राजेश शाहू यांचे उपोशण सुरूच
रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक नगरपालीकेतील नगरसेवक रामानंद अडामे व बाजार करवसुली ठेकेदार राजेष शाहू यांचेतील गेल्या अनेक महीन्यांपासुन सुरू असलेला वाद आणखी चिघळला असून आज दिनांक 12 फेबु्रवारी 2018 पासुन हे दोघेही रामटेक नगरपालीकेच्या आवारांत नगरपालीका प्रशासनाचे विरोधात त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने एकमेकांविरूद्ध कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोशणाला बसले होते.
मात्र रात्री 10 च्या सुमारास रामटेक नगरपालीकेचे अग्निशमन अधिकारी अमित भा कावळे यांच्या दिनांक 12 फेबु्रवारी 2018 रोजी दिलेल्या तक्रारीवरून बाजार कर ठेकेदार राजेष शाहू यांचेवर भादवीच्या 406 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यांत आला.अडामे यांची मागणी पुर्ण झाल्याने रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांनी नगराध्यक्ष दिलीप देषमुख यांचे हस्ते उपोशणाची सांगता केली यावेळी सभापती संजय बिसमोगरे,भाजपाचे नागपुर जिल्हा उपाध्यक्षद्वय संजय मुलमुले,राजेष ठाकरे,नगरसेवक विवे तोतडे,आलोक मानकर,प्रविण मानापुरे व नगरसेविका वनमाला चौरागडे आदी उपस्थित होते. मात्र राजेष शाहू यांनी यांनी त्यांचे उपोशण सुरूच ठेवले असून आपल्यावर जाणीवपुर्वक,सुडबुद्धीने व राजकीय दबावाखली उपरोक्त गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचा आरोप केला व जोपर्यंत आपल्या मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोशण करणार असल्याचे दिनांक 13/02/2018 रोजी सायंकाळी बोलाविलेल्या पत्र परिषदेत सांगीतले. एकाचवेळी दोघांनीही आमरण उपोशणाला बसण्याचा व तेही एकमेकांचे विरोधात असा रामटेक नगरपालीकेच्या ईतिहासातील हा पहिलाच प्रसंग ठरला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रामटेक नगरपालीकेचे नगरसेवक रामानंद अडामे यांनी बाजार करवसुली ठेकेदार राजेश शाहू यांच्या अनेकदा रामटेक नगरपालीका प्रशासनाकडे तक्रारी केल्या.बाजारकराच्या रकमांची कीती वसुली करावी याबाबत नियमांना डावलून ठेकेदार मनमर्जी वसुली करीत असल्याने व अनेकांना
पैसे घेवून पावती न देणे,पैसे जास्तीचे घेणे व पावती कमी रकमेची देणे असे प्रकार घडत असल्याने त्यांचेवर कारवाई करावी असा आषय त्यातून व्यक्त करण्यांत आला होता.रामानंद अडामे यांनी गेल्या कार्तीक पोर्णिमेच्या यात्रेच्या वेळी राजेश शाहू यांची माणसे बाजार कर वसुली करतांना त्यांना हटकले असता त्यांनी अडामे यांना मारहाण केली होती. दोन्ही बाजुंनी पोलीसांत तक्रारी झाल्या व दोन्ही बाजुंवर पोलीसांनी विविध कलमाखांली गुन्हे नोंदविले होते. यानंतर अडामे यांच्या सततच्या तगाद्यामुळे नगरपालीकेने ठेकेदार शाहू यांचा बाजार कर वसुलीचा कंत्राट सर्वसामान्य सभेत रद्द करण्याचा ठराव केला होता मात्र राजेश शाहू यांनी त्यास जिल्हाधिकारी नागपुर यांचेकडे कलम 308 अन्वये आव्हान दिले व आठ दिवसांतच जिल्हाधिकारी यांनी न.प.रामटेकचा तो ठराव रद्द करीत ठेकेदार शाहू यांना दिलासा दिला होता.सदर कंत्राट हे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीसाठी देण्यात आले असून सध्या राजेश शाहू हेच करवसुली करीत आहेत.यादरम्यान रामटेक नगरपालीकेच्या स्थायी समीतीने शाहू प्रकरणांत दिलेल्या आदेषाविरूद्ध अपील करावे असे ठरले व त्यासाठी नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांना सर्वाधिकार देण्यांत आले मात्र त्यांनी याबाबत कुठलीच कार्यवाही केली नसल्याचा आरोप अडामे यांनी यापुर्वीच केला होता. सदर प्रकरणांत राजेश शाहू यांचेवर पोलीसांत फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे नाव काळया यादीत टाकावे अशी अडामे यांची मागणी होती व या मागणीची पुर्तता झाल्याने त्यांनी आपले आमरण उपोशण रात्री उशीरा सोडले.
आपल्या विरूद्ध कुणाचीही तक्रार नसतांना केवळ सुडबुद्धीने रामानंद अडामे हे एकमेव नगरसेवक आपली वारंवार तक्रार करीत आहेत.नगरपालीकेचेबाजार कर वसुलीचे कंत्राट आपण सर्वोच्च बोली लावल्याने आपल्याला मीळाले आहे व त्याबाबतचा करारनामा नगरपालीकेसोबत करण्यांत आला आहे.या करारनाम्यात
नमूद अटी व शर्तीच्या आधिन राहुनच आपण करवसुलीचे काम करीत आहोत मात्र वेळोवेळी अडामे हे आपल्याला त्रास देतात असा आरोप राजेश शाहू यांनी केला आहे.रामटेक नगरपालीकेचे सदस्य असतांना त्यांनी आपल्या घराचे बांधकाम शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून नगरपालीकेची कुठलीही परवानगी न घेता
सुरू केले आहे त्यामुळे त्यांचेवर पोलीसांत गुन्हा नोंदवावा व लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांचेवर कार्यवाही करावी असा अर्ज शाहु यांनी नगरपालीका प्रशासनाकडे केला आहे.
मात्र न.प.प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीच कार्यवाही न केल्याने आपणही दिनांक 12 फेबु्रवारी 2018 पासून रामटेक नगरपालीका कार्यालयाच्या आवारांत आमरण उपोशणाला प्रारंभ केल्याचे राजेष शाहू यांनी यावेळी सांगीतले.मात्र करारनाम्यात कुठल्याही प्रकारची पोलीस कारवाई नगरपालीका प्रस्तावीत करू शकेल अशी अट नसतांना केवळ रामानंद अडामे यांच्या राजकीय दबावामुळे आपल्याविरूद्ध नगरपालीकेचे कर्मचारी अमित कावळे यांनी पोलीसांत तक्रार करणे व पोलीसांनी 406 अन्वये गुन्हा दाखल करणे हे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखे असल्याचे शाहु यांनी यावेळी बातमीदारांशी बोलतांना स्पष्ट केलेल्या करारनाम्याप्रमाणे मी ठेकेदार म्हणून कुठल्याही अटीचा भंग केला तर माझे कंत्राट रद्द करण्याचा अधिकार नगरपालीकेला आहे.त्यांनी माझे सदरचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केलेली आहे.या कारवाईस नियमाप्रमाणे आपण जिल्हाधिकारी,नागपुर यांचेकडे आव्हान दिले व त्यांनी नगरपालीकेचा तो ठराव रद्द केला आहे व कंत्राट पुर्ववत ठेवण्याचे आदेश नगरपालीका प्रशासनाला दिले आहेत.माझी पोलीसांत तक्रार करण्याचा नगरपालीका प्रशासनाला मुळात अधिकारच नसल्याचा दावा शाहु यांनी बातमीदारांशी बोलतांना केला.
मुख्याधिकारी काय म्हणतात...
उपरोक्त प्रकरणी रामटेक नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगीतले की नगरपालीकेने दोघांच्याही तक्रारींवर योग्य ती कार्यवाही केली आहे. शाहू यांचेविरोधात रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यांत आली असून याबाबतची सर्व कागदपत्रे देवून त्याअनुशंगाने फौजदारी गुन्हा होत असल्यास तसे करावे असे
नमूद करण्यांत आले होते. त्याबाबत पोलीसांनी कारवाई करावयाची होती ती पोलीसांनी केली आहे. रामानंद अडामे यांनी जे बांधकाम सुरू केले आहे त्याची चौकशी करण्यात आली असून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे व नगरपालीकेची कुठलीही बांधकामासाठी परवानगी घेतलेली नसल्याने नियमानुसार
त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. व याबाबत आवश्यक व कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाणार असल्याचे सांगीतले.