2018 मधील दुसरे चंद्रग्रहण
आषाढ पौर्णिमेच्या रात्री आज, शुक्रवारी या शतकातील सर्वात मोठे आणि अधिक वेळ खग्रास स्थिती असलेले 'खग्रास चंद्रग्रहण' होणार असून ते भारतातून दिसणार आहे.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. आज, शुक्रवारी तो पृथ्वीपासून दूर चार लाख सहा हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. म्हणून यादिवशी एकूण ग्रहणाचा कालावधी ३ तास ५५ मिनिटे एवढा जास्त असून खग्रास स्थितीचा काल १ तास ४३ मिनिटांचा असणार आहे,
रात्री ११.५४ वाजता ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. उत्तररात्री २.४३ वाजता खग्रास स्थिती समाप्त होईल. आणि उत्तररात्री ३.४९ वाजता ग्रहण सुटेल.
दिनांक : 27-28 जुलै 2018
वेळ : 23:56:26 ते 03:48:59 वाजेपर्यंत
ग्रहणाचे प्रकार : पूर्ण
दृश्यता : भारत, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तरी अमेरिका चे दक्षिणी हिस्से, साऊथ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्कटिका
सूतक
सूतक प्रारंभ 27 जुलै 2018ला 12:27:26 वाजेपासून
सूतक समाप्त 28 जुलै 2018ला 03:48:59 पर्यंत