সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 05, 2018

बिबट्याचा मृतदेह आढळला

नागपूर/प्रतिनिधी:
 ज‌िल्ह्यातील खापा वनपरिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. मध्यप्रदेश सीमेवरील टेकाडी या गावानजीकच्या जंगलात हा मृतदेह आढळून आला. जंगलाला लागून असलेल्या शेतातील कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वन विभागाने काढला आहे. मृतदेहाच्या परिस्थितीवरून दोन ते तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्‍यात आला आहे. हा बिबट्या सुमारे सात ते आठ वर्षांचा असावा, असेही वन विभागातील सूत्रांनी सांगितले. या बिबट्याचे पोस्टमार्टम करून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अ‌‌धिकारी नीलेश गावंडे, नाईक, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.