशी लावून दिला, आत्ता त्यांना दोन मुले आहेत. पण आपल्या मध्ये काहीतरी कमी आहे म्हणून या व्यक्तीने दुसऱ्यांच्या आधाराची अपेक्षा न ठेवता जीवन जगायला सुरुवात केली. 
आज ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील संस्था, शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन अवयव दानाचे महत्व पटवून देताना आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याच थोडक्यात माहिती द्वारे उद्बोधन करायचं काम चालू आहे. 
वयाच्या चाळीशीत सुद्धा हा माणूस लोकांना प्रेरणादायी ठरत आहे.ऐश्वर्या राय बच्चन यांच्या संस्थेने त्यांना एक लाख रुपयाची मदत करून हैद्राबाद येथे येत्या फेब्रुवारी मध्ये त्यांच्या एक डोळ्याचे रोपन होणार असण्याची माहिती त्यांनी दिली.त्यांनी आज जुन्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जुन्नर येथे त्यांचा एक छोटा उद्बोधनाचा कार्यक्रम घेतला. 
श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्रा.गौरव कांबळे यांनी याबाबत पुढाकार घेवुन कार्यक्रमाचे नियोजन केले.. डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी शाळेत कार्यक्रम घेण्यास पृरवानगी दिली.,आकाराम कवडे सर यांनी विशेष सहकार्य करून एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. 
विनायक नावरांगे यांनी अवयव दान आणि आरोग्याविषयी माहिती दिली आणि संस्कार गीत गाऊन दाखवले. विशेष म्हणजे त्यांनी आवाहन केले की कुणाच्या घरी अपंग लोक असतील तर त्यांना मदत मिळवून देण्याचं प्रयत्न मी करेल. 
अशा अपंग लोकांना मदत करण्याचं काम आमदार बच्चू भाऊ कडू हे करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
श्रीलंका मधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात डोळे भारतामध्ये आणले जातात अन कित्येक अंध लोकांना दृष्टी मिळते. 
यामागील करण एक की तिथल्या सरकार ने जनतेला अवयव दान करायला अनिवार्य केले आहे.

आपल्या भारतामध्ये लोक अजूनही अंधश्रद्धे मुळे अवयव दान करत नाही. मेल्यानंतर स्वर्ग कास पाहणार अश्या इत्यादी गैरसमज. याबाबत आपण सर्वांनी जनजागृती करायला हवी. मी सुद्धा अवयव दान करायचा निर्णय घेतला आहे आणि तुम्ही पण करावा अशी इच्छा बाळगून आहे.
तुमच्या आमच्या सारख्या डोळस असून अंध असलेल्या माणसांना या व्यक्तीने दृष्टी देण्याचा प्रयत्न अस म्हणता येईल.

Wednesday, January 09, 2019

आमदाबाद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे

आमदाबाद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे


  •  ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमानुसार बालआनंद मेळावा 
  • आठवडे बाजाराचे आयोजन,  चिमुरड्यांनी अनुभवली खरेदीविक्री

अण्णापूर- पुणे (प्रतिनिधी  )-शालेय जिवनातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे. व्यवसाय करताना वस्तू खरेदी करून ती वस्तू नफ्यात कशी विकावी हे कौशल्य प्राप्त व्हावे, तसेच ग्राहकांशी कसे बोलावे? आपली वस्तू कशी चांगली आहे हे पटवून देण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करून घ्यावी. त्याचबरोबर मुलांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आमदाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार भरवला होता. शेजारच्या मलठण गावचा आठवडे बाजार मंगळवारीअसतो. मात्र, तत्पुर्वी एक दिवस अगोदर आमदाबादच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सोमवारी (दि.७ जानेवारी ) सकाळी बाजार भरल्याने एकच किलबिलाट झाला. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी काही दिवस आधी विद्यार्थ्यांना कल्पना दिल्याने या आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. या बाजारात प्रामुख्याने सध्या शेतात असलेली पिके जास्त प्रमाणात दिसून आली.
कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, पालक, वांगी, मिरची, गवती चहाची पाने, हरभरा, चिंचा इत्यादी शेतमाल त्याचबरोबर कागदाच्या वस्तू, विविध खाद्यपदार्थ विक्री करिता मुलांनी  आणले होते. या बाजाराचे उद्घाटन आमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदाबादच्या सरपंच लता न-हे, उपसरपंच जिजाबाई माशेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रंगनाथ थोरात, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितिन थोरात, माजी अध्यक्ष पोपटराव जाधव , माजी उपसरपंच संदिप जाधव, पदवीधर शिक्षक संघटनेचे सल्लागार गंगाराम थोरात , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  दत्तात्रय साळवे,माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश सोनार , मलठण केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास बोरुडे यांचेसह गावातील प्रमुखांनी भेटी देऊन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत खरेदीचा आनंद लुटला.. शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन फलके, पदवीधर शिक्षक सुनिता जगताप  यांनी उत्तम नियोजन  केले. तर पदवीधर शिक्षक मनोज गांधी  यांनी आभार मानले. शाळेचे सहशिक्षक आबा पवार,शिक्षक समितीचे सरचिटणीस नामदेव गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. एकंदरीत पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारात यशस्वी उपयोग करण्यासाठी आमदाबाद शाळेने राबविलेल्या आठवडे बाजार सारख्या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.  

[ चौकट - वाण म्हणून पुस्तके वाटप.
शाळेतील आठवडे बाजार निमित्त शाळेतील शिक्षक  व व्यवस्थापन समितीने  हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही केला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाण म्हणून पुस्तके वाटप करण्यात आली.  शाळेच्या वतीने महिला शिक्षिका सुनिता जगताप, विद्यार्थी यांच्या हस्ते आलेल्या प्रत्येक महिला पालक व गावातील शाळेला भेट देणाऱ्या महिलांना पुस्तकरुपी वाण देण्यात आले. यावेळी माजी सरपंच योगेश थोरात, तसेच विद्यमान सरपंच लता न-हे यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्याचे आवाहन यावेळी केले. पदवीधर शिक्षक मनोज गांधी यांनी  शाळेने राबवलेले विविध उपक्रम व मुलांच्या प्रगतीबद्दल माहिती उपस्थित पालकांना दिली.
[आमदाबाद (ता.शिरुर ) बाल आनंद मेळावा अंतर्गत येथील प्राथमिक शाळेत आयोजित आठवडे बाजार खरेदीचा आनंद लुटताना केंद्रप्रमुख रामदास बोरुडे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय साळवे , सुनिता जगताप,मनोज गांधी,जनार्दन फलके व पालक व ग्रामस्थ.]

Tuesday, December 25, 2018

पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा तरुण ताब्यात

पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा तरुण ताब्यात


पुणे/ प्रतिनिधी
लष्कराच्या गणवेशात वावरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाकडे एक बनावट ओळखपत्र आढळून आलं आहे. तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं वानवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. वानवडीच्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये एक तरुण लष्कराच्या गणवेशात फिरताना आढळून आला. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि कमांड हॉस्पिटल लष्कराच्या हद्दीत येतो. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी कमांड हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. याच भागात एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना दिसला. या तरुणाला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे लष्कराचा गणवेश आणि बोगस ओळखपत्र आढळून आलं. या तरुणाची वानवडी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

Sunday, December 23, 2018

ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक

ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक


 जुन्नर - ऑल इंडिया उलमा बोर्ड़ ची जुन्नर येथे बैठक झाली. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाची जमीन, अतिक्रमण ,घोटाले या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यात महारष्ट्र मध्ये वक्फ बोर्डची 3 लाख एकर जमीन आहे. जमिनीवर महाराष्ट्र सरकारचा ६० वर्षापासून कब्जा आहे. महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्डला वक्फ बोर्ड जामिनीचे भाड़े देत नाही . ऑल इंडिया उलमा बोर्ड ला महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्ड मंडळाच्या जामिनीचे भाड़े म्हणून वक्फ बोर्डला एक हजार कोटि रुपये दयावे. महाराष्ट्र सरकार ने वक्फ बोर्ड़ मंडळाच्या जामिनीचे सर्व साढ़ेसात कोटी रुपये देवून पुणे व परभणी या जिलयमध्ये चालू केला आहे .
वक्फ बोर्ड मालमत्ता सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाले झाले आहे. काही वक्फ बोर्डची संपत्ति मध्ये सर्वेमध्ये नोद होवू नये म्हणून पैसे देवून वक्फ बोर्ड मंडलाची जामिनीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
वक्फ बोर्ड मण्डलचा सर्वे व चौकशी विभागीय आयुक्त मार्फत करण्यात यावी. वक्फ बोर्ड मंडलाची अतिक्रमण, खोटे कागदपत्रे तयार करुण वक्फ बोर्ड जमीन विकन्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे सी ई ओ नसल्याने हजारों फाइल्स वक्फ बोर्ड मध्ये प्रलबित पडली आहे.
ऑल इंडिया उलमा बोर्ड ची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डला नियमित सी ई ओ देण्यात यावा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड मंडळाचे चेअरमन म.म.शेख यानी राजीनामा दिला.
तसेच वक्फ बोर्डचा कालावधी सांपला आहे. आम्ही या मुख्य मागण्या घेवून महाराष्ट्र सरकार समोर निदर्शन केली आहे. डिसम्बर २०१७ रोजी हिवाळी अधिवेशन नागपुर ५ दिवस आमरण उपोषण केले होते. २६नोव्हेबर २०१८हिवाळी अधिवेशन मुम्बई आजाद मैदानवर निदर्शन केली. १८ डिसम्बर२०१८ रोजी जंतर मंतर दिल्ली येथे एक दिवस निदर्शन केले. लोकशाही मार्गाने औल इंडिया उलमा बोर्ड महारष्ट्र वक्फ बोर्ड च्या मागण्या घेवून केंद्र व राज्य सरकार व राज्य सरकार समोर मागण्या करत आहोत परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकार वक्फ बोर्ड मागण्या वर निर्णय घेण्यास तयार नाही.


या पत्रकार परिषदेला उपस्थित उलमा बोर्ड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलवी उस्मान रहमान शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन जावेद सौदागर , मौलाना मोहम्मद नकी हसन महाराष्ट्र प्रदेश जॉइन्ट सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुतबे आलम पीरज़ादे महाराष्ट्र प्रदेश एक्सेकेटिव मेम्बर निसार मकबूल शेख पुणे जिल्हा उपाध्यक्ष यासीन सय्यद जुन्नर शहर अध्यक्ष नाजिम गोलंदाज व रफ़ीक़ तकि यूसुफ शेख अशपक तीरंदाज अल्ताफ बेपारी जावेद चौगुले व अनेक सामाजिक संघटना व त्याचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती निसार मकबूल शेख यानी दिली.
परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन

परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन देण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात घेण्यात आला होता. तो निर्णय यशस्वी झाला असून संपूर्ण राज्यात आता फेब्रुवारी-मार्च २०१९ च्या दहावी, बारावी परिक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याचे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हे सर्व विभागीय मंडळांना गणक यंत्र विभागामार्फत पुरविली जात होती. परंतु २०१८ मध्ये झालेल्या फेरपरिक्षेत प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे राज्यात २०१९ आणि त्यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार, विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिक्षेची  ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असेल तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे येवून कराव्यात. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळाबाबतच्या दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यावे. फोटो चुकीचा असल्यास फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारून सही करावी. अशा सूचना शाळा महावविद्यालयांना देण्याचे आदेश विभागीय सचिवांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे, ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्याबाबतचे संकेतस्थळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे देखील मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

Saturday, December 22, 2018

वैष्णवधाम येथे महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी

वैष्णवधाम येथे महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी


  • डिसेंट फौंडेशन ने केले मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप

जुन्नर /आनंद कांबळे 

      वैष्णवधाम( ता जुन्नर )येथील काळदेवाडी या आदिवासी व डोंगरी लोकवस्तीत येणेरे च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करून, रक्ताच्या जवळपास १५ चाचण्या तपासणी साठी मंचर च्या महालॅब मध्ये पाठवून प्रत्येक माहिलेला एक महिन्याच्या रक्त वाढसाठी लोह युक्त गोळ्या मोफत देण्यात आल्या .



       डिसेन्ट फौंडेशन ,पुणे व मार्तंड देवस्थान ट्रस्ट, चिंचोली यांच्या मदतीने *'कळी उमलताना'* ..या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना वयक्तिक स्वच्छता व आरोग्य या बाबतीत डॉ सौ कल्याणी पुंडे व डॉ सौ राजश्री इंगवले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित ९० महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.

      या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश गावित ,डिसेन्ट फौंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई, आरोग्य सहायक डी एम् लांघी ,वैष्णवधाम चे सरपंच सुदाम डेरे , लॅब टेक्निशियन एस एस काळे ,जयेश चव्हाण,पारुंडे विद्यालयाचे पर्यवेक्षक फकीर आतार ,संदिप पानसरे ,विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण,दगडू पवार , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार , गणेश पवार, संतोष काशिद ,श्रीमती एस एस भारमळ, अनिता केदार ,तुकाराम केदार ,आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र बिडवाई यांनी सूत्रसंचालन राजेंद्र पवार तर आभार संदिप पानसरे यांनी केले .

Thursday, December 20, 2018

अर्थव्यवस्थेमधील प्रदूषण दूर करा; खेड्यापाड्यातील ग्राहक जागा  करा

अर्थव्यवस्थेमधील प्रदूषण दूर करा; खेड्यापाड्यातील ग्राहक जागा करा


जुन्नर /आनंद कांबळे जागरूक ग्राहक ही काळाची गरज आहे पर्यावरणाची चळवळ जेवढी राष्ट्रीय स्वरूपाची अत्यावश्यक चळवळ आहे तेवढीच ग्राहक चळवळ ही राष्ट्रीय स्वरूपाची अत्यावश्यक चळवळ आहे . अर्थव्यवस्थेमधील प्रदूषण दूर करावयाचे असेल तर खेड्यापाड्यातील ग्राहक जागा झाला पाहिजे असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी जुन्नर येथे व्यक्त केले .

अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक जागरण सप्ताहाचा शुभारंभ जुन्नर येथील जिजामाता सभागृह येथे गुरुवार दि,20।12।2018 रोजी संपन्न झाला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून औटी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जुन्नर तहसीलदार हणमंत कोळेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी विकास दांगट ,डॉ अशोक काळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर ,ग्राहक पंचायतीच्या जिल्हा महिला संघटक सौ,वैशाली आडसरे ,बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश गोडे प्रबोधनकार प्रा,पंकज गावडे ,पुरवठा निरीक्षक सुधीर वाघमारे ,रवींद्र तळपे ,संघटक सिताराम चव्हाण ,सचिव भाऊसाहेब वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते .


औटी पुढे म्हणाले जगातील उद्योग ग्राहकांच्या शोधात जगभर भीरत आहे अशावेळी सामान्य माणूस उपभोगवादाचा बळी न ठरता तो मानव कल्याणासाठी ग्रहाकवादासाठी उभा राहिला पाहिजे ,


तहसिलदार हणमंत कोळेकर म्हणाले की,ग्राहकाची दुर्बलता दूर करण्यासाठी ग्राहक वर्गाला जागरूक सुशिक्षित संघटित करून शोषण मुक्त कल्याणकारी अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान केले पाहिजे .


.यावेळी सामाजीक प्रबोधनाच्या कार्याबद्दल प्राध्यापक पंकज गावडे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले .यावेळी ग्राहक पंचायतीच्या आरोग्य समितीचे प्रमुख डॉ, अशोक काळे ,बीडीओ विकास दांगट ,अशोक भोर यांनी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन गोरक्ष लामखडे यांनी केले बाल विकास अधिकारी हरिभाऊ हाके यांनी आभार मानले

Wednesday, December 12, 2018

१००० विदयार्थ्यांना स्लीपिंग की

१००० विदयार्थ्यांना स्लीपिंग की


जुन्नर /आनंद कांबळे
रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट , पुणे फार् ईस्ट व रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने आणि स्कॉ _ कॅनडा यांचे सहयोगातून जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी व परिसरातील सुमारे ८० जि. प प्राथ शाळांमध्ये इ१ली ते४थी वर्गात शिकणाऱ्या गरजू १००० विदयार्थ्यांना स्लीपिंग कीट व स्कूल कीट चे वाटप करण्यात आले .अशी माहिती मुख्य कार्यक्रम समन्वयक वैभव पोरे यांनी दिली.
याप्रसंगी पंकज आपटे , हरपाल जी , योगेश भिडे , परवेझ बिली मोरिया ,ख्रिस हिल्स हे सर्व संस्था प्रतिनिधी व त्यांचे सहकारी तसेच जि.प सदस्य देवरामजी लांडे , गटविकास अधिकारी दांगट , आदिवासी विभाग आयुक्त प्रसाद , गटशिक्षणाधिकारी मेमाणे व इतर मान्यवर उपस्थित होते .
अतिशय सुंदर व नियोजनबद्ध झालेल्या या कार्यक्रमात १००० मुलांना सुमारे ५० लक्ष रु चे साहित्य वितरण करण्यात आले . सर्व लाभार्थी मुले व पालक हे सर्व साहित्य मिळाल्याने आनंदी झाली ! तसेच या सर्व विद्याथ्र्यांची नेत्रतपासणी - उपचार व संदर्भ सेवा एच व्ही देसाई रूग्णालय मार्फत देण्यात आली .

Tuesday, December 11, 2018

शासन तुपेंच्या पूर्णपणे पाठीशी राहणार:दिलीप कांबळे

शासन तुपेंच्या पूर्णपणे पाठीशी राहणार:दिलीप कांबळे

 पुणे /प्रतिनिधी: 

उत्तम बंडू तुपे हे थोर साहित्यिक आहेत .महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे .परंतु असा साहित्यिक दयनीय जीवन जगत असल्याचे माध्यमातून समजले. त्यामुळे शासन अशा थोर साहित्यिकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले ,ते तुपे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते.

त्याचबरोबर त्यांच्या घराचा आणि वैद्यकीय उपचाराचा प्रश्नही सरकार सोडवणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचा दैनंदिन खर्चाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे शासन स्तरावर चालू असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिकेच्या आरोग्य योजनेतून त्यांना वैद्यकीय मदत तसेच bsup योजनेतून त्यांना आहे त्या ठिकाणी चांगले घर महापालिका आणि नगरसेवकांच्या माध्यमातून बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले .या पुढे अशा दुर्लक्षित साहित्यिकांना अडचणीच्या काळात कायमस्वरूपी मदत करण्यासाठी महापालिकेत ठराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी 25 हजार आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी 25 हजार रुपये धनादेशद्वारे तुपे यांना वैयक्तिक दिली.

Tuesday, December 04, 2018

आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार

जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर येथील प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद कांबळे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने शिर्डी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कराड अर्बन बँकेचे सुभाषराव जोशी व चेअरमन डाँ.सुभाष एरम यांच्या हस्ते आनंद कांबळे यांना सहपत्नीक शिक्षकरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.यावेळी आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार ,विकास गवते ,अतुल औटी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आनंद कांबळे यांच्या मुख्याध्यापक कालावधीत शाळेस आय.एस ओ मानांकन,स्वच्छ शाळा पुरस्कार ,उपक्रमशिल शाळा पुरस्कार ,तसेच बाबेल ट्रस्टचा पुरस्कार मिळाला आहे. शाळेचा दर्जा अ असून शाळा सिद्धीत Aग्रेड मिळाली आहे.यापूर्वी आनंद कांबळे यांना विविध सामाजिक ,शैक्षणिक संस्थेकडून सुमारे १४ पुरस्कार मिळाले आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.