चंद्रपूर/प्रतिनिधी:
तक्रारदाराच्या वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे नावाने फेरफार करण्याकरिताअजयपूर,जिल्हा चंद्रपूर येथील लाचखोर तलाठी धर्मेंद्र नानाजी खोब्रागडे याला तब्बल ७ वर्षानंतर जिल्हा न्यायाधीश -३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी सोमवारी 20.02.2018 कलम ७ प्रमाणे ३ वर्षे कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

०१.११.२०११ रोजी तक्रारदाराच्या वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे नावाने फेरफार करण्याकरिता लाचखोर तलाठी धर्मेंद्र नानाजी खोब्रागडे साजा क्रमांक १५ अजयपूर,जिल्हा.चंद्रपूर यांनी ताक्रदारांना १०००० रुपयाची मागणी केली होती.या बाबदची तक्रारदाराने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतीबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत दिनांक १/११/२०११ रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक जोत लाचलुचपत प्रतीबंधक विभाग चंद्रपूर ,यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत १०००० लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला रंगेहात अटक केली.व रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला,व खोब्रागडे यांचेवर चंद्रपूर येथेईल विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अभियोक्ता श्री.असिफ शेख यांनी अतिशय मेहनतीने अभ्यासपूर्वक यौक्तिवाद करून लाचखोरांना चपराक बसविण्यासाठी अत्यंत मोलाचे काम केलेले असून आपली बाजू भक्कमपने मांडली.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाचखोर अधिकारी कर्मचार्यांना चांगलाच संदेश मिळाला आहे,अश्या शिक्षेमुळे भ्रस्ताचारास आळा बसेल असे अशी चर्चा नागरिकत सुरु आहे.
सदर कारवाईचे कामकाज पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व अरुण हटवार यांनी कामकाज पहिले .