সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 25, 2018

नागपूर जिल्ह्यात 217 कोटींची कामे सुरु

नागपूर - केंद्र शासनाच्या दिन दयाळ उपाधाय ग्राम ज्योती योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात 217 कोटींची कामे सुरु आहेत, त्यात प्रामुख्याने 33/11 केव्ही क्षमतेची तब्बल 18 वीज उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी बहुतांश उपकेंद्राची कामे पुर्णत्वाकडे आहे, ही सर्व उपकेंद्र डिसेंबर 2019 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या सुचना महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी दिल्या आहेत.

सद्यस्थितीत असलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सशक्तिकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांमधून नागपूर जिल्ह्यातील वीज यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकारामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून 1150.50 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून त्यापैकी दिन दयाळ उपाधाय ग्राम ज्योती योजनेंतर्गत 217 कोटींची कामे पुर्णत्वाकडे आहे.

जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील वीज यंत्रणेसाठी दिन दयाळ उपाधाय ग्राम ज्योती योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी 217 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांचे कंत्राट ऑन लाईन निविदा प्रक्रिये मार्फ़त मेसर्स भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडला देण्यात आले आहे. दिन दयाळ उपाधाय ग्राम ज्योती योजनेंतर्गत जिल्ह्यात 33/11 केव्ही क्षमतेची तब्बल 18 वीज उपकेंद्र उभारायची आहेत. त्या पैकी आलागोंदी येथील 33/11केव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण करून हे उपकेंद्र कार्यान्वितही करण्यात आलेले आहे, 33/11 केव्ही क्षमतेची कान्होलीबारा व वागधरा येथीलउपकेंद्रांची कामे पुर्ण झाली असून ही उपकेंद्रे ह्या महिन्यात (फेब्रुवारी २०१८) कार्यान्वित करण्यात येणार आहेत, याशिवाय तरोडी उपकेंद्राचे काम पूर्ण झालेले आहे. झिलपा, नांदा व लावा येथील उपकेंद्रांतील विद्युत व स्थापथ्यची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर उर्वरित उपकेंद्राचे कामप्रगतीपथावर आहे.

या नवीन उपकेंद्रांमुळे सद्या असलेल्या उपकेंद्रासोबतच 33 केव्ही व 11 केव्ही वाहिन्यांवरील वीज भार कमी होण्यासोबतच वाहीनीचीलांबी देखील कमी होणार असल्याने या उपकेंद्रावरील विद्युत उपकरणे खराब होण्याच्या प्रकाराला आळा बसेल, कृषीपंप जळण्याचे प्रकार बंद होतील शिवाय या उपकेंद्रातून निघणा-या वाहीनीवरील घरघुती व शेतकरी ग्राहकांना अखंडित, उच्च प्रतीचा आणि योग्य दाबाचा वीज पुरवठामिळण्यासोबतच वितरण रोहीत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकारही कमी होणार आहेत. ही सर्व उपकेंद्र डिसेंबर 2019 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या सुचना मुख्य अभियंता रफ़ीक शेख यांनी संबंधित कंत्राटदाराला दिल्या आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.