महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्र, प्रकल्प आणि कार्यालयात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत असून ३१ जुलै पर्यंत निर्धारित ध्येय पूर्ण करण्याकरीता प्रत्येक कर्मचारी सामाजिक दायीत्वातून वृक्षारोपणात हिरीरीने सहभागी होत आहे.
महानिर्मितीच्या पारस औष्णिक विद्युत केंद्रात यावर्षी ३००० वृक्षांचे ध्येय निर्धारित करण्यात आले होते व आतापर्यंत ३७८७ वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये आंबा, चिकू, फणस, चिंच, जांभूळ, वड, पिंपळ, कडूनिंब, बांबू इत्यादी वृक्षांचा प्रामुख्याने सहभाग आहे.
वृक्षारोपण मोहीम संदर्भात, मुख्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी झाली किंवा कसे याची प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करण्याकरीता पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश खंडारे, उप मुख्य अभियंता श्री. मनोहर मसराम, अधीक्षक अभियंते श्री. राहुल सोहनी, श्री. एस.एम.पाटील, श्री. बोदे, श्री. आर.व्ही.गोरे,विभाग प्रमुख यांनी वृक्षारोपण झालेल्या स्थळांना भेट दिली. वीज केंद्र परिसर, वसाहत परिसर, अतिथी गृह परिसर, कोळसा हाताळणी विभाग सभोवताल परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, झाडांसाठी संरक्षक कुंपण, आवश्यक खत, ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा इत्यादीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची निगा राखण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता श्री. प्रकाश खंडारे यांनी सांगितले.