সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 18, 2018

विदर्भासाठी महावितरणने केली 1.65 लाख मीटर्सची तरतूद

  • मीटरबाबत विलंबासाठी थेट तक्रारीची सुविधा
  • विदर्भातील प्रत्येक कार्यालयात मीटरचा पुरेसा साठा
  • इआरपी मुळे साधनसामग्रीची उपलब्धता आणि पुरवठय़ाची प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शी
  • कार्यालयानुसार मीटरच्या उपलब्धतेती माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
  • स्वयंघोषित एजंटांना ग्राहकांनी थारा देऊ नये
  • उपलब्ध मीटर वापरात येताच परत नव्याने मीटर उपलब्धतेचे नियोजन
  •  वीजग्राहकांची दिशाभुल केल्यास संबंधित कर्मचा-यावर कठोर कारवाई
नागपूर, दि. 18 फ़ेब्रुवारी 2018:-
नवीन वीज जोडणीसाठी किंवा नादुरुस्त झालेले वीजमीटर बदलून घेण्यासाठी मीटरच्या उपलब्धतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केल्या जात असताना महावितरण कंपनीकडून संपूर्ण विदर्भासाठी तब्बल 1 लाख 65 हजार नवे मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागपूर परिमंडलात सद्य:स्थितीत 64 हजारांहून अधिक मीटर उपलब्ध आहेत. ही संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याने वीज मीटर उपलब्ध नसल्याच्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये. त्याचप्रमाणे नवी जोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्याबाबत विलंब होत असल्यास थेट वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणकडून विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ या अकराही जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांना मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय उपलब्ध असलेली मीटर उपयोगात येताच परत नव्याने मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. तसेच, नादुरुस्त वीजमीटरही तातडीने बदलण्यात यावेत, असे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत. या कामात विलंब झाल्यास किंवा वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विदर्भातील अकराही जिल्ह्यात 17 फेब्रुवारीपर्यंत सिंगल फेजचे तब्बल 1 लाख 42 हजार वीजमीटर उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्य़ात सिंगल फेजचे 35 हजार 500, वर्धा जिह्यात 19 हजार 400, चंद्रपूरमध्ये 6 हजार 500, गडचिरोलीसाठी 12 हजार 800, भंडारासाठी 7 हजार 300 तर गोंदीया जिल्ह्यासाठी 11 हजार 300 नवीन वीज मीटर उपलब्ध आहेत. याशिवाय अकोला जिह्यात 12 हजार 700, बुलढाणा जिल्ह्यासाठी 9 हजार, वाशिमकरिता 11 हजार 400, अमरावती जिल्ह्यासाठी 10 हजार 400 तर यवतमाळ जिल्ह्यात 6 हजार 200 अशी विदर्भात एकूण 1 लाख 42 हजार 800 सिंगल फ़ेजवी मीटर्स उपलब्ध आहे. याशिवाय थ्री फ़ेज सीटी ऑपरेटेड आणि टीओडी मिटर्स अशी एकूण 1 लाख 65 हजार मिटर्स उपलब्ध आहेत.
महावितरणने साधनसामग्री व्यवस्थापनाची प्रक्रिया ईआरपीच्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ऑनलाइन केलेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता आणि पुरवठय़ाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान आणि पारदर्शक झालेली आहे. आवश्यकतापेक्षा अधिक मीटरची उपलब्धता असल्याने याबाबत कोणत्याही स्वयंघोषित एजंटांना ग्राहकांनी थारा देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
विलंब झाल्यास येथे तक्रार करा
नवीन वीजजोडणीसाठी किंवा नादुरुस्त मीटर बदलून मिळण्यास विलंब होत असल्यास महावितरणच्या स्थानिक वरिष्ठ कार्यालयात ग्राहकांनी ताबडतोब संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मुंबई येथील विशेष मदत कक्षातील ०२२-२६४७८९८९ किंवा ०२२-२६४७८८९९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. चोवीस तास सुरू असलेल्या १९१२ किंवा १८००२००३४३५ तसेच १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.