সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 05, 2018

त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे दूर करा

  •  सभापती संजय बालपांडे
  • अग्निशमन व विद्युत समितीची आढावा बैठक

नागपूर,ता.५ : त्रिमूर्ती नगर येथे निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन स्थानकाच्या बांधकामात विलंब होत आहे. बांधकामात येणारे अडथळे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले. सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपसभापती प्रमोद चिखले, विरेंद्र (विक्की) कुकरेजा, लहुकुमार बेहते, राजकुमार साहू,हरीश ग्वालबंशी, सदस्या वनिता दांडेकर, ममता सहारे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके,कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, विद्युत विभागाचे सलीम इकबाल, ए.एस.मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.

त्रिमूर्ती नगर येथील स्थानकाच्या बांधकामाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ट्रान्सफार्मर आहे. त्यामुळे कामात सातत्याने अडथळा येत आहे. त्यासंदर्भात वीज कंपनीशी चर्चा केली असता त्यांनी आठ लाख रूपये भरणा करण्यास सांगितल्याची माहिती कार्यकारी अभियंता (प्रकल्प)नरेश बोरकर यांनी दिली. यावर, आठ लाखाचा भरणा वीज कंपनीकडे तातडीने करण्याचे निर्देश सभापती बालपांडे यांनी दिले. त्याचप्रमाणे लकडगंज, वाठोडा येथील स्थानक बांधकामाचा आढावा सभापतींनी घेतला. वाठोडा येथे सुरू असलेल्या स्थानकाचे नकाशे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी समितीपुढे सादर केले. वाठोडा येथील बांधकामासाठी नगररचना विभाग, अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत अग्निशमन शुल्क आकारणी व्यतिरिक्त इतर कार्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वाढीसंदर्भात समितीपुढे विभागाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर चर्चा करून त्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटर व इतर योजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सोलर वॉटर हिटर योजनेकरिता केंद्र सरकारने ५० टक्के अनुदान दिले होते. परंतु नागरिकांचा प्रतिसाद अल्प होता. आतापर्यंत ३४५० पैकी २७५५ नागरिकांना सोलर वॉटर हिटर वाटप करण्यात आले असून उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिले. बैठकीला सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.