मार्च २०१९ पर्यंत अत्याधुनिक केंद्रीय रूग्णालय रूग्णांच्या सेवेत
चंद्रपूर/प्रतिनिधी:
घुग्घूस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयाचे उन्नयन (अपग्रेडेशन) करून केंद्रीय रूग्णालयात परावर्तीत करण्यात यावे यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर सातत्याने प्रयत्नरत होते. याकरिता त्यांनी केंद्रीय कोळसा मंत्राी, यांचेसोबत अनेक बैठका घेतल्या. या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये या क्षेत्रिय रूग्णालयाचे उन्नयन करून या रूग्णालयाचे केंद्रीय रूग्णालयात परिवर्तन करण्यास अनुकूलता दर्शविण्यात आली होती. आता राजीव रतन हाॅस्पीटलचे केंद्रीय रूग्णालयामध्ये रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून ना. हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश प्राप्त झाले आहे.
दि. 20 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी नागपुरात वेकोलि विश्रामगृह येथे या संदर्भात वेकोलि मुख्यालयाच्या अधिकाऱ्यान सोबत बैठक घेतली त्यावेळी वेकोलिच्या या क्षेत्रिय रूग्णालयाच्या अपगे्रडेशन संदर्भात माहिती घेतली. राजीव रतन हाॅस्पीटलला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने या जिल्हयातील तसेच यवतमाळ जिल्हयातील वेकोलि अधिकारी, कर्मचारी, कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याने वेकोलि कामगारांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान या संदर्भात दि. 30 डिसेंबर 2017 रोजी वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक यांना बैठकीस पाचारण करून या रूग्णालयाच्या उन्नतीकरण संदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी चर्चा केली होती. सध्याच्या 50 बेड ऐवजी आता केंद्रीय रूग्णालयामुळे 110 बेडची क्षमता राहणार आहे. याबरोबरच अतिदक्षता विभाग, नवजात गर्भधारणा अतिदक्षता विभाग, पुनप्राप्ती कक्ष (रिकव्हरी रूम) यासारख्या सुविधा अपग्रेडेशन मुळे उपलब्ध होणार आहेत व सध्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानची संख्या वाढवून ती 25 पर्यंत होणार आहे व इतरही स्टाॅफ मध्ये या अपग्रेडेशनमुळे वाढ होणार आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्रयांसमवेतच्या बैठकीमध्ये वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंधन निदेशक राजीव रंजन मिश्रा, कार्मिक निर्देशक डाॅ. संजीव कुमार यांची उपस्थिती होती. यावेळी सदर केंद्रीय रूग्णालयाच्या शुभारंभासाठी तसेच सोयी-सुविधांसाठी युध्द पातळीवर कार्य केले जाईल असे वेकोलि अधिकारी यांनी या बैठकीत सांगितले.
राजीव रतन क्षेत्रिय हाॅस्पीटल सोबतच छिंदवाडा येथील पटकाई हाॅस्पीटल, नागपुरातील जवाहरलाल नेहरू हाॅस्पीटलासुध्दा केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला असून अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असणारे सदर रूग्णालय मार्च 2019 पर्यंत सुरू होण्याचे संकेत केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या सुत्रांकडून देण्यात आले आहेत. दि. 27 जुलै रोजी प्रस्तावित केंद्रीय रूग्णालयासंदर्भात वेकोलिच्या बोर्ड मिटींग आयोजित करण्यात आली असल्याचे कळते.