बुधवारी चंद्रपूर येथे रामदेव बाबांचे आगमन होताच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. याची पुनरावृत्ती पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे घडली आहे,गुरवारी देखील चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथे कृषी मेळाव्यासाठी आलेल्या योग गुरू रामदेव बाबा यांना वरोरा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रत्नमाला चौकात काळे झेंडे दाखवून "रामदेव बाबा चले जाव"च्या घोषणा देण्यात आल्या.व भाजप सरकारचा निषेध नोंदवला.
रामदेवबाबा हे चंद्रपूर जिल्ह्यात ३ दिवसीय योग दौऱ्यावर आहेत,काल चंद्रपूर येथे महिलांचा संमेलन कार्यक्रमात येत असतांनाच चंद्रपुरात युवक कॉंग्रेसच्या वतीने रामदेव बाबा यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. हि काळेझेंडे दाखविण्याची पुनरावृत्ती कॉग्रेसने पुन्हा वरोऱ्यात दुसऱ्या दिवशीही केली.त्यामुळे रामदेवबाबा यांना सलग दुसऱ्यादा चंद्रपूर जिल्ह्यात काळे झेंड्याना मुकावे लागले आहे. यावेळी काँग्रेचे नेते डाॅ.विजय देवतळे व डाॅ.आसावरी देवतळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. "रामदेव बाबा चले जाव" "रामदेव बाबा कालेधन का क्या हुआ" , "रामदेव बाबा लोकपाल बिल का क्या हुआ" अश्या प्रकरे हातात ब्याणार घेऊन रामदेव बाबांच्या ताफ्यासमोर निदर्शेने करत घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष विलास टिपले,वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर,भगतसिंग मालुसरे,नगरसेवक विठ्ठल टाले,दुर्गा ठाकरे, सोमदेव कोहाडे,मनोहर स्वामी,मंगेश मसाडे,विनोद लांबट संजीवनी भोयर,शिरोमणी स्वामी,गिरीधर कष्टी,मनिष जयस्वाल,अंजु भोयर,जयश्री सरोदे, गंगाधर कारेकार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मिळालेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांनी याप्रकरणी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत असून वृत्त लिहीस्तोवर गुन्हे दाखल झाले नसल्याचे समजते आहे.