काव्यशिल्प Digital Media: कर्ज

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कर्ज. Show all posts
Showing posts with label कर्ज. Show all posts

Tuesday, June 19, 2018

  19 जून कर्ज वाटपाचा तिसरा मेळावा

19 जून कर्ज वाटपाचा तिसरा मेळावा

कर्ज वाटप साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफ झालेल्या शेतक-यांना सुध्दा सन 2018-19 या खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या राज्य शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका तसेच ग्रामीण बँकांच्या जिल्हयातील सर्व शाखेमध्ये पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन2018 रोजी मंगळवारी सकाळी 11 ते सायं. 5 या वेळात करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांना खरिप पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी 19 जून 2018 रोजी सर्व बँकामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा जिल्हयातील ज्या शेतक-यांना अद्यापही पीक कर्ज मिळालेले नाहीत, अशा शेतक-यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.