সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 31, 2018

 गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या

बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
 कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले गोंडखैरी येथे स्वःताच्या घरीच तरुणाने विष घेऊन केली आत्महत्या सविस्तर वृत्त असे की मृतक चिंटू ऊर्फ जयंता शंकर अत्करी वय २२ वर्षे राहणार वार्ड क्रंमाक ३ हा मद्यपान करुण नेहमीप्रमाणे रात्री उशीरा साडेदहाच्या सुमारास घरी यायचा व वडीलाला पैशाची मागणी करायचा अगर पैशे दिले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी नेहमीच वडीलांना द्यायचा. असेच सोमवार ला रात्री साडेदहाच्या दरम्यान मद्य प्राशन करुण आला व बडबड करु लागला. घरच्यांनी त्यांचेवर लक्ष न देता, त्याला तसेच सोडून त्याच्या खोलीमध्ये बडबड करु लागला व आतमधून दरवाजाची कडी बंद करुन झोपला.
नेहमीप्रमाणे वडील मंगळवार (दि.३१/जूलै) ला सकाळी पाचच्या दरम्यान झोपून उठले असता खिडकीतून पाहले तर निद्रा अवस्थेत आढळून आला. व आतमधून दरवाजाची कडी बद असून त्याला आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. घरा लगत स्थानिक सरपंचाला व परिसरातील पोलीस पाटिल आणी स्थानिकांच्या मदतीने खिडकीतून दरवाजाची कडी काढण्यात आली. तर काय गार झोपीच गेला व काळाने झडपच घेतली. त्यांच्या तोंडातून फेस वाहत होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला हलचल करुण उठवण्याचा प्रयत्न केला.पण त्याआधीच काळाने झडप घेतली.
ताबडोब कळमेश्वर पोलीसांना सूचना देण्यात आली. मंगळवार सकाळी ६.३० वाजता उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे मृतकाला रवाना करण्यात आले. दुपारी १.००वाजता त्याचे स्थानिक मोक्षधाम येथे अत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.त्यांच्या पच्छात आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.





विविध मुद्यांवरून गाजली चंद्रपूर मनपाची आमसभा

विविध मुद्यांवरून गाजली चंद्रपूर मनपाची आमसभा

 ललित लांजेवार:
मंगळवारी चंद्रपूर मनपाच्या सभागृहात आयोजित आमसभेत  विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली.आरोग्य,औषध,दुषित पाणी,शहरातील LED दिवे,गुंठेवारी प्रकरण,शहरातील मुख्य रस्त्यांचे सौदर्यीकरण व रुंदीकरण,अतिक्रमण,बाबूपेठ उड्डाण पुलाचे धीम्या गतीने होत असेलेले बांधकाम,अश्या विविध मुद्द्यांवरून आज पालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकात हल्ला ऐकायला मिळाला.
सभा सुरु होताच सभागृहात झारखंड आणि जम्मूमध्ये शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शहिदांना श्रद्धांजली देत असतांना मात्र चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे विनाकारण बळी गेलेल्या नंदा प्रमोद बेहरम (५८) रा. वडगाव व काजल पाल (१८) रा.बंगाली कॅम्प या दोघांचाही सभागृहाला विसर पडला.या आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
 सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र मनपाच्या आरोग्य केंद्रावर औषधच उपलब्ध नसल्याने रूग्णांलयांमध्ये रुग्णाची गैरसोय होत आहे,सध्या सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने नागरिकात रोष आहे.मंगळवारी मनपाच्या सभागृहात नगरसेवक सचिन भोयर यांनी अजेंट्यावरील विषय बाजूला ठेऊन पहिले,नगरसेवक व नागरिकांना हुज्जतबाजी करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱयांना सस्पेंड करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांच्याकडे लावून धरली. शहरातील आरोग्यकेंद्रावर डॉक्टर वेळेवर हजर होत नाही,औषधांचा तुटवडा आहे,रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या वारंवार तक्रारी जनतेकडून नगरसेवकांना प्राप्त होत होत्या ,त्यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या ब्योम्याट्रिक थम मशीन तात्काळ प्रत्येक आरोग्य केंद्रावर बसवून उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. व वागणूक व्यवस्थित नसेल त्याविरुद्ध नौकरीवरून निलंबीत करण्याचे आदेशही देण्यात येतील अश्या सूचना यावेळी आरोग्य अधिकारी अंजली आंबटकर यांना करण्यात आल्या.
नगरसेवकांनी महापौर अंजली घोटेकर यांना विद्युत विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी देखील नगरसेवकांशी हुज्जत बाजीने बोलतात  यावर उत्तर देत महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या यानंतर सन्मापूर्ण वागणूक न देणाऱ्यांवर नौकरीवरून पायउतार करू त्यामुळे आता अधिकाऱ्यांवर चुकीला माफी नसल्याची वेळ आली आहे .
आवश्यकतेनुसार रस्त्यावरील झाडे येणार काढण्यात 
शहरातील अनेक प्रभागात दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे
हि बाब सभागृहाच्या लक्षात आणून देतांना दीपक जयस्वाल 
व्यापाऱ्यांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण वाहनांची कोंडी व अरुंद रस्ते शहरातील मुख्य समस्या असतांना त्यामुळे मनपा अंतर्गत विकास कामात शहरातील मुख्य रस्ता असलेले गांधी चौक ते जटपुरागेट व कस्तुरबा मार्गाचे २ कोटी ५६ लाखाचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरु होणार आहे,त्या मार्गावर अनेक झाडेआधी पासून लावण्यात आले आहे अश्या झाडांना आवश्यकते नुसार काढण्यात येणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला सांगितले हा रुंदीकरणाचा स्पेस वाढवून येथे पार्किंगची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले ,रस्ते बांधकामाचा टेंडर वारंवार एकाच व्यक्तीला का? व या मार्गावर येणाऱ्या झाडांचे काय? असा सवाल नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देतांना आयुक्त संजय काकडे यांनी सभागृहाला हि महिती दिली.
      ट्रायस्टार ते एमईएलपर्यंतचा रस्ता वगळण्याचा ठराव मंजूर 
नगरपालिका अस्तित्वात असताना १९९७ मध्ये शहराच्या आराखड्या नुसार ६० मीटर रुंद विकास योजना रस्ता हा वळण रस्ता म्हणून मंजूर करण्यात आला होता. सदर रस्ता होटल कुंदन प्लाझा( ट्रायस्टार) ते तुकूम परिसरातील लॉ कॉलेजपर्यंतचा हा रस्ता होता. या रस्त्यामुळे ७०० हून अधिक घरे बाधित होणार होती,त्यामुळे नगरसेवक अशोक नागापुरे यांनी या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यांनी नगरपालिकेने दिलेल्या नोटीसांवर स्टे दिला.त्यानंतर ह्या विषय थंड बस्त्यात पडला. आजच्या आमसभेत नगरसेवक संदीप आवारी यांनी रिंगरोडमधून नेहरूनगर परिसर वगळण्यात यावा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता,या संधर्भात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या परिसरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० जात  असल्याने सध्या या रस्त्यावर ५६० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा विषय प्रस्तावित आहे. त्यामुळे या मार्गावरील ७०० घरे बाधित होण्यापासून वाचली आहेत. 
बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम संथ गतीने 
गेल्या कित्तेक दिवसांपासून बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. या प्रभागात लालपेठ,जुनोना,बाबूपेठ या परिसरातील व शहरातील अर्ध्या अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे.
 रेल्वे वाहतुकीने आधीच समस्या झेलत असलेल्या बाबूपेठ वासियांना आणखी किती दिवस उड्डाण पुलाच्या संथगतीने सुरु असलेल्या समस्सेला झेलावे लागेल असा प्रश्न बसप गटनेता अनिल रामटेके, स्नेहल रामटेके यांनी उपस्थित केला.



हा तर वडगाव प्रभागावर अन्याय 
पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप
शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.
मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे 
"शिवाजी महाराज कि जय" म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी
 सभागृहात काही नगरसेवकांनी घोषणाबाजी केली त्यावेळचे हे छायाचित्र





हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

हा तर वडगाव प्रभागावर अन्याय; पप्पू देशमुख यांचा आमसभेत आरोप

शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्त 
 कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दृष्ट सत्ताधारी आणि भ्रष्ट सत्ताधारी कविता सभागृहात
 वाचवून दाखवतांना प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख 
 मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे  नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला  यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
 आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत  सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत  सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.
महावितरणचा वीजदरवाढ प्रस्ताव योग्यच

महावितरणचा वीजदरवाढ प्रस्ताव योग्यच

प्रस्तावाबाबतची वस्तुस्थिती
नागपूर/प्रतिनिधी:
वार्षिक महसुलाची गरज व अपेक्षीत महसूल यातील तफावत भरुन काढण्यासाठी विविध वर्गवारीची वीजदर वाढ मा. आयोगातर्फे ठरविली जाते. सदर तफावतीला महसुली तूट असे संबोधले जाते. परंतु सदर महसुली तूट म्हणजे महावितरण कंपनीचा तोटा नाही. 
महावितरणची लेखापद्घती ही अॅक्रुअल पद्घतीवर आधारित आहे. म्हणजेच महावितरणने बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम (प्रत्यक्ष वसुली झाली नसली तरीही) महसूल म्हणून महावितरणच्या लेखांमध्ये विचारात घेण्यात येते. लेखातत्वानुसार बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम महसुलामध्ये विचारात घेण्यात आली असल्याने थकबाकीचा महसुली  तुटीवर किंवा वीजदर वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही. 
महावितरण येथे असेही स्पष्ट करु इच्छिते की, आर्थिक वर्ष 2018-19 साठी प्रस्तावित सरासरी पुरवठा आकाराची (रु. 7.74 प्रतियुनिट) तुलना आर्थिक वर्ष 2018-19 साठी मा. आयोगाने मंजूर केलेल्या सरासरी पुरवठा आकाराशी (रु. 6.71 प्रतियुनिट) केली असता सदर दरवाढ 15% आहे. तसेच आर्थिक वर्ष  2018-19 च्या प्रस्तावित दरांवर आर्थिक वर्ष 2019-20 करीता कोणतीही दरवाढ प्रस्तावित केलेली नाही.
महावितरण येथे नमूद करू इच्छिते की, केंद्रीय विद्युत मंत्रालय यांनी निर्देशित केलेल्या राष्ट्रीय वीजदर धोरण 2016 मधील क्रॉस सबसिडी कमी करण्याच्या (सर्व वर्गवारीचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या + / - 20 टक्क्यांपर्यंत आणणे) मुख्य तरतुदीनुसार सदर याचिकेत महावितरणने सबसिडायजींग ग्राहक वर्गवारीकरीता कमी वीजदर वाढ व सबसिडाईज्ड ग्राहक वर्गवारीकरीता जास्त वीजदर वाढ प्रस्तावित केली आहे.
तसेच मा. आयोगाचे धोरण असे आहे की, महावितरणचा स्थिर खर्च हा स्थिर आकारातून भागविला पाहिजे. तसेच मा. विद्युत मंत्रालयाने दि.24.08.2017 च्या कन्सल्टेशन पेपरमध्ये असे प्रस्तावित केले आहे की, राज्य आयोगाने टप्याटप्याने तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वितरण परवानाधारकाच्या स्थिर खर्चाच्या 75 %  ते 100 %  वसुली ही स्थिर आकाराच्या माध्यमातून करावी.मा. आयोगातर्फे सन 2008 साली दिलेल्या आदेशान्वये भारनियमनाच्या कारणास्तव महावितरणच्या ग्राहकांचे स्थिर आकार एकतर्फी अर्ध्यापर्यंत कमी करण्यात आले होते. परंतु आर्थिक वर्ष  2015-16 पासुन महावितरणकडे मुबलक प्रमाणात विजेची उपलब्धता आहे. परंतु स्थिर आकार सध्या त्याप्रमाणात प्रदान करण्यात आलेले नाहीत. 
सध्या महावितरणचा स्थिर खर्च हा एकूण खर्चाच्या 55% असून मा. आयोगाने मंजूर करुन दिलेल्या स्थिर आकारातुन येणारा महसूल हा एकूण महसुलाच्या फक्त 15% आहे. त्यामुळे महावितरणने स्थिर आकारात वाढ प्रस्तावित केलेली आहे. येथे असे नमुद करणे गरजेचे आहे की, प्रस्तावित केल्याप्रमाणे स्थिर आकारात वाढ करुनसुध्दा स्थिर आकारातुन येणारा महसूल एकूण महसुलाच्या फक्त 24% पर्यंतच होणार आहे. इतर काही राज्यांमध्ये सुध्दा घरगुती वर्गवारीसाठी वीजवापरानुसार तसेच वीजजोडभारानुसार  बदलते स्थिर आकार लागू आहेत. मध्यप्रदेशात रु. 20 प्रत्येक 0.1 कि.वॅ. भारासाठी म्हणजे रु. 400 प्रति महिना 2 कि.वॅ भारासाठी, दिल्लीत रु. 250 प्रति महिना 2 कि.वॅ. भारासाठी तर छत्तीसगडमध्ये 300 युनिट्ससाठी रु. 858 प्रति महिना इतके स्थिर आकार लागू आहेत. या तुलनेत महावितरणने 300 युनिट्सपर्यंतच्या वीजवापरावर रु. 170 प्रतिमहिना एवढाच स्थिर आकार प्रस्तावित केला आहे. जो तुलनेने कमीच आहे. 300 युनिट्सपर्यंत वीजवापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या 95% आहे. 
मा.आयोगाच्या दि. 3 नोव्हेंबर 2016 च्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. आर्थिक वर्ष 2016-17 व 2017-18 चा उच्चदाब औद्योगिक वर्गवारीचा मा.आयोगाने मंजूर केलेला सरासरी देयक दर अनुक्रमे रु. 8.57 प्रतियुनिट वरुन रु. 8.61 प्रतियुनिट होता. परंतु उपलब्ध सर्वसवलतींचा लाभ घेतल्याने प्रत्यक्ष आकारणीअंती आलेला सरासरी  देयक दर अनुक्रमे रु. 7.03 व रु.7.20 इतका आहे.तसेच इतर राज्यांतील उच्चदाब औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचे सरासरी देयक आकार (आर्थिक वर्ष 2017-18) खालील तक्त्यात दर्शविले आहेत.
उपरोक्त तक्त्यावरुन असे निदर्शनास येते की, महावितरणच्या औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचे वीजदर हे इतर राज्यांच्या जवळपास समतुल्य आहेत. शासनाने दि.29.06.2016, दि. 24.03.2017 व दि. 23.11.2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, D व D+ क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत परिक्षेत्रातील विद्युत ग्राहकांना (अ) इंधन समायोजन आकार, (ब) उद्योगांच्या कार्यक्षमतेवर आधारित व (क) नवीन उद्योगांकरिता प्रोत्साहनपर सवलत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार विदर्भातील औद्योगिक वीजग्राहकांना वीजबिलात 70 ते 192 पैसे प्रतियुनिट, मराठवाड्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना वीजबिलात 55 ते 130 पैसे प्रतियुनिट, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक वीजग्राहकांना वीज बिलात 30 ते 60 पैसे प्रतियुनिट व डी, डी +  मधील औद्योगिक वीजग्राहकांना वीजबिलात 5 ते 25 पैसे प्रतियुनिट सवलत उपलब्ध आहे. पर्यायाने महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त दराने वीज उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याचे औद्योगिक दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत, असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. 
 महाराष्ट्रातील कृषी ग्राहकांचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या 50% पेक्षाही कमी आहेत. विविध राज्यासाठी तेथील मा. आयोगाने कृषीवर्गवारीसाठी ठरविलेल्या दराची तुलना खालील तक्त्यात केली आहे.  

                                                           
 
वरील तक्त्यावरुन असे निदर्शनास येते की, महाराष्ट्रातील कृषीग्राहकांचे वीजदर हे सरासरी वीज पुरवठा आकारापेक्षा कमी असल्याने क्रॉस सबसिडी सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय वीजदर धोरण 2016 मधील क्रॉस सबसिडी कमी करण्याच्या (सर्व वर्गवारीचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या +/- 20 टक्क्यापर्यंत आणणे) मुख्य तरतुदीनुसार सदर क्रॉस सबसिडीचा भार कमी करण्यासाठी कृषी वर्गवारीच्या दरात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 
महावितरणने कृषी वीजवापराच्या पडताळणीसाठी अतिउच्चदाब इनपूटवर आधारीत संख्याशास्त्रीय अभ्यासाचा अहवाल मा. आयोगास पत्र क्र. SE/TRC/MTR3B/NO.11378 द्वारे दि. 21.05.2018 रोजी सादर केला. अतिउच्चदाब इनपूट संबंधीची माहिती महापारेषणच्या वाहिनीवर आधारीत असल्याकारणाने सदर घटकाची निवड गणना करण्यासाठी करण्यात आली आहे. म्हणूनच गणना करण्यासाठी वापरलेली माहिती त्रयस्थ पक्षाची व कमीतकमी मानवी हस्तक्षेप असणारी असल्यामुळें योग्य, वास्तववादी आणि सुसंगत आहे. 
महाराष्ट्रातील पर्जन्यमान, पिकांचा नमुना आणि कृषी व फलोत्पादन यावर आधारीत कृषी वीजवापराच्या पडताळणीसाठी संख्याशास्त्रीय अभ्याससुध्दा महावितरणतर्फे करण्यात आला असून त्याचा स्वतंत्र असा अहवाल सादर करण्यात आला आहे. सदरील अभ्यासावरुन असे लक्षात येते की, महावितरणतर्फे आर्थिक वर्ष 2014-15 आणि आर्थिक वर्ष 2015-16 साठीची नमूद केलेली कृषी वीज विक्री ही निराधार नसून, जे घटक महावितरणशी संबंधीत नाहीत अशा घटकांच्या संख्याशास्त्रीय अभ्यासावरुंन आलेल्या निष्कर्षाशी तर्कसंगत आहे. 
महावितरण मीटरींग व बिलिंगसह विविध क्षेत्रात कठोर परिश्रम करून वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. जेणेकरून वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल व वितरण क्षेत्रात महावितरणच्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल. इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माननीय आयोगाने विहित केलेल्या बहुवार्षिक वीजदर आदेशात निदेर्शित केल्याप्रमाणे वितरण हानी कमी करण्याचे लक्ष्य महावितरण साध्य करीत आहे. तसेच 2006-07 या वर्षातील सुरुवातीची 30.2% वितरण हानी महावितरणने आर्थिक वर्ष 2017-18 साठी 13.92% वर आणली आहे. 
वरील विवेचनावरून महावितरणने सादर केलेला दरवाढीचा प्रस्ताव परिस्थितीनुरूप योग्य आहे, ही वस्तुस्थिती आहे.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:

मध्य चांद वन विभागातील कोठारी,धाबा,बल्लारपूर, पोभूर्ण या चार वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याने येथे नेहमी मानव - वन्यजिव संघर्ष होतात.त्यामुळे या परिसरात जंगलालगत गावातील विद्याथ्याना निसर्ग सखा संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आदरणीय अरण्यऋषी मारोती चितमपल्ली यांनी लिहलेले जंगलाची दुनिया या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम वनपरिक्षेत्र कोठारी याच्या कार्यलयात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक बी.जी हाके वनपरिक्षेत्र अधिकारी कोठारी यांनी केले तर अध्यक्ष म्हणून प.स.सदस्य सोमेश्वर पद्यगिरीवर हे होते .
निसर्ग सखा संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून ते या परिसरात वन व वन्यजीव संरक्षणाचे कार्य करीत आहे . लोकसहभागाशिवाय वन्यजीव सरंक्षण करणे अवघड असल्याने येथिल नागरिकांनी वन - वन्यजीव संरक्षणा करीता पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन बी.जी हाके यांनी यावेळी केले
अरण्यऋषीं मारोती चितमपल्ली सर हे निसर्ग लेखक म्हणून ख्यातीप्रात आहे.त्यानी लिहलेल्या पुस्तकांनी येथील युवक , विद्याथ्याना निसर्ग व वन्यजीव संरक्षणाची आवड निर्माण होईल.युवक,विद्यार्थी निसर्ग संरक्षणाकडे वळतील अशी आशा आहे असे मत निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दिपक वांढरे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले वन विभागाने निसर्गअनुभ ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो मुलांना एक दिवसिय जंगलात शिबीराचे आयोजन केले त्या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विध्याथ्याना या पुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे असे ते सांगितले. कार्यक्रमास कोठारी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बी.जे.हाके,सोमोश्वर पद्यगिरीवर सदस्य ,प.स.बल्लारपूर,गोलू बाराहोते वन्यजीव फोटोग्राफर, चंद्रपूर, नितीन रायपूर अध्यक्ष,छायाचित्रकार बहु.संस्था, चंद्रपूर ,सुशील खोब्रागडे कोठारी,फुलचंद मेश्राम, चंद्रपूर संदीप गव्हारे,चंद्रपूर दिपक वांढरे अध्यक्ष, निसर्ग सखा संस्था इ उपस्थित होते.
बुधवारी नागपूरच्या काही भागातील वीज पुरवठा असणार बंद

बुधवारी नागपूरच्या काही भागातील वीज पुरवठा असणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्ती तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील काही नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. 
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मेडिकल कॉलनी, अजनी रेल्वे स्टेशन, काँग्रेस नगर,छोटी धंतोली, बर्डी मेन रोड, महाजन मार्केट,लोखंडी पुल,टेकडी रोड,टेकडी गणेश मंदिर, शनी मंदिर, आनंद टॉकीज परिसर, सकाळी ९ ते ११ या वेळेत पंचदिप नगर, डॉक्टर कॉलनी, दक्षिण अंबाझरी मार्ग,लक्ष्मी नगर,बजाज नगर,माधव नगर, अभ्यंकर नगर,शंकर नगर, कार्पोरेशन कॉलनी, सकाळी ९ ते दुपारी १ या काळात अमरावती रोड, हिंदुस्थान कॉलनी, गोंड बस्ती, राम नगर परिसर, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यन्त धरमपेठ,भगवाघर ले आऊट,सुजाता ले आऊट, आझाद हिंद नगर, जीवन छाया ,स्वावलंबी नगर,इंद्रप्रस्थ नगर, संचयनी कॉम्पलेक्स, टेलिकॉम नगर,रवींद्र नगर, संघर्ष नगर,भांगे विहार, शहाणे ले आऊट, सुभाष नगर,तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, हिंगणा रोड, शास्त्री ले आऊट, त्रिमूर्ती नगर, नेलको सोसायटी य परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी, वीज बंद राहणार असलेल्या काळात ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येईल.
मनपा शाळांमध्ये मिळणार ॲथलेटिक्स व बुद्धीबळाचे धडे

मनपा शाळांमध्ये मिळणार ॲथलेटिक्स व बुद्धीबळाचे धडे

प्रतिभावंत खेळाडूंना खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील प्रतिभावंत खेळाडू पुढे येऊन शहाराचा नावलौकिक करावा, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये लवकरच ॲथलेटिक्स व बुद्धीबळ खेळाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक शाळेत मानधन तत्त्वावर प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. 
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक वातावरण तयार करून प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शाळांमधील सर्व क्रीडा शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा उपसभापती प्रमोद तभाने, सदस्य दर्शनी धवड, विरंका भिवगडे, संजय चावरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना श्री. सहारे म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने ते पुढे येऊ शकत नाही. शिवाय काही मनपा शाळांमध्ये मैदानही उपलब्ध आहेत. मात्र देखरेखीअभावी त्यांचीही अवस्था वाईट आहे. या मैदानांना दुरूस्त करून येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा मिळवून देता येईल. महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक रूची निर्माण करून विद्यार्थ्यांना खेळाच्या जवळ आणण्याचा मनपाचा मानस आहे. यासाठी इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. यामध्ये सुरूवातीला ॲथलेटिक्सला प्राधान्य देण्यात येणार असून, ॲथलेटिक्समधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची तीन दिवस चाचणी घेण्यात येईल. यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिर घेण्यात येईल. प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातून पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे या मागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 
याशिवाय बुद्धीबळामध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक करावा, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये बुद्धीबळातील तज्ज्ञांकडून धडे देण्यात येतील. यासाठी मनपाकडून मानधन तत्त्वावर बुद्धीबळ तज्ज्ञांची नेमणूक करण्याचेही त्यांनी सुचविले. याशिवाय प्रत्येक मनपा शाळेत कार्यरत शारीरिक शिक्षकही प्रावीण्य असलेल्या खेळात विशेष मेहनत घेऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. मनपा शाळेतील प्रतिभावंत खेळाडूंच्या विकासासाठी सर्व बाबींमध्ये शारीरिक शिक्षकांना मदत करणार असल्याचे शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी सांगितले.
गोंडखैरीत दोन दिवसीय शिवयोगी कृषी पध्दतीचे प्रशिक्षण संपन्न

गोंडखैरीत दोन दिवसीय शिवयोगी कृषी पध्दतीचे प्रशिक्षण संपन्न

शेकडो शेतकऱ्यांनी घेतला लाभ
बाजारगाव/गजेंद्र डोंगरे:
कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गलगत गोंडखैरी स्थानिक श्री.विठ्ठल-रुख्मिनी देवस्थान सभागृहात दोन दिवसीय शिवयोगी कृषि पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले.तालुक्यातील गाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधिचा लाभ यावेळी घेण्यात आला.*
डाँ.अवधूत शिवानंद प्राचीन शिवयोगचे शिवयोग गुरु असून आधुनिक युगातले सनातन वंशाचे ब्रम्हांडीय वैज्ञानिक आहे.त्यांनी एक नविन शिवयोग ब्रम्हांडीय कृषी पध्दती निर्माण केली असून २०१४ पासून शेतकरी ही पध्दत अमंलात आणत आहे. शुन्य लागत असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी याचा लाभ घेत आहे. या पध्दतीने शेत जमीन सुपीक होते.  
उत्पादनाची गुणवत्ता वाढते बी-बीयाने पृष्ट होतात. व पिकांचे सरक्षण होते. शेतीसाठी लागणारा खर्च पन्नास टक्के कमी व उत्पन्न दोन पटीपेक्षा जास्त होते. शिवयोगी पध्दतीचे अनुभव घेतलेले शेतकरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात व अनेक राज्यात घेण्यात आले.
आसाम, कृषी विद्यापीठ जुनागढ, कृषी विद्यापीठ गुजरात, जवहरलाल नेहरु कृषी विद्यापीठ जबलपूर व इतर कृषी वैज्ञानिकाने याचे सफल प्रयोग केले. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने या पध्दतीचे प्रशिक्षण आत्मा अग्रीकल्चर टेक्नालाँजी मँनजमेंट एजंशी अंतर्गत प्रत्येक जिल्हात तालुक्यातील गावागावात शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. सदर शिवयोगी कृषी पध्दतीचे दोन दिवसीय प्रशिक्षण गोंडखैरी येथे श्री.विठ्ठल-रुख्मिनी सभागृहात रविवार (२९/जूलै) ला संपन्न झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घेतला. 
यावेळी स्थानिक सरपंच चांगदेव कुबडे, माजी उपसरपंच हेमराज पोहनकर, श्री.विठ्ठल-रुख्मिनी देवस्थान कमेटीचे अध्यक्ष भास्कर तिडके,निरंजन अत्करी, शिवयोगी संस्थेचे किरण वंजारी,संगीता त्रिपाठी, वर्षा चौरसिया, दिपमाला घुमडे,फटींग, तसेच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
जागतीक व्याघ्र दिनी इको-प्रो ची जुनोना गावांत जनजागृती

जागतीक व्याघ्र दिनी इको-प्रो ची जुनोना गावांत जनजागृती

इको-प्रो, संयुक्त वनव्यवस्थापन समीती चा उपक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 आज जागतीक व्याघ्र दिनानिमीत्त जंगलव्याप्त जुनोना गावात इको-प्रो व संयुक्त वनव्यवस्थापन समीती, जुनोना च्या माध्यमाने गावात रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
इको-प्रो वन्यजीव विभाग, इको-प्रो जुनोना शाखा व संयुक्त वनव्यवस्थापन समीती च्या वतीने आज जागतीक व्याघ्र दिनाचे औचित्य साधुन शाळकरी विदयाथ्र्यासोबत गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच ग्रामंपयाच भवन येथे कार्यक्रमातुन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जुनोना ग्रामपंचायतीच्या संरपचा मालतीताई कुळमेथे, बंडु धोतरे, इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक शाम पेटकुले, अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समीती, विजय विमलवार, वनरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
गावातील शाळकरी विदयार्थी यांना सोबत घेऊन इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते व जुनोना संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य यांनी गावातुन जनजागृती रॅली काढली. विदयाथ्र्याच्या ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ च्या घोषणा आणी वाघाचे ड्रेस परिधान केल्याने गावातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत होते. हे पाहुन बरेच छोटे मुले-विदयार्थी सुध्दा या रॅलीत सहभागी झाले. रॅली नंतर जुनोना ग्रामपंचायत मध्ये छोटेखाणी कार्यक्रमातुन जनजागृती बाबत बंडु धोतरे, मानद वन्यजीव रक्षक यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगत जिल्हयातील वाघ-मानव संघर्षाची कारणे व उपाययोजना म्हणुन आपण काय करावे, काय करू नये याबाबत माहीती दिली. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाघाचे महत्व विषद करीत वाघ-मानव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने सर्व पातळीवरून कार्य करण्याची गरज विषद केली. सोबतच भविष्यात ग्रामपंचायत, संयुक्त वनव्यवस्थापन समीती व इको-प्रो जुनोना शाखा मिळुन गांव विकासासाठी, वन-वन्यजीव संरक्षणसाठी, गांव स्वच्छतेसाठी, निसर्ग पर्यटन विकास या दृष्टीने काम करण्याची संधी असुन सर्वानी एकत्रीत येत कशा पध्दतीने गावासाठी कार्य करता येईल याची माहीती दिली.
यावेळी संयुक्त वनव्यवस्थापन समीतीचे सदस्य सुभाष टिकेदार, सविता वेलादी, मायाबाई बोरूले, मीनाताई मुदद्लकर. इको-प्रो जुनोना शाखाचे सदस्य किशोर पेटकुले, गुरूदास भोयर, शैलेश मुडपल्लीवार, अनिकेत जेगठें, प्रशांत मांढरे, सोनाली पेंदाम, दिनेश कन्नाके, संजय वाढई तसेच चंद्रपूर इको-प्रो पदाधिकारी बिमल शहा, राजु काहीलकर, हरीश मेश्राम, सुधीर देव, सुनिल लिपटे, वैभव मडावी, आशिष मस्के, अतुल राखंुडे, आयुषी मुल्लेवार, सारीका वाकुडकर उपस्थित होते.

ग्रीन प्लॉनेट सोसायटी, सार्डतर्फे जागृती पत्रक वाटप

ग्रीन प्लॉनेट सोसायटी, सार्डतर्फे जागृती पत्रक वाटप

Environmental balance through tiger conservation | व्याघ्र संवर्धनातून पर्यावरणाचे संतुलनचंद्रपूर/प्रतिनिधी:
जागतिक व्याघ्र दिनानिम्त्ति चंद्रपूर-मूल मार्ग, महापालिका व वन नाक्याजवळ सामाजिक संस्थेंकडून ग्रीन प्लानेट सोसायटी व सार्ड संस्थेच्या वतीने ‘वाघ व वन्यजीव वाचवा’ असे संदेश देणारी पत्रके वाटण्यात आली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, सार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कामडे, प्रा. डॉ.योगेश दुधपचारे, प्रा सचिन वझलवार,दिनेश खाटे,भाविक येरगुडे, विलास माथनकर, स्वप्नील राजूरकर,नितीन मत्ते, प्रवीण राळे,महेंद्र राळे, कमलेश व्यवहारे,संदीप वडते, संचिता मत्ते आदी उपस्थित होते. वनातून जाणाºया महामार्गावर उपाय योजना करण्याची कार्यकर्त्यांनी केली.जंगल मार्गावर अंडर पासेस व गतिरोधक नसल्याने वाघ आणि वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत.त्यामुळे जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी हे पाउल उचलले  आहे.

 
बलात्कार प्रकरणात होणार मृत्युदंड:विधेयक लोकसभेत मंजुर

बलात्कार प्रकरणात होणार मृत्युदंड:विधेयक लोकसभेत मंजुर

atyachar साठी इमेज परिणामनवी दिल्ली:
12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या वटहुकूमावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं वृत्त PTI ने दिलं आहे.
जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं बालिकेवर झालेला सामूहिक बलात्कार आणि खून तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव इथल्या बलात्काराची घटना यावर देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. यात 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर आणि 16 वर्षांच्या आतील मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Monday, July 30, 2018

मुनगंटीवारांच्या अनोख्या वाढदिवस शुभेच्छुक बॅनरच्या शहरात चर्चा

मुनगंटीवारांच्या अनोख्या वाढदिवस शुभेच्छुक बॅनरच्या शहरात चर्चा

विशेष/प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस ,यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर प्रत्येक मिनिटाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ,वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग चंद्रपुर शहरात जागोजागी लावण्यात आलेले आहे.
कुणासाठी विकास पुरुष, कुणासाठी पुढारी, कुणासाठी लोकनेते, तर कुणासाठी चक्क दैवत असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आज वर्तमानपत्रात व होर्डिंग सोबत सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून चांगलाच वर्षाव होत आहे.
हा शुभेच्छाचा वर्षाव होत असतांना शहरात एक आगडावेगडा शुभेच्छा देणारा बॅनर देखील शहरातील सावरकर चौक येथील विद्युत रोहित्रावर बांधलेला दिसला ज्यात चंद्रपुरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विकास पुरुष सुधीर भाऊंना चंद्रपुर वासियांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अश्या आशयाचा हा होर्डिंग चित्र रुपात बराच काही सांगून जात आहे.
या होर्डिंगर शहरातील खड्यांचा फोटो लावण्यात आला आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात पडलेल्या खड्यांमुळे दोन जणांचा बळी गेला, त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने संबंधित विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. शहरातील हे खड्डे आदेशानंतर थातूरमातूर बुजवण्यात आले होते. त्यानंतर हे खड्डे पुन्हा उखडले गेले आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली. या हेल्मेट सक्तीवर बराच वाद विवाद रंगू लागला होता. इतके सर्व होऊन सुद्धा आजही खड्डे जैसे त्याच परिस्थितीत असल्यामुळे चंद्रपूरकरांच्या वतीने हा बॅनर सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मुख्य चौकात लावण्यात आल्याचे समजते. मात्र हा बॅनर कोणी लावला हे अद्यापही समजू शकले नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर हा बॅनर लागल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
हा संपूर्ण प्रकार भाजप कार्यकर्तांना माहीत होताच तत्काळ हा बॅनर सावरकर चौकातील त्या मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आला.मुनगंटीवार यांनी दिवसेंदिवस वाढत असलेली प्रसिद्धी त्यामुळे विरोधकानेच हा प्रताप केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.



Sunday, July 29, 2018

ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगूल वाजला

ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगूल वाजला

काटोल तालूक्यातील 53 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर


गजेंद्र डोंगरे/वार्ताहर-कोंढाळी
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी काटोल तालूक्यातील माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ याकालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०१८-१९ प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कालावधीत फक्त मुदत संपणार्‍या53 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.


प्रभाग रचना व आरक्षणचा टप्पा-
सोमवार दि. १८ जून पर्यंत तहसीलदार यांनी गुगल मॅपवरचे नकाशे करुन प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, सोमवार दि. २५ जून पर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करुन प्रभाग पाडणे,सीमा निश्चित करणे अनूसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण करणे, शनिवार दि. ३० जून पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता देणे शनिवार ७ जूलै पर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुपप्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे बुधवार दि. ११ जुलैपर्यंत नमुना ब प्रसिध्द करण्यापूर्वी तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने असे प्रस्ताव प्राप्त करुन त्यांची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दूरुस्त्या करणे, गुरुवार दि. १२ जूलै पर्यंत या दुरुस्त्या अंतभूत करुन प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी.


प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे – शुक्रवार दि. १३ जूलै पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी सूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. शुक्रवार दि.२० जूलै पर्यंत हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक दि. शनिवारदि. २१ जूलै २०१८ रेाजी पर्यत प्राप्त झालेल्या सर्व हरकती वसूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे, मंगळवार दि. ३१ जूलै पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सूनावणी घेणे.


सुनावणींनंतर अभिप्रायसह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे.प्रभाग रचना अंतिम करणे- सोमवार दि. ६ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्तावत पासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे, गुरुवार दि. ९ ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिध्दी देणे. अशी माहिती काटोल चे तहसीलदार निलेश कदम यांनी दिली आहे.
*ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडनूकिचा कार्यक्रम जाहीर होताच काटोल तालूक्यातील राजकिय पक्षाचे कार्यकर्ते आप आपले गट तट मजबूती साठी विव्ह रचनेत लागनारच, मात्र जून -जूलै महिनाभर पेरणी चे कामाला लागले अस आता शेती कामात गुंतलेले काटोल तालूकावासी शेतकरी आता यांना 53 ग्रामपंचायत निवडनूकिला समोर जावे लागनार* तालूक्यात मागिल वर्षिच्या (2017)ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या ,. या वेळी 53ग्रा.प. मधे प्रथमताः थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार आहे.यात अनेक दिग्गजांना या निवडणूकित फेर बदल झाल्याचे दिसून येनार असल्याचे बोलल्या जात आहे.अनेक प्रस्थापितांना आरक्षणा चा फटका बसणार असुन त्यांना आपले राजकारण आपल्याकडेच ठेवायचे असल्यास उप सरपंच या पदावर राहून समाधान मानुन घ्यावे लागनार हे नक्की!आता मुदत संपनार्या गट-ग्रामपंचायत निवडणूका कोणासाठी फायद्याचे किंवा तोट्याच्या ठरतात हे निवडनुक झाल्यावर ठरणार! *जि.प.- पं. स. च्या निवडनुका न्यायालयीन प्रक्रित असल्याने त्या कधी होनार हा प्रश्न ऊभा ठाकला असतांनाच, कोंढाळी ग्राम पंचायतीचा दर्जा वाढ होऊन नगर पंचायत होनार अशी चर्चा होती , या साठी विद्यमान आमदार डाॅ आशिष देशमुख, माजी आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख, काटोल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सत्ता पक्ष गट नेते चरणसिंह ठाकूर या नेत्यांनी ताकद लाऊन ही कोंढाळी ला न.पंचायतीचा दर्जा वाढ मिळू शकला नाही. हे विषेश!!एकी कडे आमदार समीर मेघे यांचे निर्वाचन क्षेत्रातिल वानाडोंगरी व बुटी बोरी ह्या ग्रा.प.दर्जोन्नत झाल्या पण दोन्ही ग्रा.प. चे आधीची मागणी व त्या मागण्या नुसार सर्व माप दंड पुर्ण करूनही कोंढाळी ला नगर पंचायतीचा दर्जा देण्याच्या उद्घघोषणेत चे प्रसंगी कूठे माशी शिंकली?हे अनुत्तरित आहे. 2018ची ग्रा.प. निवडनूक संपन्न झाल्यावर 2019चे सुरूवातीलाच विधान सभा निवडनुका होणार या प्रसंगी कोंढाळी करांना न.पं. चे दिलेले आश्वासन पुर्ति साठी जर कोंढाळी न.पं. ची घोषणा केल्यास मग!हेऑक्टोबर 2018-चे सरपंच व ग्रा.प. सदस्यांचे काय?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत*
 8 ते 8.2 टक्केSNF दुधाकरिता मानांकन निश्चित करून दुधाची खरेदी करा:ना.हंसराज अहीर

8 ते 8.2 टक्केSNF दुधाकरिता मानांकन निश्चित करून दुधाची खरेदी करा:ना.हंसराज अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाद्वारे दुधाचे एसएनएफ मानांकन 8.5 टक्के निर्धारीत असले तरी चंद्रपूर जिल्हयातील वाढत्या दुग्धोत्पादनाच्या अनुषंगाने या एसएनएफ निर्धारणात सुधारणा करून ते 8 किंवा 8.2 टक्के करण्यात यावे जेणेकरून जिल्हयातील दुग्धोत्पादनास प्रोत्साहन मिळून दुग्धव्यवसायींना,शेतकऱ्यांना तसेच जिल्हा मदर डेअरी धारकांना योग्य न्याय मिळेल व ग्राहकांची दुधाची मागणी जिल्हा स्तरावरून पूर्ण केली जाईल संबंधित अधिकाऱ्यांनी या पाश्र्वभुमीवर या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडे सादर करावा असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरी समन्वय सभेत मार्गदर्शन करतांना दिले. 
स्थानिय शासकीय विश्रामगृहात 28 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी बोलाविलेल्या या समन्वय सभेला मदर डेअरीचे जिल्हा प्रमुख पांडे, चंद्रपूर देवाडा येथील दुध संकलक प्रफुल पिदुरकर, जिल्हा दुग्धविकास व्यवसाय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व अन्य दुध संकलकाची विशेष उपस्थिती होती. केंद्रीय
 गृह राज्यमंत्रयांनी मदर डेअरी द्वारा स्थापित युनिटमुळे जिल्ह्यामध्ये दुग्धोत्पादनास प्रोत्साहन मिळाले असून अनेक पशुपालकांनी बॅंकांचे कर्ज घेवून दुधाळू जनावरे खरेदी केली आहेत. दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून कुटूंबास हातभार लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच मानांकनाचा मुद्दा पुढे करीत 8.5 एसएनएफची सक्ती होत असल्याने जिल्हयात यापेक्षा कमी एसएनएफ 8 व 8.2 टक्के असलेले पशुपालकांद्वारा पुरवठा होत असलेले दुध मदर डेअरी द्वारा स्वीकारण्यात येत नसल्यामुळे
 जिल्ह्यात दुग्ध व्यवसायावर संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत असून दुग्ध व्यवसायींचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारींची मदर डेअरी तसेच शासकीय दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी  गांभीर्याने दखल घ्यावी व स्थापित मानांकनाचा आग्रह न धरता एसएनएफ 8 टक्के 8.1 टक्के व 8.2 टक्के असलेले दुध स्वीकारण्यात यावे अशी भुमिका ना. अहीर यांनी या समन्वय सभेमध्ये व्यक्त केली.
जिल्ह्यातील पर्यावरण, निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य तसेच निष्प्रभ पशुवैद्यकीय सेवा यासारख्या कारणांमुळे .5 ते 8.2 टक्क्यांपर्यंत असते. परिणामी हे दुध परत केल्या जात असल्याने दुग्ध व्यवसायी हवालदील झालेला आहे. बॅंकांचे कर्ज डोक्यावर असतांना व्याजामुळे या पशुपालकांचे कंबरडे मोडत आहेत, दुधाची विक्री होत नसल्याने बॅंक कर्जाची परतफेड करण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाद्वारे स्थापित एसएनएफ मानांकनात सुधार करून 8.5 ऐवजी 8.2 टक्क्यांपर्यंत एसएनएफ असलेल्या दुधाच्या खरेदीस मान्यता देण्यात यावी या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून संबंधित मानांकन निर्धारीत करणाऱ्या यंत्राणेकडे सादर करण्यात यावा असेही केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांनी या बैठकीमध्ये निर्देशित केले. या बैठकीस सुमारे 30 हून अधिक दुग्धोत्पादक उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरी संचालक तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या चेअरमन यांना उपरोक्त विषयानुषंगाने पत्र लिहीले आहे.

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक अंबाळा तिर्थक्षेञ येथे दहा दुकानात चोरी

रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):


 रामटेक शहरात व परीसरात मागिल चार पाच दिवसापासुन मोठाप्रमाणात चोरीच्यां घटना होत अाहे. गडमंदिर परीसरातील जवळपास पन्नास दुकानाची चोरी या चार दिवसात झाली असुन. शनिवारच्या मध्यराञी पुन्हा अंबाळा तिर्थक्षेञ येथे
दहा दुकानात चोरी एकूण १८,४५० रुपये रोख  रक्कमेची चोरी केली.घटनेची माहीती मिळताच माजी आमदार अाशिष जयस्वाल व नगरसेवक सुमित कोठारी यांनी घटना स्थळी भेट दिली.
१) रमाबाई सुखदेव गलबले - ४,०००
२ ) शालु रामभाउ आगाशे ५,००० 
३ ) राजेश सुखदेव गलबले - ६५०
४ ) अकुंश रामराव कठौते -२५०
५ ) बबन छोटु भारती - १८००
६ ) बबीता विरसिंग पवार - ६००
७ ) प्रमोद प्रभाकर वाघ - ४५००
८ ) विजय राजाराम कोहळे - १५०
९ ) चंदन लक्ष्मण चौव्हान - १००० 
१०) गिता जगतसिंग कछवा यांच्या दुकानातील लाॅक तोडले  या प्रकरणी  ३७९ अन्वेय गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरिक्षक दिपक वंजारी पी.एस.आय.मुत्येपोड,पी.एस.आय . सरकटे पुढिल तपास करीत अाहे.                                          

आज प्रदर्शित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 'चलो जीते है'

आज प्रदर्शित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 'चलो जीते है'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत शॉर्ट फिल्‍म 
'चलो जीते है' आज रात्री ९ वाजता स्टार टीव्हीच्या सर्व चॅनलवर
पंतप्रधान मोदी यांच्‍या बालपणावर आधारीत ही शॉर्ट फिल्‍म आहे. बालपणी विवेकानंदांच्‍या विचारांनी नरेंद्र मोदी कसे प्रभावित झाले व त्‍यांना कोणासाठी जगावे, या प्रश्‍नाने कसे झपाटले होते, हे या शॉर्ट फिल्‍ममध्‍ये दाखवण्‍यात आले आहे.  
महावीर जैन, भूषण कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मंगेश हडावळे यांनी ही शॉर्ट फिल्‍म दिग्‍दर्शित केली असून आनंद एल. रॉय आणि महावीर जैन या लघुपटाचे सादरीकरण करत आहेत. 29 जुलै रोजी जवळपास 32 मिनिटांची ही शॉर्ट फिल्‍म रिलीज होणार आहे.




परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या ४० गुरुवर्यांचा सत्कार
स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्राचीन काळापासूनच समाजात गुरुला विशेष स्थाण देण्यात आले आहे. मनुष्य जन्मापासूनच त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रक्ष रित्या विविध क्षेत्रातील अनेक गुरुंचे संस्कार होत असते मात्र हे गुरु दुर्लक्षित झाले आहे परंतु त्यांच्याकडून झालेल्या संस्कारातुमच उत्तम समाज घडू शकतो त्यामुळे उत्तम समाज घडवीण्यात परंपरागत गुरूंचे मोठे योगदान असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मातोत्री सभागृहात आयोजीत या सत्कार सोहळयात कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून उषाताई हजारे, प्रमुख पाहुणे प्रा. सुर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, बबनराव फंड, विमल काष्टीया, किशोर पडगेलवार, आशा बुरडकर, दादाजी नंदनवार, किशोर तळवेकर, प्रमिला गटलेवार, नंदा जोशी, वंदना हातगावकर, संतोशी चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, आजवर धनादय, सर्वपरिचीत अश्या व्यक्तींचाच सत्कार केल्या जात होता. मात्र या समाजात असेही गुरु आहेत त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत अणेक विदयार्थी घडवीले. आज या गुरुंमुळे अणेकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी या गुरुकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात प्रथमच अश्या अनोख्या सत्कार सोहळयाचे आयोजन केल्या गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगीतले.
या सत्कार सोहळ्यात ड्राइंग चित्रकार चंदु पाठक, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, पोलीस मार्गदर्शक रामदास खुजे, मूर्तीकार वामन बोरसरे, मल्लखांब प्रशिक्षक किशोर पडगेलवार, संगीत शिक्षक किशोर तळवेकर, आखाडा प्रशिक्षक महादेव बेले, कारपेंटर प्रशिक्षक वासुदेव वनकर यासारख्या परंपरागत गुरूंचा सत्कार करण्यात आला यांनी अनेकांना घडविले त्यातून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिले त्याबद्दल यांचा विशेष सत्कार संस्थे द्वारे करण्यात आला.
विकलांग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर हे नेहमी संस्थेच्या माध्यमातून अंध – अपंगांची मदत करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक विकलांग यांना शिलाई मशीन असो किव्हा तीनचाकी सायकल यासारखे अनेक साहित्य वाटप करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना
 सक्षम केले त्यामुळे त्यांचे समाजात उत्तम योगदान असल्याने त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 

पार पडलेल्या सत्कार सोहळयात विविध क्षेत्रातील जवळपास ४० गुरुवर्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संगीत क्षेत्रात काम करत असतांना अणेकांना संगीताचे धडे देऊन त्यांच्यातील कलाकरांना मंच उपलब्ध करुन देणा-या बंडु देठे यांचे ४४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उषाताई हजारे, प्रा. सुर्यकांत खनके, सुरेश पचारे, विमल काष्टीया, बंडू देठे, किशोर तळवेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ईरफान शेख यांनी केले तर संचालन एकता बंडावार यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बेलखेडे, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, दर्शन बुरडकर, विनोद गरडवा, सुधीर माजरे, प्रकाश चंदनखेडे, विनोद अनंतवार, हर्षद कानमपल्लीवार, नितीन नागरिकर, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, विजय वरवाडे, राशेद हुसैन, लोकेश कोटरंगे, शांताबाई धांडे, रजनी चिंचोळकर, बबलू मेश्राम, दिलीप बेंडले, रवी करमरकर, सुरज चव्हाण, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.
निसार तांबोळी वर्ध्याचे नवे पोलिस अधीक्षक

निसार तांबोळी वर्ध्याचे नवे पोलिस अधीक्षक

Nissar Tamboli will be joined as 36th SP | ३६ वे एसपी म्हणून रुजू होणार निसार तांबोळीवर्धा/प्रतिनिधी:
 शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्यातील शंभरहुन अधिक भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या फडणवीस सरकार यांनी केल्या.गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या बदल्या विविध कारणांमुळे रखडल्या होत्या.शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बदल्यांची यादी सरकारने जाहीर केली. 
अश्यातच वर्ध्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तांबोळी यांनी वर्धा जिल्ह्यात सन २००० ते २००५ या कालावधीत सेवा दिली आहे.