चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारूबंदी असतांना देखील विविध छुप्या मार्गाने दारूची तस्करी केल्या जात आहे,अश्याच पद्धतीने दारू आणणाऱ्या एका स्वीफ्ट डिझायर गाडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे.
नागपूरहून एम.एच.०२ बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ब्रॅण्डेड कंपनीच्या विदेशी दारू चंद्रपुरात आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैरागडे यांच्या नेतृत्त्वातील चमूने जगन्नाथबाबा नगर परिसरात नाकाबंदी करून नागपूरहून येणाऱ्या एम.एच.०२.बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता तपासणीत वाहनात अॅन्टीक्युटी, मॅकडॉल, पोर्ट वाईन या ब्रॅण्डेड कंपनीसह व अन्य कंपन्यांचा दारूसाठा आढळून आला.
यात १७ बॉक्समध्ये १२० बॉटल्स होत्या.पोलिसांनी दारूसाठा आणि चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन दोघे फरार आहेत.