সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 15, 2018

सुशिक्षित बेरोजगारांचा भव्य मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनि विविध मागण्यांना घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो सुशिक्षित बेरोजगार सामील झाले होते. हा मोर्चा शासकीय ग्रंथालय ज्युबली हायस्कुल येथून गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे होत जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.
सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे  पोलीस शिपाई भरतीमध्ये रिटायरमेंट कोटा १००% तसेच फ्रेश कोटा १००% भरण्यात यावा. २०१८ ची पोलीस शिपाई भरती मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार पहिल्या टप्प्यातील १२ हजार जागांची भरती घेण्यात यावी.चंद्रपूर जिल्ह्यात किमान २५० जागांची भरती घेण्यात यावी. कंत्राटी पद्धतीने शासकीय जागा भरण्यावर बंदी घालण्यात यावी. MSF ( महाराष्ट्र सुरक्षा बल ) कंत्राटी पद्धत बंद करून शासकीय करण्यात यावे.
राज्यसेवा परीक्षांच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी.
MPSC ची संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे PSI STI ASO ची स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी. राज्यशासनाच्या व जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्या.राज्यशासनाच्या विदर्भातील अनुशेष या विषयावरील ना. मुनगंटीवार उपसमितीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा. सरळसेवा भरती नियमितपणे घेण्यात यावी. परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे.सर्व परीक्षांचे केंद्र जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात यावे.MPSC पदांची प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
या सह इतर मागण्यांना घेऊन आज सुशिक्षित बेरोजगारांनि जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो सुशिक्षित बेरोजगार सामील झाले होते. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.