काव्यशिल्प Digital Media: परभणी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label परभणी. Show all posts
Showing posts with label परभणी. Show all posts

Friday, February 08, 2019

 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

Sunday, January 13, 2019

 देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

देवगांव ते इंजेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढा

सामतांची केंद्रीय मंत्री गडकरी कडे मागणी
परभणी/गोविंद मठपती:

 नियोजित देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगाव या 548-बी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे आदेश काढून काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन योगेश्वरी शुगर्स साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रकाश सेठ सामत यांनी केंद्रिय दळण वळण मंत्री नितिन गडकरी यांची 2 जनपथ येथील निवास स्थानी शुक्रवारी 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदना व्दारे केली आहे.
देवगांव फाटा-सेलू-पाथरी-सोनपेठ-इंजेगांव या नियोजित राष्ट्रीय महामार्ग 548-बी कामा संदर्भात टेंडर प्रक्रिया सुरू होती. परंतू जिओ टँगिंग ने रहदारी कमी नोंदवल्या मुळे.सदरील कामाची प्रक्रिया पुढील अर्थिक वर्षात करण्याचे ठरले होते. परंतू परभणी येथे 19 एप्रिल 2018 रोजी समाधान शिबिराच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी सदरील कामाची प्रक्रिया चार महिण्यात पुर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. मात्र अद्यापही या कामाला सुरूवात झालेली नाही. त्या मुळे या कामाची लवकरात काम सुरू करण्याचे आदेश काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी अशी मागणी प्रकाश सेठ सामत यांनी केली आहे. या वेळी या कामा साठीचा क्रमांक काढून पुढील कार्यवाही तात्काळ करण्या साठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन केंद्रिय दळन वळन मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे प्रकाश शेठ सामत यांनी सांगितले. या वेळी सामत यांची कन्या तृष्णा प्रकाश सामत लिखित 'ताजे सपने' या ग्रंथाचे प्रकाशन या वेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Thursday, December 27, 2018

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक


न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळली


प्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या सुमारास देवेगांव शिवारात पुन्हा एक एक्कर उस, आणि बैलगाडी जळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले. वेळीच पाथरी न प चा अग्नीशमन बंब पोहचल्याने मोठी हानी टळली.
बोरगांव येथील शेषनारायण आप्पाराव बेंडकर यांचा देवेगाव शिवारात तीन एक्कर उस असून गुरूवारी पावने चार वाजता विज तारांचे घर्षन झाल्याने या उसाला आग लागली. या वेळी अजुबाजूचे शेतकरी आणि पाथरी न प च्या अग्नीशमन बंबाने ही आग तात्काळ आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत एक एक्कर उसा सह लाकडी गाडी आणि त्यातील दोन खताचे पोते जळाले होते मात्र या ठिकाणी या शेतक-यां सह इतरांचा उर्वरीत सहा एक्कर उस वाचवण्यान न प अग्नीशमन बंबाला यश आले. यात जवळ पास साठ टन उसा सह खत,आणि लाकडी गाडी असे सव्वा लाखावर नुकसान झाले आहे. या वेळी माजी उप सभापती माऊली गलबे यांच्या सह देवेगाव ग्रामस्थ आणि न प अग्निशमनचे जवान खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळी यांनी मोठे परिश्रम घेतले.

Friday, December 21, 2018

पाथरीत ऊसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने तरुण ठार

पाथरीत ऊसाच्या ट्रॉली खाली सापडल्याने तरुण ठार



परभणी/ प्रतिनिधी

पाथरी - सेलू रोडवर ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली आलेल्या एका तरुणाचे निधन झाले हि घटना शुक्रवार दि.२१डिसेंबर रोजी दुपारी २वाजता घडली. याबाबत ची माहिती याप्रमाणे पाथरी तालुक्यातील लिंबा येथील भागवत मंकाजी चव्हाण वय २६ वर्षे या तरूणाचा रेणुका शुगर इंडस्ट्रीत परिसरात  कारखान्यात ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.२२ ए.डी. २०५४ ऊस घेऊन जात असताना सेलू रोडवरील साई भोजनालयासमोर  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पाठीमागील टायर खाली  तरुण आल्याने अपघात झाला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर थांबवून घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी तरुणाला खाजगी वाहनाद्वारे उपचारसाठी परभणीला घेऊन जात असतांना वाटेतच त्याचे  निधन झाले. पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करतांना
 रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी सेलूच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.रात्री वृत्त लिहीपर्यंत  या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
आज जिल्हाधिका-यांच्या हस्ते जन्मभूमीच्या बंधारा कामाचे भूमिपूजन

आज जिल्हाधिका-यांच्या हस्ते जन्मभूमीच्या बंधारा कामाचे भूमिपूजन


प्रतिनिधी/ परभणी
पाथरी: -मराठवाड्यात सातत्याने कोरडा दुष्काळ पडत असून या मुळे पाण्याचा प्रश्न अतिषय गंभिर बनत चालला आहे. पाथरी तालुक्यात दक्षिण भागात दुष्काळाची तिव्रता अधिक असून वाघाळा येथिल ग्रामस्थांनी जन्मभूमी फाऊंडेशन ने गावात पाण्या साठी बंधारा बांधावा आम्ही सहकार्य करू असे सांगितल्याने या विषयी प्रशासकीय परवानगी मिळवल्या नंतर आता 22 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणीचे जिल्हाअधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते बंधारा कामाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमा साठी रोहयो उप जिल्हा अधिकारी स्वाती सुर्यवंशी,उविभागिय अधिकारी कोळी, तहसिलदार निलम बाफना, जिल्हाअधिक्षक कृषिअधिकारी शिंदे, बालकिशनजी चांडक, जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात, सचिव किरण घुंबरे पाटील, कोहिनुर कन्स्ट्रक्शन्सचे सय्यद गुलशेरखान मामा आदींची उपस्थिती राहाणार आहे. सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यांने जवळ पास दोनशे मिटर लांब आणि तीस फुट रुंद 10 ते 15 फुट खोली करण करून हा बंधारा तयार करण्यात येणार आहे. या मुळे या परिसरातील शेती सह गावचा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.या कामा साठी समाजातील संवेदनशिल मंडळी सामाजिक बांधिलकी म्हणून पुर्णत: मदत करणार असून शासनाच्या कोणत्याही अर्थिक मदती शिवाय जिल्ह्यातला अशा प्रकारचा मॉडेल ठरेल असा बंधारा आम्ही करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी सांगितले. या वर्षी दुष्काळ ही संधी समजुन जुन 2019 पर्यंत शेकरी हिताचे विविध उपक्रम प्रशासनाला सोबत घेत जनतेच्या आणि संवेदनशिल माणसांना सोबत घेत राबवनार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमा साठी वाघाळा ग्रामस्थ आणि शेतक-यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन सत्यमेव चयते शेतकरी बचतगट वाघाळा आणि जन्मभूमी फाऊंडेशन यांनी केले आहे.

Tuesday, December 18, 2018

अनर्थ टळला ! रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

अनर्थ टळला ! रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण


परभणी/ गोविंद महापति -
रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. परभणीतील मुळी गावाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. या मार्गावरुन थोड्याच वेळात परभणी-पंढरपूर गाडी जाणार होती. मात्र रुळाला तडा गेल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानं त्वरित स्टेशन मास्तरांना दिली. त्यामुळे मोठा अपघात टळला.थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच रेल्वेकडून अधिक प्रमाणात गस्त घातली जाते. यामुळेच परभणीत मोठा अपघात टळला आहे. गंगाखेड ते धोंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला होता. ही बाब नाईंट पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यानं प्रसंगावधान राखून याबद्दलची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्यामुळे या मार्गावरुन जाणारी परभणी-पंढरपूर रेल्वे थांबवण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Monday, December 10, 2018

लिंगायत समाजाची जनगणना शासनाने करावी-डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर

लिंगायत समाजाची जनगणना शासनाने करावी-डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर

       औरंगाबाद येथे  हजारो भाविकांच्या उपस्थितीत                आशीर्वचन व दर्शन सोहळा उत्साहात संपन्न
परभणी  (प्रतिनिधी) :- 

वीरशैव लिंगायत हे आरक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह केंद्रातही वीरशैव-लिंगायतांमधील सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, असे श्रीकाशीपीठ येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्‌गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.दरम्यान वीरशैव लिंगायत समाजाची जनगणना शासनाने करावी अशी मागणी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांनी केली.


शहरातील मुकुंदवाडी, एन-2 येथील ईडन गार्डन येथे रविवारी आयोजित आशीर्वचन व दर्शन सोहळ्यात धर्मसभेत ते बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्‌गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह  श्री. ष. ब्र. 108 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य(अहमदपूर), वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य( साखरखेर्डा), रेणुक शिवाचार्य (मंद्रुप),शांतीवीरलिंग शिवाचार्य (औसा), राचलिंग शिवाचार्य  (परंडकर),मनिकंठ गुरुसिद्ध शिवाचार्य (दहिवड), काशिनाथ शिवाचार्य (पाथरी बापू),डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य (मांजरसुंबा) आणि महाराष्ट्रातील शिवाचार्यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी खा. चंद्रकांत खैरे होते.

कार्यक्रमास उद्योजक  सोमनाथअप्पा साखरे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सचिन खैरे, औरंगाबाद येथील प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, परळी वैजनाथ येथील श्रावणमास तपोनुष्ठाण सोहळयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे, आयोजक शिवा स्वामी किर्तनकार, श्रीराम बोंद्रे, बालू स्वामी गुंडेकर, महेश पाटील, बद्रीनाथ गंवडर, जगन्नाथ गुळवे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, शिवा खांडखुळे, विश्वनाथ स्वामी, सिचन संगशेट्टी,कर्नाटक संघ औरंगाबादचे अध्यक्ष एस. एल. रामलिंगप्पा, गुरुपादप्पा पडशेट्टी आदींची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, लिंगायत हा धर्माचा संस्कार आहे, धर्म नव्हे. वीरशैव हा मूळ धर्म आहे. तर लिंगायत हे रुढीने आलेले आहे. त्यामुळे सरकारदरबारीदेखील लिंगायत लिहले जात आहे. डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, सर्व धर्मांचा मूळ हा वीरशैव धर्म आहे.  शैव म्हणजे शिवाची आराधना करणारा आणि वीर म्हणजे विद्येत रमण करणारा होय. गळ्यात लिंग धारण केले पाहिजे. दररोज पूजन केले पाहिजे.  लिंगालाच सर्वस्व मानणारे म्हणजे लिंगायत होय. अष्टावरण, पंचाचार्य आणि षटस्थळ यामुळे 856 हा वीरशैव लिंगायत धर्माचा कोड संख्या म्हणून समजले पाहिजे.

उज्जयनी येथील श्रीश्रीश्री 1008 जगद्‌गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्मसभेत मोबाईलवरून संवाद साधला. ते म्हणाले,सध्या राजकीय लाभासाठी वीरशैव आणि लिंगायत हे वेगळे आहेत, असे म्हटले जाते. परंतु दोन्ही एकच आहेत. वेगळे म्हणणाजयांक डे आकर्षीत होता कामा नये.

Friday, December 07, 2018

परभणी जिल्हयात केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी साधला संवाद

परभणी जिल्हयात केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी साधला संवाद

केंद्रीय पथकाद्वारे परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
परभणी/प्रतिनिधी:
 मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गणेशपुर, परभणी तालुक्यातील पेडगाव व मानवत तालुक्यातील रुढी गावांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्यांनी शेतीतील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा पूर्ण होताच पाहणी दौऱ्याचा अहवाल केंद्राकडे सुपूर्द केला जाणार आहे. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी)  अंतर्गत येणाऱ्या पथकाचे प्रमुख केंद्रीय नीती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवरसचिव एस.एन.मेहरा यांचा समावेश होता. या पथकासमवेत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, अप्पर आयुक्त विजयकुमार फड,अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक जगताप तसेच महसुल व इतर विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती.

या पथकाने गणेशपूर शिवारातील श्रीमती त्रिवेणी रामचंद्र गीते यांच्या शेताला प्रथम भेट देऊन तेथील पिक नुकसानीची पाहणी केली. गीते दांपत्याशी व शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन पिक उत्पादन व उत्पन्न याविषयी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने पेडगाव येथील गणेशराव हरकळ यांच्या शेतातील पाणीपातळी खुप खालावलेल्या विहिरीची पाहणी केली. तसेच शेजारच्या हरकळ कुटूंबियांच्या शेतीमधील नुकसानीचीही पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. रूडी गावातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी आमदार मोहन फड यांनीही दुष्काळ परिस्थिती विषयी पथकाला माहिती दिली. 

यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी जिल्ह्यातील एकंदरीत पाणीटंचाई, पिकांची अवस्था यासोबतच धरणातील पाणीसाठ्याबाबत पथकाला माहिती दिली. पथक प्रमुख चौधरी यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या पथकाने परभणीनंतर बीड जिल्ह्यातील पाहणीसाठी प्रयाण केले
घातक ग्रुपतर्फे भव्य अन्नदान व पाणीवाटप

घातक ग्रुपतर्फे भव्य अन्नदान व पाणीवाटप

परभणी/ प्रतिनिधी:

डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाऱ्या 500 भिमसैनिक, समाजबांधव व माता-भगिनींना येथील घातक ग्रुपच्या वतीने दि.5 डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन येथे भव्य अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी आयोजक घातक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पै.सुदर्शन (भैय्या) बनसोडे, अध्यक्ष मुकेश (दादा) अवचार यांच्यासह सुरेश चांदणे, रंगीत बनसोडे, शेखर सवंडकर, संदीप खुणे, बाळू बोबडे, गजानन शिंदे, बळीराम जोगदंड, सतीश उफाडे, प्रकाश वाळवंटे, अमोल जगाले, माधव रायमले, भैय्या सुगंधे, शिवराज घाटगे , विष्णु वालेकर , शुभम सावंत, शशिकांत टिकूळे, प्रदूमन चांदणे, महेश बनसोडे, सागर चव्हाण, बाळू खुणे, मारोती गिराम, रामा कुरे, ज्ञानेश्वर वाळवंटे, सुशांत खाडे आदींसह मोठया संख्येने अनेकांची उपस्थिती होती.
बाबरी मस्जिद विध्वंश प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवा  : राकॉपा

बाबरी मस्जिद विध्वंश प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवा : राकॉपा

परभणी/ प्रतिनिधी:
     उत्तरप्रदेशातील अयोध्येतील बाबरी मस्जीदला ६ डिसेबर रोजी उध्वस्त करण्यात आले होते.यानंतर देशात दंगली उसळल्या हजारो लोकांना जीव गमवावा लागला त्यात काही मुस्लीम तर काही हिंदू होते. या घटनेमुळे देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. देशातील  नागरीकामध्ये फूट पाडण्याचे काम काहीनी केले तर काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मुस्लीम समाजाच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकर करून न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयामार्फत राष्ट्रपतीने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला.
       बाबरी विध्वंस प्रकरणाला तब्बल २६ वर्षाचा कालावधी लोटला तरी न्यायालयाच्या वतीने निर्णय देण्यात आलेला नाही.बाबरी मस्जिद प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच असून त्यांना शिक्षा कधी होणार,सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे.प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी शिफारत श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात म्हण्टले आहे. या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस अब्दुल खालेद, समाजसेवक अब्दुल बाखी, प्रदेश सचिव जलील पटेल, शहर जिल्हाउपाध्यक्ष रहेमान खान आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Wednesday, December 05, 2018

वडी येथील शालेय व्यवस्थापन समिती सर्वानुमते गठीत करुन जाहिर

वडी येथील शालेय व्यवस्थापन समिती सर्वानुमते गठीत करुन जाहिर



पालक, माझ,गांव माझ योगदान युवकाची
 मोठया प्रमाणावर उपस्थिती.
परभणी/ गोविंद मठपती

पाथरी:-तालुक्यातील मौजे वडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी शालेय व्यस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. सिध्देश्वर बळीराम शिंदे यांची तर उपध्याक्षपदी सौ सुनिता सोमेश्वर  शिंदे यांची  सर्वानमुत बिनविरोध निवड करण्यात आली.
शालेय व्यस्थापन समितीची मुदत संपल्याने नविन समिती निवड करण्यासाठी शाळेचे मु.अ. श्री. संजय चिंचाणे यांनी गावातील नोटीस बोर्डेवर तसेच गावातील पालकाना संपर्क करुन त्यांनी माझ गांव माझ योगदान या व्हॉट् अँप ग्रुपवर सदरीची सुचना प्रसिध्द करुन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रताप शिंदे, मा. सरंपच शिवाजी कुटे, बाजार समितीचे मा. संचालक बाबासाहेब शिंदे, सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे, ,माझ गांव माझ योगदानातील ज्ञानेश्वर शिंदे, युसफखॉ पठाण, मदन कुटे, बालासाहेब शिंदे बालासाहेब गिरगुणे, बालासाहेब शिंदे, राजेभाउु ताल्डे, रतन शिंदे, रमेश कुटे, आदी सह मोठया प्रमाणावर युवक उपस्थित होते.
यावेळी शालेय व्यस्थापक समितीचे सचिव श्री संजय चिंचाणे मु.अ. यांनी निवडण्यात आलेल्या कार्यकारणी घोषणा करण्यात आली. यामध्ये सदस्यपदी सौ.सुनिता नामदेव शिंदे,सौ. रुख्यामिन बालासाहेब शिंदे, सौ उषा भागीरथ शिंदे,सौ मनिषा मधुकर कुटे, सौ रेणुका राजेभाउु ताल्डे, सौ.मंदाकिनी परमेश्वर खंडागळे, तस्लीम युसूफखॉ पठाण श्री.ज्ञानेश्वर शिंदे,श्री बालासाहेब गिरगुणे,श्री रामदास कुटे,श्री मनोज खंडागळे ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणुन ,श्री प्रताप पंडीतराव शिंदे, तर शिक्षक प्रतिनिधी श्री.शिवाजी पांचाळ,विदयार्थी प्रतिनिधी कु.आरती मायदळे, विक्रम विश्वनाथ कुटे, शिक्षणतज्ञ म्हणुन प्रताप देविदास शिंदे आदीची निवड करण्यात आली. आणि सर्व सदस्यानी गावच्या शाळेच्या विकासाठी सर्वानमुते योगदान देण्याचा संकल्प केला. या नुतन कार्यकारणील सर्वाचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. शालेय व्यव्थाेलपन समिती सभेच्या यशस्वीतीसाठी शाळेतील शिक्षक श्री.डिगे गुरुनाथ मारोती  ,विरकर अमोल आश्रोबा  ,गिराम प्रल्हाद बळीराम  ,पांढरे महेंद्र किशनराव  ,कोळपे विक्रम श्रीपत   ,शिंदे मोहन वसंतराव ,पुरी सिध्देश्वर उत्तम    आदीसह माझं गांव माझ योगदान उपक्रमातील युवकानी परिश्रम घेतले.
परभणी लोकसभेची जागा पक्षाने संधी दिल्यास लढवणार:मेघना बोर्डीकर-साकोरे

परभणी लोकसभेची जागा पक्षाने संधी दिल्यास लढवणार:मेघना बोर्डीकर-साकोरे

परतूर मधील पत्रकार परिषदेत दिली माहिती
 परभणी/गोविंद मठपती:

जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ज्यांची सर्वदुर ओळख असलेले माजी आमदार रामप्रसादजी यांनी असंख्य सहका-यांना घेऊन
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परभणी लोकसभा मतदार संघात पक्षाचे संघटन वाढविने ही आपली प्राथमिकता होती. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण  मतदार संघातील गावागावात जाऊन भाजपा सरकारच्या विविध योजननांची माहिती आपण जनतेपर्यंत पोहचविली आहे. आगामी काळात पक्षाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करून परभणीची जागा भाजपकडे खेचून आणू असे मत भाजपच्या इच्छूक उमेदवार मेघना बोर्डीकर-साकोरे  यांनी व्यक्त केले. रविवारी एका सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्या लोकसभा मतदारसंघातील  परतूर मध्ये आल्या होत्या. येथील आदिवासी आश्रम शाळेत जालना येथील उद्योगपती छोटूभाई यांच्या वतीने मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप करण्यात आले. यानंतर येथील हॉटेल कृष्णमोती मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सेलू बाजारसमितीचे सभापती रविंद्र डासाळकर, शेख सगीर, विलास सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, अशोक सेलवाडीकर, नाईकवाडे अण्णा, आदीची उपस्थिती होती. 

     लोकसभेची उमेदवारी मागणार्‍या इच्छुकांची संख्या आजघडीला मोठी  असली तरी, उमेदवारची निवडून येण्याची क्षमता पाहूनच कोणाला संधी द्यायची याचा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जात असतो. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासह जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी मतदार संघात २०१२ पासून आपला सतत जनसंपर्क आहे. आगामी काळात संपूर्ण लोकसभा मतदार संघात जनसंपर्क अभियान राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

      गेल्या १५ ते २० वर्षापासून परभणी लोकसभेच्या जागेवर सेनेचा उमेदवार विजयी होतो, मात्र विकासात्मक कामाच्या बाबतीत कुठेही समाधानकारक बाब पाहावयास मिळत नाही. रस्ते,वीज, रेल्वे आदी बाबतीत अनेक समस्या मतदार संघात भेडसावत आहेत. आपण उच्च शिक्षित असल्याने, तसेच अनेक दिवसांपासून लोकसभा मतदार संघातील सर्व समस्यांची आपल्याला जाण आहे. असे सांगत आपणच प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा मतदार संघाच्या विकासाची ब्लुप्रिंट तयार असल्याचे सांगून
 ती योग्य वेळी बाहेर काढणार असल्याचे  यावेळी सांगितले.
 सोशल मीडियावर राहुल लोणीकरांचा भावी खासदार म्हणून कार्यकर्ते गवगवा करत असल्याबाबत बोर्डीकर यांना छेडले असता, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता भावी, आमदार- खासदार व्हावा असे वाटत असते. लोकसभेच्या दृष्टीने विचार केल्यास एका विधानसभा मतदार संघात ताकत असून चालत नाही. संपूर्ण लोकसभा मतदार संघात चांगला संपर्क असावा लागतो. पक्षाने कोणताही उमेदवार दिल्यास पक्षाच्या विजयासाठी सर्व ताकतीनिशी प्रयत्न करू असेही त्यांनी संगितले.

       पंढरपुरची वारी फेम, दहीहंडी फोडणे आणि मतदार संघात सभा मंडप उभा करणे या शिवाय इतरही अनेक कामे खासदारांची असतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगत विद्यमान खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता त्यांना टोमणा मारला.
दरम्यान परतूर तालुक्यातील भाजपाच्या एका बड्या नेताने  गडकरीच्या दौऱ्यानंतर परभणी जिल्ह्यात आपला संपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावने, पक्षातील पदाधिकाऱ्यांना डावलून सोय-याधाय-या भेटीगाठीचा सपाटा त्यांनी लावला होता.रविवार
 च्या मेघना बोर्डीकरांच्या या दौ-याने संबंधिताला मोठी चपराकच बसली असे  मानले जात आहे.

Tuesday, December 04, 2018

रुग्णांना मिळाला ओंकार सेवाभावी संस्थेचा आधार

रुग्णांना मिळाला ओंकार सेवाभावी संस्थेचा आधार

परभणी/गोविंद मठपती:
येथील ओंकार सेवाभावी संस्थेच्या वतीने नियमित पणे विविध आजारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ जगदिश शिंदे यांच्या वतीने करण्यात येत असून रविवारी डोळ्यांच्या शस्रक्रिये साठीचे रुग्ण लातुर लारवाना झाले.
यात सारोळा, पाथरी,तुरा, डोंगरगाव, मानवत, सनपुरी, सेलू, पोहेटाकळी, मंजरथ, पोहडूळ, उंबरा येथिल रुग्णांचा सामावेश आहे. सामाजिक जाणिव म्हणून मागील चार वर्षा पासून डॉ जगदिश शिंदे हे विविध समाजोपयोगी उपक्रम राबऊन गोरगरीब,कष्टकरी, उपेक्षितांना मदतीचा हात देत आहेत. नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन सुरूच ठेवत रूग्णांना फार मोठा दिलासा देत आहेत. रविवारी या रुग्णांना डोळ्यांच्या शस्रक्रिये साठी लातूर येथे पाठवण्यात आले. या वेळी ओंकार हॉस्पिटल चे कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, December 02, 2018

 आ.विजयराव भांबळे अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भूमिपूजन

आ.विजयराव भांबळे अभिष्टचिंतन सोहळा निमित्त रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भूमिपूजन

परभणी/प्रतिनिधी:

आ विजयराव भांबळे साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त आयोजित ह भ प श्री रामरावजी ढोक महाराज नागपूर यांच्या सुश्राव्य वाणीतून रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या मंडपाचे भूमीपूजन आयोजक श्री विश्वनाथजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा जि प मैदान जिंतूर येथे होणार असून दि 13 डिसेंबर पासून दि 19 डिसेंबर पर्यंत रोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच दि 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ह भ प ढोक महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी कथा श्रावनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक जि प अध्यक्ष उज्वलाताई राठोड यांनी केले आहे.
भूमिपूजन वेळी उपस्थित प्रमोदभाऊ भांबळे, प्रसादराव बुधवंत, मनोज थिटे, बाळासाहेब भांबळे,रामराव उबाळे,अविनाश काळे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, शरदराव अंभोरे, विजय खिस्ते,श्यामराव मते , बालाजी जाधव, शाहिद बेग मिर्झा, इस्माईल शेख, शोएब जनिमिया, अहेमद बागवान, दलमीर पठाण, गणेश इलग, मुजाभाऊ तळेकर, सुभाष घोलप, प्रकाश शेवाळे, विनोद राठोड, विजय वाकळे,सचिन बोबडे, संजय (पिनू )काळे, पप्पू मते ,संदीप राठोड, कृष्णा राऊत, सचिन स्वामी, किरण दाभाडे, चंद्रशेखर घुगे गजानन कांगणे, गंगाधर तरटे, दत्तराव लाटकर, शंकर गंजे, बबन मगर, सुरेश राऊत, पप्पू देशमुख, पिंटू डोंबे, जगदीश शेंद्रे, रंगनाथ काळदाते,अनिल झटे, आदी उपस्थित होते.
सेलूच्या अय्युब दाम्पत्यांस भारतीय दलित साहीत्य अकादमीचे राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कार जाहीर

सेलूच्या अय्युब दाम्पत्यांस भारतीय दलित साहीत्य अकादमीचे राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कार जाहीर

परभणी/प्रतिनिधी:

दिल्ली येथील भारतीय दलित साहीत्य अकादमी २०१८ च्या राष्ट्रिय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असुन, महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कार २०१८ साठी सेलू नगर परिषदचे कक्ष अधिकारी शेख म. अय्युब अमिनोद्दिन यांची व वीरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रिय फेलोशिप पुरस्कारासाठी सेलू येथील प्रभाग क्र. ४. अ ची नगरसेविका शेख अख्तर बेगम शेख म. अय्युब या पतिपत्नीच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन घोषित करण्यात आला आहे.
दिल्ली येथे भारताचे माजी उपपंतप्रधानमंत्री कै. बाबू जगजिवनराम यांनी स्थापन केलेल्या भारतीय दलित साहीत्य अकादमीच्या २०१८ च्या राष्ट्रिय पुरस्काराची घोषणा दिल्ली येथे अकादमीचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस.पी. सुमनाक्षर यांनी नुकतीच केली असुन त्या आशयाचे पत्र श्री शेख म. अय्युब व नगरसेविका शेख अख्तर बेगम यांना प्राप्त झाले आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण देशी, विदेशी मान्यवरांच्या उपस्थितीत दि. ९ डिसेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे.
क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले व विरंगना सावित्रीबाई फुले या पुरोगामी गोडजोडीच्या नावांच्या पुरस्काराची घोषणा सेलू येथील शेख म. अय्युब व त्यांच्या पत्नी नगरसेविका शेख अख्तर बेगम या दाम्पत्यांस झाले हे योगायोगचं आहे. पती- पत्नीस जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल या उभयतांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
 फरकंडा येथील  शेतकऱ्याचा दोन हेक्टर ऊस जळून खाक

फरकंडा येथील शेतकऱ्याचा दोन हेक्टर ऊस जळून खाक

पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
परभणी/प्रतिनिधी:

 पालम तालुक्यातील फरकंडा शिवारातील दि. 1 डिसेंबर रोजी 3:30 वाजता लाईटचा तार एकमेकाला घासून शॉट सर्किट होवून थिलंग्या पडल्या जवळपास दोन हेक्टर ऊस जळून खाक झाला 
सविस्तर व्रत - किशन नामदेव जोजाळ व चंद्रकांत पुरभाजी पौळ याची फरकंडा शिवरातील सर्वे न.169 यातील दोन शेतकऱ्यांचे ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दुपारी शेतातील ऊसाला आग लागल्यामुळे आजु-बाजूच्या शेतकऱ्यांनी गावातील जेसीबी च्या साह्याने जळ्त आसलेला ऊसला लागलेली आग विझविली शेतातील ऊस साफ केला.
यात शेतकऱ्यांचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. शेतातून  विजेचे पोल आहेत विज पुरवठा गावातून धानोऱ्याकडे लाईन गेली आहे.यामुळे शेतकऱ्याचे ऊसाचे नुकसान झाले आहे.तरी या जळालेल्या ऊसाचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी चंद्रकांत पौळ व किशन जोजाळ यांनी केली आहे अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे व भारनियमनामुळे या ऊसाला पाणी नाही उस वाळत आहे त्यामुळे कारखान्याने हा ऊस लवकरात लवकर घेऊन जाण्याची विनंतीही या भागातील शेतक-यानी केली आहे.

Saturday, December 01, 2018

सिताराम घनदाट यांच्या प्रयत्नाने आईनवाडी कराना मिळाले पाणी

सिताराम घनदाट यांच्या प्रयत्नाने आईनवाडी कराना मिळाले पाणी

परभणी/गोविंद मठपती:

पालम :- तालुक्यातील आईनवाडी येथे आनेक वर्षा पासुन पाणी प्रश्न निर्माण झालेला होता. या गावात पाण्या साठी नागरीकाना भटकंती करावी लागत होती. मात्र मा.आमदार सिताराम घनदाट यांनी आईनवाडी येथील नागरीकांची समश्या जानुन दि. 30 नोव्हेंबर रोजी आईनवाडी येथे मा. आमदार सिताराम घनदाट मामा यांच्या प्रयत्ना मुळे फरकंडा येथील गोदावरी नदी वरुन आईनवाडी येथे पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे गावकर्यानी सिताराम घनदाट मामा यांचे गावात जंगी स्वागत केले. यावेळी विजयकुमार शिंदे कृ.उ.बा.समिती सभापती, पांडुरंग वाडेवाले पं.सं. सभापती, सखाराम गायकवाड जेष्ठ नेते, सदाशीव आप्पा ढेले विधानसभा प्रमुख, गोपीनाथ तुडमे जेष्ठ नेते, माऊली घोरपडे युवा तालुका अध्यक्ष पालम व गावातील नागरीक मोठया संख्येत उपस्थित होते.
परभणीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीवर अशासकीय सदस्यांचा बहिष्कार

परभणीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीवर अशासकीय सदस्यांचा बहिष्कार


परभणी/प्रतिनिधी:


ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाबाबत जिल्हा प्रशासन नेहमीच उदासीन असल्याने शुक्रवारी ता. 30 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीवर अशासकीय सदस्यांनी बहिष्कार टाकला. 
ग्राहकांचे हीत जोपासून त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करून ग्राहक संरक्षण कायद्या संदर्भात ग्राहकांमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. जिल्हाधिकारी या परिषदेचे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे सचिव असतात. तसेच प्रशासनाच्या विविध विभागांचे मुख्य अधिकारी सदस्य असतात. या परिषदेवर ग्राहक चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे तसेच व्यापारी प्रवर्ग, शेतकरी आदी प्रवर्गातून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. शासनाने निर्धारित केल्याप्रमाने परभणी जिल्हा प्रशासनाने ग्राहक संरक्षण परिषद गठीत केली. मात्र या परिषदेची बैठक दरमहा घेणे अपेक्षित असतानाही बैठका नियमित घेण्यात येत नाहीत. सर्व सामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अशासकीय सदस्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीलाही न्याय मिळत नाही. उलट बैठकीत आलेल्या ग्राहकांच्या तक्रारी कशा टाळता येतील याचाच विचार केला जातो. ग्राहक समिती गठीत झाल्यापासून शेकडो ग्राहकांच्या तक्रारी बैठकीत दाखल झाल्या मात्र आज पर्यंत एकाही ग्राहकाच्या तक्रारीचे निराकरण झालेले नाही. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचे सक्षम अधिकारी या समितीवर असून सुद्धा ग्राहकांना संरक्षण मिळत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. ग्राहक संरक्षण परिषदाच्या कामकाजाबाबत जिल्हा प्रशासन उदासिन व मनमानी करत असल्याने अशासकीय सदस्यांनी सांगितले. ता. 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीचे पत्र सदस्यांना देण्यात आले नाही. जाणिव पुर्वक बैठक सायंकाळी 6.30 वाजता घेण्यात आली. परिषदेवर विविध तालुक्यातील महिला सदस्य सुध्दा आहेत. याचे भानही प्रशासनाला राहीले नाही. बैठक घेण्यापुर्वी किमान सात दिवस आगोदर लेखी स्वरूपात पुर्वसुचना देणे आवश्यक असते. शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकी संदर्भात सदस्यांना जिल्हा प्रशासनाकडून रितसर कळविण्यात आले नसल्याने अनेक सदस्यांना या बैठकीपासून वंचित राहावे लागले. ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामात जिल्हा प्रशासन नेहमीच मनमानी करत असल्यामुळे अशासकीय सदस्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला व तसे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्यावर डाॅ. विलास मोरे, धाराजी भुसारे, धनंजय देशमुख, शामराव रणेर, अब्दुल रहिम यांच्या स्वाक्ष-या आहेत.
वरिष्ठांकडे दाद मागणार
परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाबाबत जिल्हा प्रशासन उदासिन असून मनमानी कारभार करीत आहे. ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही सर्व अशासकीय सदस्यांना सोबत घेऊन वरिष्ठांकडे जिल्हा प्रशासना विरूद्ध तक्रार करणार असल्याचे ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डाॅ. विलास मोरे यांनी सांगितले.
अवयवदानासाठी जनजागृतीची गरज:देशपांडे

अवयवदानासाठी जनजागृतीची गरज:देशपांडे

परभणी/गोविंद मठपती :
अवयव आणि  देहदान महासंघ मुंबई आयोजित औरंगाबाद ते तुळजापूर जनजागृती पदयात्रे चे स्वागत व या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब मानवत -पाथरी च्या वतिने शहरातील हॉटेल सीटी प्राईड या ठिकाणी करण्यात आले. या विषयीचे सखोल मार्गदर्शन मुंबईकर देशपांडे बंधूनी केले.            
               
   आपल्या मृत्यूनंतरही आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुस-या व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही.परंतु अवयव दान व देहदान याविषयीची जनजागृती होणे गरजेच असल्याची मत व्यक्त केले.                                                                 
या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे डॉ.जगदीश शिंदे, डॉ.मानवतकर, डॉ.अतुल भाले आदींसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की, स्वयंसेवी संस्था, मंडळे वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करताना दिसतात. नेत्रदानाचेही महत्त्व आता लोकांना पटू लागलेय. त्यामुळे नेत्रदान करण्याकडेही त्यांचा कल वाढू लागलाय. परंतु अवयवदात्यांची संख्या त्यामानाने कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अजूनही अनेकांच्या मनात अवयवदानाविषयी गैरसमज आहेत. अभ्यासक्रमामध्ये नेत्रदानाविषयी, रक्तदानाविषयी माहिती असते. मात्र आता अवयवदानाविषयी माहिती देणे गरजेचे आहे. किडनी, यकृत,फुपूसे,हृदय, त्वचा इत्यादी अवयव मृत्यूनंतर गरजू व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. पुराणकाळातील दधिची ऋषींनी तर आपली हाडे दान दिली होती. त्या अस्थीपासून तयार केलेल्या वज्राने वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यात आला होता, अशी कथा आहे. पण तरीही अवयवदान म्हटले की भारतीय मध्ये कमालीची अंधश्रद्धा आहे .                    

  पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हते. आता त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो.                     
   अवयवदान म्हणजे एखादी आजारी व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या टप्यात असताना वयक्तिक किंव्हा नातेवाईकांच्या इच्छे नुसार त्याच्या शरीरातील अमूल्य अश्या 9 अवयवांचे प्रत्यारोपण इतर गरजू रुग्णांच्या शरीरात करण्याची परवानगी देणे व या 9 व्यक्तींना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचण्याचा अमूल्य असं सत्कार्य.         त्यामुळे कुणाला किडनी मिळते तर कुणाला डोळे, किडनी, लिव्हर, हृदय,फुपूसे अश्या महत्वपूर्ण अवयवांमुळे बऱ्याच रुग्णांना  जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात.
पाथरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

पाथरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

परभणी/गोविंद मठपती:               

परभणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक
शेतातील विद्युत रोहित्राजवळ लागवड करण्यात आलेल्या एकाच गटातील तीन शेतकºयांचा ५ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़शेतातील विद्युत रोहित्राजवळ लागवड करण्यात आलेल्या एकाच गटातील तीन शेतकऱ्याचा ५ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
पाथरी तालुक्यात मागील काही दिवसांत विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत़ ऊस जळाल्यानंतर शेतकऱ्याना नुकसान भरपाईही मिळत नाही आणि जळालेला ऊस कारखानेही वेळेवर गाळपासाठी नेत नाहीत़ त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत़ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तालुक्यातील पाथरगव्हाण बु़ येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ घांडगे, वसंत शंकरराव घांडगे, किशन धोंडीबा घांडगे यांची गट नंबर ३३६ मध्ये शेती आहे़ तिन्ही शेतकºयांची ऊस लागवड जवळजवळ आहे़ या शेतात विद्युत रोहित्र बसविलेल आहे़ या विद्युत रोहित्राच्या जवळ वीज तारेला घर्षण झाल्यानंतर आग लागून पाच एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे़ ऊस पेटला असताना तो विझविताही आला नाही़ त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़