विजय वडेट्टीवार यांची रस्ता अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट
चंद्रपूर/प्रतिनिधीं:
नंदाताई प्रमोद बहेरम वय 58 वर्ष वडगाव वार्ड चंद्रपूर हया भवनजीभाई हायस्कूल चंद्रपूर येथे शिक्षिका होत्या त्यांना सेवानिवृत्ती करिता 4 महिने बाकी असतांना 7 दिवसापूर्वी शाळेत जातांना ट्रॅफिक ऑफीस समोर असलेल्या खड्डयात गाडी ने पडल्याने त्या जागीच ठार झाल्या.
तसेच चंद्रपूर बंगाली कॅम्प प्रभाग क्र. 4 येथील कु. काजल उत्तम पाल वय 19 वर्ष ही मुलगी बंगाली कॅम्प चौकातुन शाळेत जात असताना खड्डे असल्याने त्या खड्डयात टू व्हाईलरगाडी जाऊन पडली व मागून येणाऱ्या ट्रक ने त्या मुलीला चिरडल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली.
अवघ्या 7 दिवसात चंद्रपूर शहरातील रस्त्यावर व हायवेवर खड्डे पडले असल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहे. 25 वर्षांपासून दरवर्षी पावसाळा आला की गड्ड्यात पडून कित्येक घटना प्रत्येक वर्षी होत असतात. याबाबत प्रशासनाला अजूनही जाग आलेली दिसून येत नाही यावरून प्रशासन किती निष्क्रिय आहे हे दिसून येते. या चंद्रपूर जिल्ह्यात 2 मंत्री असूनसुद्धा रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना भेट दिली नाही. याची माहिती मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना होताच त्यांनी वडगाव व चंद्रपूर बंगाली कॅम्प येथील मृत पावलेल्या कुटूंबियांच्या घरी जाऊन सांत्वन पर भेट दिली.
व यावेळेस प्रशासनांनी खड्डे का बुजवली नाही याची माहिती घेऊन शासन स्तरावरून मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबाला 5 लाख रुपयाची मदत देण्याकरिता शासनाला भाग पाडू व यामध्ये जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याला धारेवर धरून हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात लावून धरल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने प्रकाशभाऊ देवतळे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, नादुभाऊ नागरकर शहर अध्यक्ष चंद्रपूर, सेवादलचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, सुनिताताई लोढिया नगरसेवक, करीमभाई शहर अध्यक्ष बल्लारशा, अमजद अली नगरसेवक, शिवा राव युथ काँग्रेस अध्यक्ष, राजेश अडूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.