সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 23, 2018

पेंच धरणातील पाण्यासाठी मनपाचा आक्रमक पवित्रा

नागपूर,ता.२३ : नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या विषयावरून नागपूर महानगरपालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून आरक्षण कपातीवर जलदगतीने तोडगा काढण्याचे निर्देश देत संबंधित विभागाकडे योग्य भूमिका मांडण्याचे निर्देश दिलेत.

बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपाच्या जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेवक विजय झलके, नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, जलप्रदाय व पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, जलप्रदायचे मुख्य महापव्यवस्थापक दिलीप टिपणीस, पर्यावरणविषयक सेवेचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज गणवीर, उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, उपअभियंता राजेश दुफारे, अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे प्रशासक एल.पी. इंगळे, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.भ. तुरखेडे, पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनीचे उपविभागीय अभियंता नागदिवे, पेंच पाटबंधारे शाखा नवेगाव खैरीचे शाखा अभियंता बाबरे, पेंच पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अ.रा. रामटेके यावेळी उपस्थित होते.

एकीकडे नागपूर शहराची लोकसंख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाकडून शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात कपात का करण्यात येत आहे? पाणी आरक्षणाचा निर्णय हा पूर्वीचा असून ती कपात करण्यात येऊ नये. यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनीही शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कुठलीही कपात करण्यात येऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया करण्यासंदर्भात चर्चा केली. १५ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत महापौर व अन्य पदाधिकारी तसेच अधिकारी हा विषय प्रखरपणे मांडतील, असेही यावेळी ठरविण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.