সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 15, 2018

भूजल संवर्धनासाठी भूजल मंथन

*केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण राज्‍यमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन


नागपूर दि. 15 फेब्रुवारी 2018
केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे भूजलाच्‍या संवर्धनासाठी लोकसहभाग, भूजल व्‍यवस्‍थापन तसेच किफायतीशीर कृत्रिम पुनर्भरण’ या थीमवर आधारित दोन – दिवसीय ‘भूजल मंथनाचे’ उद्घाटन उद्या 16 फेब्रुवारी – शुक्रवार रोजी केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 9.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय जल संसाधन राज्‍यमंत्री श्री. अर्जृन राम मेघवाल तसेच राज्‍यमंत्री डॉ. सत्‍यपाल सिंह, महाराष्‍ट्राचे जल संसाधन मंत्री श्री.गिरीष महाजन, नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसीय भूजल मंथन कार्यक्रमात ग्रामीण भागातील जलसंवर्धन कार्यात सहभाग घेणारे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, पंचायत समिति सदस्‍य, स्‍वयंसेवी संस्‍थाचे प्रतिनिधी तसेच देशाच्‍या विविध भागातून सुमारे दोन – हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 16 तारखेच्‍या उद्घाटन सत्रांनतर ‘किफायतशीर नाविन्‍यपूर्ण कुत्रिम पुर्नभरण कार्यक्रम व शासनाचा पुढाकार’ या विषयावर सकाळी 11.30 ते 2.30 यावेळात प्रथम तांत्रिक सत्राचे आयोजन करण्‍यात आले असून यात पूर्ती सिंचन समृद्‌धी संस्थेतर्फे तामसवाडा पध्‍दतीची नाला प्रक्रीया, केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या- वॅप्‍कोज् (वाटर अ‍ॅड पॉवर कन्सलटन्सी सर्विस लिमीटेड) या संस्‍थेतर्फे ‘ब्रिज–कम–बंधारा’ , केंद्रीय भूजल मंडळ,महाराष्ट्र शासनच्या जलयुक्त शिवार व राजस्थानच्या मुख्यमंत्री जल स्वावंलबन योजना या विषयावर सादरीकरण करण्यात येईल. दुपारी 2.30 ते 5.30 या कालावधीत ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाच्या यशकथा’ यावर आधारित तांत्रिक सत्रामधे भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (जीएसडीए), पुणे या संस्थेतर्फे एकीकृत जलसंसाधन व्यवस्थापन यावर सादरीकरण तसेच ,राजस्थानच्या लापोरीयामधील ग्रामीण नवयुवक मंडल, आय.टी.सी. लिमिटेड,हिवरे बाजार येथील भूजल व्यवस्थापन, ग्रीन थंब पुणे या संस्थेतर्फे मुठा नदीपात्राचा विकास, अ‍ॅडव्हान्स सेंटर फ़ॉर वाटर रिर्सोस डेवलपमेंट अ‍ॅंड मॅनेजमेंट ,पुणे याबाबतच्या यशकथांकचेही सादरीकरण केले जाईल.

दुस-या दिवशी (17 फेब्रुवारी ) सकाळी 9.30 ते 12 दरम्यान ‘भूजल व्यवस्थापनाविषयी लोक सहभाग व अनुभव’ या विषयावर सादरीकरण केले जाईल. दुपारी 12 ते 1 दरम्यान परिषदेचा समारोप होईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.