काव्यशिल्प Digital Media: आग

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label आग. Show all posts
Showing posts with label आग. Show all posts

Saturday, June 16, 2018

चंद्रपुरात दुकानाला शॉर्ट सर्किटने लागली भीषण आग

चंद्रपुरात दुकानाला शॉर्ट सर्किटने लागली भीषण आग

अग्निशमन दलाच्या ११  गाड्या घटनास्थळी दाखल 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील नावाजलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकान असलेल्या सोनी मार्केटिंग  दुकानाला शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे.पाठ्मिक माहिती नुसार हि आग शोर्ट सर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यांनतर अग्निशामक विभागाच्या ११  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या भागात पोलीस विभागाचा ताफा घटनास्थळी दाखल आला असून या भागातील वाहतूक हि एकेरी करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तिच्या सुमारास सोनी मार्केटिंग या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांची धावपळ झाली.  त्यांनतर अग्निशामक विभागाच्या ११   गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीत लाखो रुप्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र वृत्त प्रकाशित होई पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले नव्हते.हि आग विजविण्यासाठी धारिवाल कंपनी, व चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून ७ गाड्या मागविण्यात आल्या होत्या.


Tuesday, May 08, 2018

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

शांतिकुंज आणि पृथ्वी कंपनीला आग:लाखोचे नुकसान

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुल येथून जवळच असेलेल्या औद्योगिक परिसरात शांतिकुंज सलवंट लिमिटेड आणि  असलेल्या पृथ्वी फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपनीला आज मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत दोन्ही कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले,५ तासांच्या अथक परिश्रमानंतर हि आग आटोक्यात आणल्या गेली. विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीमध्ये मरेगांव हे गाव आहे. हि लागलेली भीषण आग वेळीच आटोक्यात आल्याने  गाव वाचले त्यामुळे जीवितहानी टळली या दोन्ही कंपन्या  सध्यस्थिती बंद अवस्थेत आहेत पण दोन्ही कंपन्यांमध्ये रसायन असल्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले होते. सध्या शेतात  खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीचे कामे सुरूआहे.अश्यातच शेतातील काडीकचरा हा शेतकरी तणीस टाकून नष्ट करत असतो.त्यासाठी जवळच्या परिसरात आग  होती व वाऱ्याच्या झोतात हि आग कंपनी परियंत आली आणि या दोन्ही कंपनीला आगीने वेढा घातला असे बोलल्या जात आहे.हि लागलेली आग भीषण असल्याने जवळील गावाला देखील खाली करण्याचे सांगण्यात आले होते.
हि आग विजवण्यासाठी चंद्रपूर-बल्लारपूर गडचिरोली आणि मूल येथील अग्निशमन  दलाला बोलाविण्यात 
आले अशी माहिती आहे.  पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. हिरे उपविभागीय अधिकारी खेडकर, राज्य विद्युत विभागाचे अभियंता होणाडे,पोलीस निरीक्षण चव्हाण, घटनास्थळी जातीने हजर होते. 
जाहिरातीसाठी राखीव....
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


Monday, April 09, 2018

Tuesday, April 03, 2018

गाडी चोरून लावली आग;माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप

गाडी चोरून लावली आग;माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप


चंद्रपूर/रोषण दुर्योधन:

चंद्रपूर येथील माजी नगरसेविका सुषमा शरद नागोसे यांच्या उत्कर्ष नागासे या २६ वर्षीय मुलाने बाबूपेठ येथील रहिवासी असलेल्या दीपक लक्ष्मण टवलाकर यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेले वाहन चोरून जुनोना येथील जंगलात जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे .या प्रकाराबाबत विचारणा करनारया वाहन मालकास देखील मारहाण  केली आणि नंतर वाहन पेटवून दिले.ही घटना सोमवारी (ता. २) रात्री ११ वाजताच्या सुमारास जुनोना मार्गावर घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उत्कर्ष नागासे याला अटक करून त्यावर  गुन्हा दाखल केला आहे. 
 सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उत्कर्षने मित्राच्या मदतीने बाबूपेठ परिसरातील दीपक लक्ष्मण टवलाकर (वय ४८) यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेली एम.एच ३४ एङ्क २५२५ क्रमांकाचे चारचाकी वाहन चोरले.वाहन चोरीला गेल्याचे लक्षात येताच वाहन मालक दीपक टवलाकर यांनी परिसरात शोध घेतला मात्र वाहन कुठे आठळून आले नाही.शोधाशोध सुरु असतांना जुनोना मार्गावर आरोपी उत्कर्ष आणि त्याचा मित्र चोरीच्या वाहनात बसलेले आढळून आले. गाडी मालक टवलाकर यांनी जुनोना रोड  गाठून गाडी चोरल्याबाबत विचारणा केली. या प्रकाराने संतापलेल्या उत्कृर्ष आणि त्याच्या मित्राने दीपक टवलाकर याला मारहाण केली.व गाडीच्या  काचा फोडून वाहनाला आग लावली व संपूर्ण गाडी आगीच्या स्वाधीन केली.
या आगीत वाहनाचे पूर्णपने नुकसान झाले असून  या प्रकाराची तक्रार दीपक टवलाकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मानकर यांनी सहकारी कर्मचार्यांसह  घटनास्थळ गाठले. व उत्कर्ष नागोसे याला अटक केली. घटनास्थळी आगीत खाख झालेल्या गाडीचा शर्पोलीसांना पंचनामा केला, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गौंड करीत आहे.

Sunday, November 19, 2017

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व्यायाम शाळेच्या स्टोर रूम ला आग

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व्यायाम शाळेच्या स्टोर रूम ला आग

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रविवारी सकाळी ११ ते ११.३० च्या दरम्यान शहरातील परिवहन कार्यालय रोडवर सामाजिक न्याय भवन मध्ये असलेल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह व्यायाम शाळेच्या स्टोर रूम मध्ये अचानक शॉर्ट सर्किट ने आग लागण्याची घटना घडली . याघटनेची माहिती महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आली. अग्निशामक विभागाच्या २ गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन  दलाकडून मिळालेल्या माहितीवरून आगीचे स्वरूप आहे  मोठे असल्याने आग आटोक्यात आणणे मशक्कत करावी लागली मात्र स्टोर रूम मध्ये लागलेल्या १०० ते १५० सोलर पॅनल जळून खाक झाल्याची माहिती आहे. आणि काही अन्य व्यायाम सामान जळून खाक झाले आहे. लागलेल्या या आगीत जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे. यात कोणत्याच प्रकारचे दस्तावेज नसल्याचे समजते.