সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 23, 2018

चंद्रपूरच्या वनौषधी व खाद्यान्नाला पतंजलीची बाजारपेठ

Image may contain: 1 person, smiling, standing
त्रिदिवसीय योग शिबिरात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला योग 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
                            चंद्रपूरच्या वनौषधी व खाद्यान्नाला पतंजलीची बाजारपेठ देणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.  चंद्रपुरात अतिशय उत्तम तांदळाचे पीक घेतल्या जाते. त्यामुळे हा दर्जा बघता  पतंजलीच्या विविध विक्री केंद्रांतून चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार तांदूळ विकल्या जाईल. तसेच पतंजलीला आवश्यक विविध वनौषधींचे शेतकऱ्यांनी उत्पादन घेतल्या चंद्रपूर जिल्हा व परिसरातील वनौषधी व खाद्यान्नाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन योगगुरू रामदेवबाबा यांनी चंद्रपूर येथे दिले. 
               शेतकरी मेळाव्यापूर्वी रामदेवबाबा यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चा झाली. पुढील महिन्यात २ मार्च रोजी यासंदर्भात पंतजलीच्या मुख्यालयात चर्चा होणार आहे. आपल्या पुढील तीन दिवसांच्या वास्तव्यात हे खाद्यान्न व वनौषधींची तपासणीही बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील चमू करणार आहे. या बैठकीमुळे शाश्वत बाजारपेठेच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
                            या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, उपवनसंक्षक गजेंद्र हिरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एस. किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांची उपस्थिती. मूल येथील अजय गोगुलवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. 
                                  बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी वनपरिसरात व शेतीमध्ये होणाऱ्या पिकांची व वनऔषधीची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी सेंद्रीय पद्धतीने धानाचे उत्पादन घेतात. सेंद्रीय तांदूळ विषमुक्त तांदूळ म्हणून प्रयोगशाळेने मान्यता दिली आहे. त्यामुळे या तांदळाची विक्री पतजंलीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली होती . पतंजलीद्वारे किमान आधारभूत किंमत ठरवावी. शेतकऱ्यांना सेंद्रीय धानाचे उत्पादन घेण्याबाबत सांगण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी वनविभागाच्या अधिका-यांनी अर्जूनसाल, मोहाफूल, कोरफळ (अॅलोवेरा), सेंद्रीय हळद, मोहा सरबत, मोहा जाम, सफेद मुसळी आदी वनऔषधीपासून तयार केलेल्या उत्पन्नाबाबत माहिती दिली. यावेळी पूजेच्या साहित्यामध्ये अगरबत्तीसाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील बांबूला प्राधान्य देण्याचा प्रस्तावही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. रामदेवबाबा यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले. कोरफळ व मध याबाबतच्या कराराला तत्काळ मूर्तरूप दिले जाईल, असे आश्वासन दिले. तथापि, पुढील दोन दिवसांत रामदेवबाबा यांच्यासोबत आलेल्या तज्ज्ञांच्या चमू व स्वत: रामदेव महाराज सर्व वनऔषधी व वनापासून बनविलेल्या खाद्यांची स्वत: तपासणी करणार आहेत. त्यांनी यावेळी मध खरेदीसाठी आपण आजच तयार असून याबाबतची यंत्रणा जिल्ह्यात उभी करण्याची सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या बैठकीमध्ये आलेल्या विविध प्रस्तावांवर पुढील २ मार्च रोजी पतंजलीच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत.
'विकते ते पिकवायला शिका...
चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. त्यामुळे जे विकल्या जाते ते पिकवायला सुरूवात करून स्वत:ला व देशाला बळकट करा, असे आवाहन योगगुरू बाबा रामदेव महाराज यांनी मंगळवारी येथे केले. चंद्रपूर तालुक्यातील मूल येथे मंगळवारपासून आयोजित तीन दिवसीय बाबा रामदेव महाराज यांच्या योगाभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी दुपारच्या सत्रात आयोजीत शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करीत होते. या मेळाव्याला चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती. यावेळी रामदेव महाराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
Image may contain: 1 person, crowd, beard and outdoor
(छायाचित्र:गोलू बाराहाते)


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.