সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 14, 2018

राष्ट्रसंतांचे विचार स्मरणात ठेवून त्यावर चालण्याचा संकल्प करा - भांगडिया

नागभीड/प्रतिनिधी:

नागभीड तालुक्यातील सोनापूर येथे महाशिवरात्री निमित्य गोपाल काला आयोजित कार्यक्रमाला आदरणीय आमदार कीर्तिकुमार(बंटीभाऊ) भांगडीया यांनी उपस्थिती दर्शविली.
महाशिवरात्री च्या शुभ पर्वावर कार्यक्रमा प्रसंगी गॅस वितरण करण्यात आले.
दरवर्षी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी दिवाळीप्रमाणे साजरी करतो, महाराजांचे विचार ऐकतो, परंतु महाराजांचे विचारावर आपण चालन्याचा प्रयत्न करीत नाही. तीन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर आपण महाराजांचे विचार विसरून जातो. महाराजांना हे नको होते. त्यांना वर्षभर प्रत्येकाने त्यांचे विचार सदैव स्वरणात ठेऊन त्यांच्या  विचारावर चालायला हवे होते, असे विचार चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया यांनी व्यक्त केले. ते आज सोनापूर ता.नागभीड येथे आयोजित महाशिवरात्री निमित्य आयोजित कार्यक्रमाला संबोधित करीत होते. याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर,गीताताई बोरकर, मारोती झोडे,जगदीश शडमाके,राजू रामटेके प्रकाश कुंभरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया पुढे म्हणाले कि, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या  विचारावर आपण कितपत खरे उतरलो आहे याचा विचार आपण कधीही करत नाही. महाराजांचे विचार सर्वांनी पुढे नेले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात रुजविले पाहिजे. त्यांचे विचारावर आपण मार्गक्रमण केल्यास आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो इतकी शक्ती ग्रामगीतेत आहे. परंतु आपण तीन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर जैसे थे होऊन जातो. राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या या जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केली परंतु जोपर्यंत येथील आई भगिनिंचे, सर्वांचे सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत १०० टक्के दारूबंदी यशस्वी होणार नाही. तत्पूर्वी आमदार बंटीभाऊनी येथील ग्रामस्थांच्या मागण्या एकून घेतल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.