काव्यशिल्प Digital Media: तेली

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label तेली. Show all posts
Showing posts with label तेली. Show all posts

Saturday, January 06, 2018

रविवारी तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा

रविवारी तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा

lagn साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने 7 जानेवारी रविवारला चंद्रपुरात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात प्रेरणा 18 या स्मरणिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
तूकुम येथील मातोश्री सांस्कृतिक सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ञ वासुदेव गाडेगोने उपस्थित राहतील उद्घाटक म्हणून आमदार विजय वडेट्टीवार व प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, वासुदेवराव रागीट ,  अनिल  खनके, सुभाष राघटाते रावजी चवरे,  विजय मोगरे,  उषा हजारे   शोभाताई पोटदुखे, महेश बारई , जगन्नाथ येळणे, मोहन उमाटे आदी उपस्थित राहणार आहेत .  या मेळाव्यात बहुसंख्येने तेली समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तेली युवक मंडळातर्फे करण्यात आले आहे

Thursday, December 21, 2017

सत्ताधाऱ्यांचे बॅनर का हटवत नाही : जोरगेवार

सत्ताधाऱ्यांचे बॅनर का हटवत नाही : जोरगेवार

KISHOR JORGEWAR साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी: 
 तेली समाजाच्या बॅनर मनपाने काढल्याच्या वादात आता  शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी उडी घेतली आहे.  तेली समाजाचे आराध्य  दैवत संत श्री शिरोमणी जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध  ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी   तेली समाजातर्फे मागण्यात आली होती. शहराचे विद्रूपिकरण होते, असे कारण देत बॅनर लावण्यास मनपाने नकार दिला होता. त्यानंतरही लावलेले बॅनर मनपाने काढले. मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले जात आहेत. हे मनपातील अतिकर्तव्यदक्ष अधिकारी आणि पदाधिकाऱ्याना दिसत नाही का? बॅनर लावण्यासाठी रितसर परवानगी मागुनही ती नाकारली. मात्र सत्ताधाऱ्यांचे बॅनर्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे का? असा प्रश्न करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध केला आहे.

Saturday, November 11, 2017

 (तेली समाज) जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी रविवारी बैठक

(तेली समाज) जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी रविवारी बैठक

चंद्रपूर- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपले आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव येत्या डिसेंबर 2017 ला करण्याचे ठरविले आहे।
    तरी त्या सोहळ्याचे नियोजन व घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे विषय , विचार यावर चर्चा  करण्याकरिता रविवार दि 12/11/2017 ला सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी जास्तीत जास्त समाज बांधव/भगिनींनी उपस्थित राहून शोभा वाढवावी, ही विनंती।
धन्यवाद!
स्थळ- श्री हनुमान मंदिर देवस्थान, पंच तेली समाज जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर
वेळ- दुपारी 1.00 वाजता
बदलो भारत - बनाओ  भारत अभियान

बदलो भारत - बनाओ भारत अभियान

*|| बदलो भारत - बनाओ  भारत अभियान ||*
       *परिसंवाद* 
शनिवार दि. ११ नोव्हेंबर २०१७ ला सायंकाळी ०६:३० वाजता
*स्थळ* : सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर
*विषय* : शेतकऱ्यांची पिळवणूक, बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेचे मुळ
*वक्ता* : मा. अमिताभ पावडे, (शेती व अर्थशास्त्राचे अभ्यासक)
          मा. अरूण वनकर   ( भारतीय किसान सभा)
*अध्यक्ष* : मा. संजय शेंडे ( अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर )
        *आयोजक* 
*विदर्भ तेली समाज महासंघ, नागपूर*
संपर्क : संजय नरखेडकर ९८५०४१६०२२