- महापौर नंदा जिचकार यांच्याशी विविध विषयावर चर्चा
नागपूर,ता.२८ : नार्वे देशाच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २८) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली आणि नागपुरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली.
शिष्टमंडळात ॲन ऑलेस्टेड आणि नॉर्वे देशाच्या भारतीय दूतावासातील प्रतिनिधी राहुल माहेश्वरीयांचा समावेश होता. यावेळी महापौर नंदा जिचकार आणि नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांच्याशी नागपुरात विविध प्रकल्पांच्या विषयावर चर्चा केली.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी नागपुरात भांडेवाडी येथील प्रकल्पांची माहिती मान्यवरांना दिली. शिष्टमंडळांने नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्प, एरिया बेस्ड डेव्हलपमेंट, रोड नेटवर्क प्रकल्प, कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिटी ऑपरेशन सेंटर, नागपूर ग्रीन सिटी प्रकल्प, सांडपाणी पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प, २४ बाय ७ पाणी पुरवठा प्रकल्प आदी प्रकल्पांचे त्यांनी कौतुक केले.
नॉर्वे देश हा तंत्रज्ञानाने परिपूर्ण देश मानला जातो. कचऱ्यातून ऊर्जा तयार करण्याचे अनेक प्रकल्प त्या देशात राबविले जातात. तेथे उपयोगात येणारे ९७ टक्के प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून पुन: वापर करण्यात येते, अशी माहिती शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी दिली. यावेळी महानगरपालिकेचे उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो.इजराईल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.