Monday, December 17, 2018
Wednesday, August 15, 2018
ध्वजारोहण सुरू असताना आत्मदहनाचा प्रयत्न
स्वतंत्र दिनानिमित्य ध्वजारोहण सुरु असतांना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत वाकोडी तुदगाव येथे युवकाने तेल्हारा पंचायत समितीच्या इमारतीवर युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.अरूण देवमण चव्हाण, असे या युवकाचे नाव आहे.
याने ग्राम विद्युत व्यवस्थापक पदासाठी ऑगस्ट 2017 ला रितसर अर्ज केला, मात्र अकरा महिने लोटले, तरी यावर कोणतीहि हालचाल करण्यात आली नाही,सरपंच आणि सचिव याबाबतचा ठराव घेण्यास टाळाटाळ करीत होते. या सर्व प्रकारात जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे अरुण चव्हाण याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता.न्याय मिळावा म्हणून 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीतीतील ध्वजारोहण सुरु असतांना अरुण देवमण चव्हाण यांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Thursday, November 16, 2017

मनपा उपायुक्तांसह पीएने घेतले २० हजार
अकोला/प्रतिनिधी: बिअरशॉपीच्या परवाण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांना स्वीयसहायकासह अटक करण्यात आली.
३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.