काव्यशिल्प Digital Media: बॅडमिंटन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बॅडमिंटन. Show all posts
Showing posts with label बॅडमिंटन. Show all posts

Wednesday, November 08, 2017

सिंधूचा पराभव, सायना 'अजिंक्य'

सिंधूचा पराभव, सायना 'अजिंक्य'

    सिनिअर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा:                           

नागपूर - सिनिअर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही.सिंधूचा पराभव करत सायना नेहवाल हिने अजिंक्यपद पटकाविले. सायनाने सिंधूंचा २१-१७, २७-२५ अशा फरकाने पराभव केला.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीचा सामना अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. सायनाने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली. सिंधूने केलेल्या चुकांचा पुरेपुर फायदा घेत सायनाने पहिला गेम २१-१७ ने जिंकला. तर दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घेतली. काही उत्कृष्ट ड्राप्सही तिने लगावले. १८ पॉईंट्सपर्यंत ती आघाडीवर होती. त्यानंतर सायनाने कमबॅक करत बरोबरी साधली. अखेर सायनाने आपला अनुभव पणास लावून २७-२५ अशी सरशी साधत दुसऱ्या गेमसह अजिंक्यपद पटकावले. .