विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक
रामटेक/प्रतिनिधी:
रामटेक नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सत्ता आहे.एकूण सतरा नगरसेवकांपैकी तेरा नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले आहेत.वर्षभराचा कालावधी यांनी पूर्ण केला असल्याने याठिकाणी विविध विषय समित्यांची नव्याने रचना करण्यात आली व सभापतींची निवडणूक २० फेबु्रवारी रोजी संपन्न झाली. मात्र, या निवडणूकीनंतर पाणीपुरवठा सभापती म्हणून निवड करण्यात आलेल्या रत्नमाला अहिरकर यांनी सभापतीपदांचा राजीनामा लगेच अध्यक्ष व पिठासीन अधिकारी व तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना सादर केल्याने रामटेकच्या नगरपालिकेत (ना) राजीनामा नाटय रंगल्याच्या चर्चेला शहरात उधान आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामटेकच्या नगरपालिकेत थ ेट जनतेतून भाजपाचे दिलीप देशमुख हे नगराध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. मागील वर्षी उपाध्यक्ष पदावर कविता मुलमुले यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सभापतीपदांच्या निवडणूकीत बांधकाम सभापती या पदावर संजय बिसमोगरे, पाणीपुरवठा सभापती अनिता टेटवार यांची व शिक्षण सभापती पदावर चित्रा धुरई यांची निवड करण्यात आली होती. सभापतींचा कार्यकाळ एक वर्षांचा असल्याने पुढल्या वर्षी आपला नंबर लागेल, या आशेने सर्वजन शांत राहीले. मात्र, यावेळी आपल्या मनासारखे सभापती पद न मिळाल्याने रत्नमाला अहिरकर यांनी थेट आपला सभापतीपदाचा राजीनामाच देऊन आपली नाराजी व्यक्त केली.
बांधकाम सभापती या पदावरलता कामळे यांची तर शिक्षण सभापती म्हणून उज्ज्वला धमगाये यांची निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ जरी अडीच वर्षांचा असला, तरी तो वर्षभराचाच असेल, असे भाजपा गटातील नगरसेवकांचे आपसांत ठरल े होते. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्षा कविता मुलमुले यांचे राजीनामापत्र तेही स्टॅम्पप ेपरवर तेंव्हाच लिहून घेण्यात आले होते.मात्र, वर्षभराचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला व नियमाप्रमाणे आपला कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याने आपण राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमीका घेतली अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाराज नगरसेवकांनी थेट जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांची भेट घेतली. मात्र यात काय तोडगा निघाला ते स्पष्ट झाले नाही. पालकमंत्री बावनकुळे यांनी १९ फ ेबु्रवारी रोजी रामटेक भेटीत यावर पडदा टाकल्याचे समजते.या विशयावर वादंग सुरू असतानाच रत्नमाला अहिरकर यांनी राजीनामा दिल्याने नगरपालिकेत सत्तापक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचा संकेत सर्वत्र पोहोचला. स्वत:ला रामटेक नगरपालिकेचे रिमोट कंट्रोल माननाºयांच्या डोळयांत अहिरकर यांच्या राजीनाम्याने जळजळीत अंजनच घातल्याची चर्चा यानिमित्ताने क ेली जात आहे.