चंद्रपूर - आज दिनांक २० फेब्रुवारी २०१८ रोजी स्थानिक ज्युबिली हाय स्कुल येथे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक तथा विद्यमान शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमे अंतर्गत शाळेतील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली तसेच या शाळेचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री रामटेके सर, प्रमुख पाहुणे श्री. रवींद्र काळबांधे सर तसेच सत्कारमूर्ती शाळेतील माजी शिक्षक सौ. माहुरे मॅडम, सौ. मालवी, सौ रामटेके मॅडम, मसादे मॅडम, श्री देशमुख सर, श्री. बंडीवार सर लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाने झाली. यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी श्री जयंत मामीडवार, डॉ. साहस बेंडले, प्रा. डॉ. सचिन वझलवार यांनी कार्यक्रमाची माहिती व मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात श्री. रामटेके सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व स्वच्छतेचे धडे रुजवले. कार्यक्रमाची सांगता श्री. आशिष मंथनवार व श्री भैसारे सर यांच्या समारोपीय भाषणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रशांत तेलंग यांनी केले. या कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या दर्शनी भागामध्ये स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला. या अभियानात चंद्रपूर महानगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांनी देखील सहभाग घेतला.