সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 21, 2018

आसाम नंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार

 – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार*

पोंभुर्णा येथे टूथपिक उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट व आर्ट युनिटचे लोकार्पण


आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्‍हायची पण आता आसाम नंतर फक्‍त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणा-या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्‍सला पुरवू शकतो. आदिवासी बहुल असलेल्‍या पोंभुर्णा तालुक्‍यात टूथपिक उत्‍पादन प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन रोजगार निर्मीतीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्‍यात विकासकामांसह रोजगार निर्मीतीच्‍या दृष्‍टीने अनेक प्रकल्‍प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्‍ही सहकार्य करा असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 21 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्‍पादन केंद्र तसेच बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट च्‍या लोकार्पण सोहळयाच्‍या निमीत्‍ताने आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभुर्णाच्‍या सभापती अलका आत्राम, पोंभुर्णा येथील नगराध्‍यक्षा श्‍वेता बनकर, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, नगरसेव‍क अजित मंगळगिरीवार, महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, चंद्रपूर वनवृत्‍ताचे मुख्‍य वनसंरक्षक एस.व्‍ही. रामाराव, बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे संचालक राहूल पाटील, मध्‍य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, पोंभुर्णा नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी विपिन मुद्दा आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा तालुक्‍यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे त्‍यामुळे त्‍यांच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम राबवावे असे मला मनापासुन वाटते. त्‍यादृष्‍टीने वाटचाल करीत आहोत. जंगल हे शाप की वरदान असा प्रश्‍न नेहमी उपस्थित केला जातो, पण जंगल आपल्‍यासाठी नेहमीच वरदान ठरले आहे. जंगलाच्‍या माध्‍यमातुन रोजगाराच्‍या वाटा आपल्‍याला गवसल्‍या आहे. पण केवळ रोजगारच नको तर देशभक्‍तीची भावना सुध्‍दा जागविण्‍याची आवश्‍यकता आहे. पोंभुर्णा तालुक्‍यातील आदिवासी महिलांची पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी ही महाराष्‍ट्रातील पहिली आदिवासी महिलांची संस्‍था ठरली आहे याचा या भागाचा लोकप्रतिनिधी म्‍हणून मला अभिमान आहे. आज माझ्या आदिवासी भगिनी आर्थिकदृष्‍टया स्‍वयंपूर्ण होत असल्‍याचा मला आनंद आहे. टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने शंभर गावांमध्‍ये समृध्‍द शेतीचा प्रयोग आपण करीत आहेत. या मतदार संघातील अंगण्‍वाडया आयएसओ प्रमाणित आदर्श करण्‍याची योजना आपण आखली आहे. पुढील सहा महिन्‍यात या मतदार संघात शंभर टक्‍के गावांमध्‍ये आरओ मशीन बसवून नागरिकांना शुध्‍द पिण्‍याचे पाणी आपण पुरविणार आहोत. पोंभुर्णा येथे बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिटच्‍या माध्‍यमातुन रोजगाराच्‍या संधी आपण उपलब्‍ध करीत आहोत. पोंभुर्णा तालुक्‍यासाठी स्‍वतंत्र एमआयडीसी स्‍थापन करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळाली आहे. ग्रामीण रूग्‍णालयाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम आरोग्‍य सेवा आपण या भागातील नागरिकांना पुरविणार आहोत. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालय मंजूर झाल्‍यामुळे येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्र उमरी पोतदार येथे स्‍थानांतरीत करण्‍याचा निर्णय सुध्‍दा झालेला आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्‍याचा आपला मानस आहे. जनतेच्‍या शुभेच्‍छांच्‍या बळावर आपण हा मानस निश्‍चीतपणे पूर्ण करू असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.

यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांचेही भाषण झाले. रोजगार व स्‍वयंरोजगाराला चालना देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाची दिर्घ मालिका या परिसरात निर्माण केली आहे. कधी नव्‍हे इतका निधी या भागाच्‍या विकासासाठी त्‍यांनी उपलब्‍ध केला आहे. त्‍यांची कार्यशैली आमच्‍यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात पोंभुर्णा तालुक्‍याला विकासाच्‍या वाटेवर अग्रेसर करण्‍याचा मनोदय त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केला.

महाराष्‍ट्र बांबु विकास मंडळाच्‍या माध्‍यमातुन टूथपिक उत्‍पादन केंद्र तर बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातुन तयार करण्‍यात आलेल्‍या बांबु हॅन्‍डीक्राफ्ट व आर्ट युनिट चे लोकार्पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.