সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 07, 2018

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कामगाराचा मृतावस्थेत आढळला मृतदेह

चंद्रपुर/प्रतिनिधी:
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील खांबाडा  गावातील पोथरा येथील नदीला पूर आला व त्यामुळे त्या परिसरामध्ये टॉवर च काम करणारे काही कामगार त्या पुरामुळे त्याठिकाणी अडकले होते मात्र चंद्रपूर येथील "रेस्क्यू टीम" ने त्यातील 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं होतं मात्र त्यातील एक कामगार शोध घेऊही सापडला नव्हता,रात्र झाल्याने शुक्रवारी शोध घेणे कठीण झाले.मात्र शनिवारी सकाळी काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. मेहीतलाला दिनाराम बेसरा वय 32 रा.मुरपा झारखंड असे मृत कामगारांचे नाव असून त्याचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.