
चंद्रपूर/प्रतिनिधी:
शोरूम मधून नवी कोरी गाडी घेऊन जात असलेल्या एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली,त्यात भरधाव ट्रक हा जवळच असेलल्या भिवकुंड नाल्यात पलटला.हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान चंद्रपूर कडून बल्लारशाह मार्गावरील निर्मल धाब्याजावळील भिवकुंड नाल्यासमोर घडली.

या अपघातात दुचाकीस्वार राजेश वनकर व उदय कुंभारे रा.चंद्रपूर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून ट्रक चाल मुरली व त्याचा सोबती हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना बल्लारशाह येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर महामर्गावर चांगलीच गर्दी बघायला मिळाली.तर ट्रकमध्ये अंडे व कांदे असल्याने संपूर्ण अंडे फुटून कांदे सर्वत्र पसरल्या गेले