সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 13, 2018

नागार्जुन पर्वतावरील परीस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त

पोलीस अधिक्षकांसह सातशे पोलीसांनी सांभाळली कायदा
 व सुव्यवस्था; हजारो भावीकांनी घेतले दर्शन 
ससाई यांच्या उपस्थितीत बौद्ध संमेलन संपन्न  
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक शहरापासुन सुमारे चार कि.मी अंतरावर तुमसरकडे जातांना नागार्जुन पहाडी आहे या पर्वतावर पुरातन महादेवाचे मंदीर असून येथे महाशिवरात्रीला या भागातील भावीक मोठया संख्येत दर्शनाला  जातात मात्र मागील काही   वर्षांपासून  या गडाच्या पायथ्याशी बोधिसत्व नागार्जुन  महाविहाराची निर्मीती झाली आहे.त्यांनी या गडावर  आपला हक्क सांगीतला असून प्रकरण उच्च न्यायालयांत प्रलंबित आहे.याप्रकरणी उच्च  न्यायालयाने ‘जैसे थे’परीस्थिती ठेवावी असे आदेश   प्रशासनाला दिले आहेत.या पार्ष्वभूमीवर या  परीसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था धोक्यात  येवू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक  शैलेश बलकवडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राउत  व रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी यांच्या नेतृत्वात दोनशेवर पोलीसांनी या  परीसराचा ताबा घेतला होता.
.
गडावर भावीकांना दर्शनासतीसाठी जाता आलेे.त्यांना यासाठी कुठलीही मनाई करण्यात आलेली नाही.मात्र  कोणत्याही शिवभक्ताला त्रिषूल  किंवा तत्सम शस्त्र   घेवून जाता येणार नसल्याचे पोलीस सुत्रांनी आधीच  स्पश्ट केले होते त्यामुळे दोन ठिकाणी मेटल डिटेक्टर च्या तपासणीतून भावीकांना जावे लागले.अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांनी काही दिवसांपुर्वीच रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी यांच्या दालनात शांतता  सभा घेवून पोलीसांना सहकार्य करण्याची विनंती केली होती.कुठल्याही परीस्थितीत पोलीसांना बळाचा वापर करावा लागु नये याबाबत उपाययोजना करण्यात आल्या होत्या.या पार्ष्वभुमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक बलकवडे यांनी स्वतः दोन दिवस या या परीसराची पाहणी केली होती.रामटेक व या परीसरांत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यांत आला होता. स्वतःपोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात दोनशेवर पोलीसांनी रामटेक   शहरांत दिनांक 12 फेबु्रवारी  2018 रोजी पथसंचलन केले व दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम केली होती.
अतिरिक्त पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी,सुमारे 20 पोलीस निरीक्षक,पोलीस  उपनिरीक्षक व सुमारे सातशे पोलीस कर्मचारी या  बंदोबस्तासाठी सज्ज करण्यात आले होते हजारो  भावीकांनी याठीकाणी दर्शनाचा  लाभ घेतला.कुठलीही  अनुचित घटना घडू नये यासाठी एवढा मोठा  बंदोबस्त लावण्यात आला होता.सर्वच भावीकांनी  आपल्या प्रथे परंपरेनुसार दर्षनाला जावे त्यासाठी त्यांना कुठलीही मनाई करण्यांत आली नाही.असे या  बंदोबस्ताच्या प्रभारी अति.पोलीस अधिक्षक मोनीका राउत यांनी यावेळी सांगीतले.रामटेकचे उपविभागीय दंडाधिकारी राम जोषी,तालुका दंडाधिकारी धर्मेश  फुसाटे,नायब तहसिलदार नितीन पाटील,चौबे आदी  अधिकारीही यावेळी या परीसरांत हजर होते. 
महाशिवरात्रीच्या या पर्वावर समोरच असलेल्या बोधिसत्व नागार्जुन महाविहार परीसरांत बौद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते.भन्ते नागार्जुन सुरई ससाई व त्यांचे सुमारे तीन  हजारावर अनुयायी यावेळी उपस्थित होते.या
कार्यक्रमाच्या नंतर अनेकांनी मोठया संख्येत नागार्जुन पर्वतावर जावून दर्शनाचा  लाभ घेतला.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.