विशेष/प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस ,यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर प्रत्येक मिनिटाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ,वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग चंद्रपुर शहरात जागोजागी लावण्यात आलेले आहे.
कुणासाठी विकास पुरुष, कुणासाठी पुढारी, कुणासाठी लोकनेते, तर कुणासाठी चक्क दैवत असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आज वर्तमानपत्रात व होर्डिंग सोबत सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून चांगलाच वर्षाव होत आहे.
हा शुभेच्छाचा वर्षाव होत असतांना शहरात एक आगडावेगडा शुभेच्छा देणारा बॅनर देखील शहरातील सावरकर चौक येथील विद्युत रोहित्रावर बांधलेला दिसला ज्यात चंद्रपुरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विकास पुरुष सुधीर भाऊंना चंद्रपुर वासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अश्या आशयाचा हा होर्डिंग चित्र रुपात बराच काही सांगून जात आहे.
या होर्डिंगर शहरातील खड्यांचा फोटो लावण्यात आला आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या खड्यांमुळे दोन जणांचा बळी गेला, त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने संबंधित विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. शहरातील हे खड्डे आदेशानंतर थातूरमातूर बुजवण्यात आले होते. त्यानंतर हे खड्डे पुन्हा उखडले गेले आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली. या हेल्मेट सक्तीवर बराच वाद विवाद रंगू लागला होता. इतके सर्व होऊन सुद्धा आजही खड्डे जैसे त्याच परिस्थितीत असल्यामुळे चंद्रपूरकरांच्या वतीने हा बॅनर सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य चौकात लावण्यात आल्याचे समजते. मात्र हा बॅनर कोणी लावला हे अद्यापही समजू शकले नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर हा बॅनर लागल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
हा संपूर्ण प्रकार भाजप कार्यकर्तांना माहीत होताच तत्काळ हा बॅनर सावरकर चौकातील त्या मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आला.मुनगंटीवार यांनी दिवसेंदिवस वाढत असलेली प्रसिद्धी त्यामुळे विरोधकानेच हा प्रताप केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.