काव्यशिल्प Digital Media: लाचलुचपत

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label लाचलुचपत. Show all posts
Showing posts with label लाचलुचपत. Show all posts

Thursday, September 06, 2018

 साठा अधीक्षकाला लाच घेतांना रंगेहात अटक

साठा अधीक्षकाला लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपूर/काव्यशिल्प टीम:
             कामावरून काढण्याची कारवाई थांबविण्यासाठी मागितली होती १० हजाराची लाच 


  • ५ हजार घेतांना रंगेहात अटक 
  • सुर्यकांत एडलवार महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
  • चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Image result for लाच लुचपत प्रतिबंधक विभाग


Monday, August 06, 2018

 रिश्वत लेते ठाणेदार को पकडा

रिश्वत लेते ठाणेदार को पकडा

वर्धा/प्रतिनिधी:
 दहेगांव पुलिस स्टेशन के पुलिस प्रभारी, राखुंडे को भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो (एसीबी), वर्धा ने सोमवार को एक शिकायतकर्ता से रिश्वत लेने के आरोप मी रंगेहाथ पकड़ा. यह पता चला है कि, राखुंडे शिकायतकर्ता से उनकी मदद के बदले में 3000 रुपये की मांग कर रहे थे, हालांकि शिकायतकर्ता ने भुगतान करने से इनकार कर दिया, उन्होंने पीड़ितों को अस्थायी बनाना शुरू कर दिया। इसी कारण पीड़ित ने एसीबी, विभाग वर्धा में शिकायत दर्ज कराई। इसके बाद एसीबी टीम ने आरोपियों को पकड़ा.

Wednesday, May 09, 2018

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

लाच घेतांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याला रंगेहात अटक

acb police साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतीनिधी:
लाकडे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे रमेश तलांडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे तर रामदास गोटेफोडे असे वनकर्मचारी चे नाव आहे.
तक्रारदार लाखनी येथील रहिवासी असून 1990पासून शेतातील लाकडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात त्यांनी नागभीड तालुक्यातील कांपा  येथील शेतातील सागवानाची ६  झाडे विकत घेऊन कापणी केली सदर झाडे नागपूर येथे वाहून नेण्यासाठी लागणारा बदली वाहतूक परवाना मिळविण्यासाठी ७  मे रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे यांच्याकडे अर्ज केला येथील लिपिक रामदास गोटेफोडे याने  बदली वाहतूक परवाना देण्यासाठी  स्वतःकरता १ हजार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी तलांडे यांच्यासाठी १  हजार असे  दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली रोजी केलेल्या पडतात आरोपी रमेश तलांडे  आणि रामदास गोटेफोडे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली यावेळी त्यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली सदरची कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी एम घुमे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे,कर्मचारी मनोहर एकोणकर,महेश मांढरे,अजय बागेसर,संतोष येलपूलवार,चालक दिनेश गरमडे यांनी केली.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

Saturday, April 21, 2018

 गृहनिर्माण अभियंत्यास लाच घेताना रंगेहात अटक

गृहनिर्माण अभियंत्यास लाच घेताना रंगेहात अटक


acb police साठी इमेज परिणामचंद्रपूर/गोंडपिपरी:
घरकुलाचा बांधकाम निधी मंजूर करण्यासाठी संत मीराबाई सेवा सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर यांच्यामार्फत नियुक्त गृहनिर्माण(कंत्राटी) अभियंता रमेश बंडू निकोडे याला २००० रुपये लाच घेतांना पंचायत समिती गोंडपिपरीच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  शनिवारी रंगेहात अटक केली.तक्रारदार हे गोंडपिपरी येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या वडिलाच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाचे बांधकाम चालू असताना दोन टप्प्यात ६० हजार रुपये मंजूर करून दिल्याबद्दल तसेच उर्वरित रक्कम मंजूर करून देण्याच्या कामाकरता पंचायत समिती गोंडपिपरी येथे यांनी त्याच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र ही रक्कम मोठी असल्याने प्रथम तडजोड २ हजार रुपये देऊन करण्यात आली.हि रक्कम देत असताना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहात अटक केली. 

 

Monday, April 16, 2018

पोलीस हवालदार सापडला लाचेच्या सापड्यात

पोलीस हवालदार सापडला लाचेच्या सापड्यात

P.S.I सचीन राठोडची चौकशी सुरु 
acb police साठी इमेज परिणामकोंढाळी/गजेंद्र डोंगरे 
  कोंढाळी पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार निवृत्ति येवलेला  20 हजाराची लाच( पोलिस स्टेशन  आवारातच )स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहात अटक केली .तर सोबत असलेल्या PSI सचीन राठोड याच्यावर देखील चौकशीची टाच आली आहे. 16 एप्रिल रोजी सायंकाळ पुर्व चार वाजता लाचलुचपत  प्रतिबंधक विसचिन राठोड यांना चौकशीसाठी  ताब्यात   घेतल्याचे सांगण्यात येत आहे, 

कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत मुरली गावानजीकच्या भडमुर्गा शिवारातील सर्वे क्र. ६८ अंतर्गत ५.६४ हेक्टर शेतीची प्रदीप सीताराम मसराम व मनोहर पंतुजी ठाकरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बोगस विक्री केली. या विक्री प्रकरणात मनीष शेरकर व किशोर जामळे हे साक्षीदार होते. या बोगस विक्रीची तक्रार झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड व हेडकॉन्स्टेबल निवृत्ती यावले हे दोन्ही साक्षीदारांना वारंवार चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवित. या प्रकरणात तुम्हाला अटक करू, अशीही धमकी त्यांना दिली. दरम्यान साक्षीदारांनी कोंढाळीच्या ठाणेदारांना भेटण्याचा प्रयत्न केला असता लाचखोर पोलिसांनी भेट होऊ दिली नाही.सदर प्रकरणात साक्षीदारांचे वकील अ‍ॅड. महेश वाघ हे ९ एप्रिलला कोंढाळी पोलीस ठाण्यात भेटण्यास गेले असता प्रकरण निस्तारण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी त्यांना या दोघांनी केली. त्यातील २० हजार रुपये शुक्रवारी (दि. १३) लाचखोर पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर लाचेचे दुसरे इन्स्टॉलमेंट सोमवारी (दि. १६) देण्याचे ठरले होते.
यानुसार अ‍ॅड. वाघ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार भंडारा येथील पथकातील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचला. फिर्यादी वाघ हे २० हजार रुपये घेऊन आले. ते पोलीस उपनिरीक्षक राठोडला भेटले असता त्याने हेडकॉन्स्टेबल यावलेकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस ठाण्यामागे लाचेची रक्कम देत असतानाच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला इशारा केला. त्यावरून पथकाने रंगेहाथ हेडकॉन्स्टेबलला अटक केली. तसेच या प्रकरणाचा सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक सचिन राठोड यालाही अटक केली

Friday, February 23, 2018

 जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

लाच साठी इमेज परिणामचंद्रपूर(ललित लांजेवार):
तक्रारदर हे जाक्कापूर   तालुका सीरपुर (टाउन) जिल्हा कुमरभिक आसीबाबाद,तेलंगाना राज्य येथील रहिवासी असून आदर्श शिक्षण प्रसारक  मंडळ राजुरा यांचे सिद्धार्थ तेलुगु  उच्च प्राथमिक शाळा राजुरा येथे शिक्षक  म्हणून काम करीत असताना जुलै २०१५  मध्ये  संस्थेने त्यांना कोणतेही  कारण न देता तोंडी आदेशाने सेवामुक्त केले.  तक्रारदार यांनी  माध्यमिक शाळा  न्यायाधिकरण मध्ये संस्थेविरुद्ध तक्रार दाखल केली. 
 केलेल्या तक्रारीचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लागला .मे २०१७ मध्ये तक्रारदार पुन्हा शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांचे वेतन देयक मंजुरीकरिता अधीक्षक वेतन  पथक (प्राथमिक शिक्षण) विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठविले असून  माध्यमिक शिक्षण उपसंचालक  यांनीही त्याचे 2017 पासूनचे बनते हे काढण्याचे आदेश  दिल्यानंतरही सदर वेतन देयक मंजूर करण्यासाठी तसेच पुढील वेतन सुरळीत चालू 
करण्यासाठी अधीक्षक  वेतन (प्राथमिक शिक्षण) विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे  कार्यालयातील वरिष्ठ लिपिक  विजय तिडके यांनी त्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी  केली.मात्र तक्रदाराला लाच देणे मंजूर नसल्याने तक्रारदाराने  लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीवरून २२ फेब्रुवारी २०१८  रोजी कार्यालय अधीक्षक वेतन पथक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान  विजय तिडके  वरिष्ठ लिपिक यांनी तक्रार दाराकडे वेतन देयक मंजूर करून  देण्यासाठी तसेच पुढील  वेतन सुरळीत चालू करण्यासाठी तडजोडीअंती 15000 लाचेची मागणी  केल्याचे स्पष्ट  झाल्याने आज दिनांक 23  फेब्रुवारी २०१८ शुक्रवार रोजी लाचेचा सापळा रचला असता  साप ल्या  दरम्यान  विजय तिडके वरिष्ठ लिपिक व 42 वर्षे कार्यालय अधीक्षक वेतन  पथक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदाराकडून १५००० हजार   लाच म्हणून स्वीकारतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  त्यांना रंगेहात  पकडले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर,उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षक विजय माहुलकर नागपूर, तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व , ना.पो.का संतोष येलपुलवार महेश मांढरे,अजय बागेसर ,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, समीक्षा भोंगडे,सिडाम  यांनी पार पडली .
जिल्हा परिषद चंद्रपूर साठी इमेज परिणाम

Wednesday, February 21, 2018

नायब तहसीलदारास लाच घेतांना रंगेहात अटक

नायब तहसीलदारास लाच घेतांना रंगेहात अटक

 चंद्रपूर(ललित लांजेवार) 
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तहसील कार्यालायचे नायब तहसिलदार संजय राठोड यांना रेती  ट्रॅक्टर अडवणूक प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

तक्ररदार हे ट्रक्टर मालक असून ते रेती घाटावरून रेती वाहतूक करत असतांना तुला जर महिनाभर रेती वाहतूक करायची असेल तर मला १७ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले तक्रारदारास हि रक्कम द्यायची नसल्याने त्याने  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार दाखल केली.यावरून गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान  ब्रम्हपुरी  १५ हजार रुपये देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदार यांना रंगेहात अटक केली.  हि बाब संपूर्ण तहसील कार्यालयात वाऱ्या सारखी पसरली .व त्यामुळे  सर्व महसूल विभागात धास्ती चे वातावरण निर्माण झाले
 सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर,अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर ला.प्र.वि,नागपूर,पोलीस उपअधीक्षक रोशन यादव नागपूर, तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे, ला.प्र.वि.गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली एम.एस.टेकाम पोलीस निरीक्षक,पोलीस हवालदार विठोबा साखरे,सत्यम लोहम्बरे,रवींद्र कत्रोजवार,महेश कुकडकार,गणेश वासेकर,घनशाम वडेट्टीवार आदींनी पार पाडली

Tuesday, February 20, 2018

लाचखोर तलाठ्यास ३ वर्षाचा कारावास

लाचखोर तलाठ्यास ३ वर्षाचा कारावास

तलाठी कारावासाची शिक्षा साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:  
तक्रारदाराच्या वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे नावाने फेरफार करण्याकरिताअजयपूर,जिल्हा चंद्रपूर येथील लाचखोर तलाठी धर्मेंद्र नानाजी खोब्रागडे याला तब्बल ७ वर्षानंतर जिल्हा न्यायाधीश -३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी सोमवारी 20.02.2018 कलम ७ प्रमाणे ३ वर्षे कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
०१.११.२०११ रोजी तक्रारदाराच्या वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे नावाने फेरफार करण्याकरिता लाचखोर तलाठी धर्मेंद्र नानाजी खोब्रागडे साजा क्रमांक १५ अजयपूर,जिल्हा.चंद्रपूर यांनी ताक्रदारांना १०००० रुपयाची मागणी केली होती.या बाबदची तक्रारदाराने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत दिनांक १/११/२०११ रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक जोत लाचलुचपत प्रतीबंधक विभाग चंद्रपूर ,यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत १०००० लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला रंगेहात अटक केली.व रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला,व खोब्रागडे यांचेवर चंद्रपूर येथेईल विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अभियोक्ता श्री.असिफ शेख यांनी अतिशय मेहनतीने अभ्यासपूर्वक यौक्तिवाद करून लाचखोरांना चपराक बसविण्यासाठी अत्यंत मोलाचे काम केलेले असून आपली बाजू भक्कमपने मांडली.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी कर्मचार्यांना चांगलाच संदेश मिळाला आहे,अश्या शिक्षेमुळे भ्रस्ताचारास आळा बसेल असे अशी चर्चा नागरिकत सुरु आहे. 
सदर कारवाईचे कामकाज पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व अरुण हटवार यांनी कामकाज पहिले .

Saturday, February 17, 2018

दारू कारवाईतून वाचविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांनी मागितली लाच; अन स्वताच सापडला ACB च्या जाळ्यात

दारू कारवाईतून वाचविण्यासाठी पोलीस कर्मचार्यांनी मागितली लाच; अन स्वताच सापडला ACB च्या जाळ्यात

 गडचांदूर/प्रातिनिधी:
गडचांदूर येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला गडचांदूर येथे अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथे कार्यरत असलेल्या ईसमाने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले आहे.
तक्रारदार हे गडचांदूर येथील रहिवासी असून ते त्यांच्या मित्रासोबत मोटरसायकलने  तेलंगाना सीमेवरील भंबारा  येथे गेले होते परत येत असताना त्यांनी आपल्यासोबत स्वताःह पिण्यासाठी  गाडीच्या डिक्कीत IB कंपनीच्या दारुच्या बाटल्या सोबत आल्या होत्या .गडचांदूर येथे पोहोचताच गडचांदूर येथील रामकृष्ण हॉटेल समोर गडचांदूर पोलिसात कार्यरत असलेल्या येथे पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे  यांनी तक्रारदाराची गाडी थांबवली आणि गाडीची तपासणी केली असता त्यांना डिक्कीत IB कंपनीच्या 3  दारुच्या बाटल्या सापडल्या त्यामुळे कारवाई न   करण्यासाठी पोलीस कर्मचारी  नारायण वाघमोडे 25 हजार रुपयाची लाच मागितली. हि रक्कम  जास्त असल्यामुळे तक्रारदाराला ही रक्कम देणे शक्य नव्हते त्यामुळे १५००० रुपयावर हा मसला फीट झाला. व तत्काळ ७००० रुपये देण्यात आले ,व उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरविले दुसरा दिवस मिळताच चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत दुसऱ्या दिवशी उर्वरित ८००० रुपये देताना पोलीस कर्मचारी नारायण वाघमोडे बक्कल नंबर.२१४० याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहात अटक केली.या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मनोहर एकोणकर,अजय बागेसर, महेश मांढरे, मनोज पिदूरकर,यांनी पार पडली.

    अधिक  ताज्या घळामोडी  वाचण्यासाठी  या लिंकवर  क्लिक करा
    https://kavyashilpnews.blogspot.in/

Friday, February 16, 2018

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकास लाच घेताना रंगेहाथ अटक

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकास लाच घेताना रंगेहाथ अटक


    चंद्रपूर/प्रतिनिधी:
    चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकास लाच घेताना रंगेहाथ अटक

     चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; बाबा रत्नपारखी याला 2500 रूपयाची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली 



    शेतीकामासाठी वापरणाऱ्या ट्रक्टरचे कागदपत्र पूर्ण नसल्याने चंद्रपूर येथील (RTO) चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहन चालकाने मागितली होती १०००० हजार रुपयाची लाच  त्यातील २५०० देण्याचे ठरले असतांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली कारवाई.  


    भद्रावती येथील ईसमाने केली होती तक्रार.........

    अधिक  ताज्या घळामोडी  वाचण्यासाठी  या लिंकवर  क्लिक करा
    https://kavyashilpnews.blogspot.in/





     

Wednesday, February 07, 2018

तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

तहसिल कार्यालयाच्या वरिष्ठ लिपिकास लाच घेतांना रंगेहात अटक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
कागदपत्रांच्या त्रुटी पूर्ततेसाठी 1000 रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या चंद्रपूर येथील तहसिल कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिक बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी रंगेहात अटक केली हे.
 बंगाली कॅम्प येथील तक्रारदार याचे घर नगर परिषद चंद्रपूर येथे 2005 मध्ये नजूल जागेत होते रस्त्याच्या कामाकरिता नगरपरिषद चंद्रपूर यांनी सन 2008  मध्ये पडून टाकल्याने तक्रारदाराने राहण्याकरिता सिविल लाइन्स चंद्रपूर परिसरातील एक जागा स्थायी पट्ट्यावर मिळण्याकरिता सन 2010 मध्ये तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे अर्ज केला होता .सदर प्रकरण तहसीलदार यांनी सही घेऊन मंजुरी करिता उपविभागीय कार्यालयास पाठविलें  आरोपी धनंजय वासुदेव येरणे 50 वर्षे वरिष्ठ लिपिक  कार्यालय चंद्रपूर यांनी तक्रार दाराकडे  फेरफाराची कामाकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने त्यांची विरुद्ध २४ जानेवारी २०१८  रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीवरून ७ फरवरी २०१८  रोजी तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे केलेल्या पडताळणी व सापळा कारवाई दरम्यान आरोपी धनंजय वसुदेव येरणे ५० वर्ष वरिष्ठ लिपिक याला तडजोडीचे १००० रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी  रंगेहात अटक केली. येरणे लाचेच्या सापड्यात सापडण्याची माहिती तहसील कार्यालयात पसरताच संपूर्ण तहसिल कार्यालय हादरून गेले होते. सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. 
सदर कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे,  ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व पुरुषोत्तम चौबे, अजय बागेसर, महेश मांढरे,भास्कर चिंचवलकर, मनोज पिदूरकर, ,राहुल ठाकरे  यांनी पार पडली.