সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 11, 2018

२३ दिवसानंतरही उपोषण सुरूच

कोरपना/प्रतिनिधी: 
अंबुजा सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र आश्वासनाप्रमाणे स्थायी नोकरी दिली नाही. नोकरी व वाढीव रक्कम तत्काळ देण्याची यावी, या मागणीसाठी कोरपना तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या २३ व्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तिघांनाही  जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यास सांगितले. मात्र सलाईन लावण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दर्शविला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत सलाईन लावणार नाही आणि उपोषणही थांबविणार नाही, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप उपोषणाकडे शासनाने लक्ष दिलेले नाही.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.