राजकारणात शिक्षणाची गरज नसेत असे आपण बऱ्याच वेळेस ऐकले असाल,अथवा स्वताच्या डोळ्याने बघितले देखिल असाल.तल्लख बुद्धी आणि योग्य कौशल्याचा वापर करून सभोवतालच्या जगात जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बरेच बदल हे राजकारणात राहूनच करायला मिळतात.मात्र हे फक्त आणि फक्त राजकारणाच्याच बाबतीत घडत...
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ही म्हण जरी शंभर टक्के खरी असली तरी या बाबतित ती उलटी आहे इथे "बुद्धीपेक्षा शक्ती श्रेष्ठ का ? असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे.
सध्या १२ वी वर्गाची बोर्डाची परीक्षा सुरु आहे. हि परीक्षा जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.हीच परीक्षा देण्यासाठी घुग्गुस नकोडा क्षेत्रातले जिल्हा परिषद सदस्य तसेच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे हे देखील १२ वीच्या परीक्षेला बसले आहेत .मात्र इंग्रजीच्या पहिल्या पेपरच्यावेळी ब्रिजभूषण पाझारे यांच्या फेसबुक आय.डी वरून एक सीट नंबर लिहिलेला फोटो शेअर होतो. आणि हा फोटो
चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापळतो. परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतांना देखील हे सभापती महोदय केंद्रात पेपर सुरु असतांना फोटो सेशन करत असल्याने समाज माध्यमांवर विविध,चर्चा रंगू लागल्या आहेत,त्यामुळे सर्वांना नियम सारखे असतांना देखील भाजपच्या पदाधीकार्यांना मोकळीक दिली आहे का ?असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होतो.याची विचारणा झाली असता हा फोटो पेपर झाल्यावरचा आहे असे सांगण्यात आले.त्यामुळे याप्रकरणाची चौकशी खरच होणार का ? असा यक्ष प्रश्न सर्वांसोमोर ठागला आहे.
असो.
शिक्षणाला बंधन नसते,मग तो कोणी कितीही म्हातारा असो ,शिकण्याची जिद्द असेल तर त्याला कोणी थांबवू
शकत नाही. पाझारेंच्या बाबतीत देखील असेच झाले म्हणावे लागेल .पाझारेंचा फोटो समाज माध्यमात व्हायरल होताच यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यांच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होऊ लागला,कोणी
म्हणत अस वागणं बरे नव्हे, तर कोणी म्हणत कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळाली कि अश्या चुका होतातच,
असो हा संपूर्ण वाद झाल्यावर मात्र पाझारेंच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या फेसबुक वरून सदर पोस्टही
डीलीट केल्याचे निदर्शनात आले ,पाझारें सध्या भाजपमध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत.तसेच ते सोशल
मीडियावरही नेहमीच ऍक्टिव्हच असतात,मग ते त्यांनी केलेले उद्घाटन कार्यक्रम असो वा कोणत्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली असो, किव्हा मग थोर महामानवांच्या जयंती कार्यक्रम असो हे नेहमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष किव्हा अप्रत्यक्षपणे जनतेत असतातच,तशी हे त्यांच्या वरिष्ठांची कॉपी करतात अशी चर्चा नेहमीच सभोवतालच्या वातावरणात राहिलेली आहे.
पाझेरेंच्या या प्रयत्नाचा वाद तेव्हा नसता रंगला जेव्हा त्यांनी सीट नंबर, परीक्षा प्रवेशपत्र,आणि पास झालेल्या निकालाची मार्कशीट माध्यमावर टाकली असती,असे केले असते तर त्याच्यावर "हार्दिक शुभेच्छानचा"वर्षावच झाला असता,मात्र या प्रकरणातून एकच संदेश प्राप्त होतो "अस वागणं बरे नव्हे"