आवाळपुर/प्रातिनिधी :-
शालेय जीवना मध्ये वार्षिक उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कारण त्यामुळे विद्यार्थी मध्ये आत्मविश्वास, शाळे च्या प्रगती मध्ये सहयोग देणे आणि पलका मध्ये संपर्क निर्माण होते. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी मध्ये प्रथिभा, प्रदर्शन, आत्मविश्वास, शाळे विषय आवड आणि विद्यार्थीच गुन विकसित होते.
याच उदान्त हेतूने संकल्प इंग्लिश मिडीयम स्कुल भोयगाव येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे स प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती, काळे सहायक प्राथमिक शिक्षणाधिकारी चंद्रपूर, सूर्यभान पोतराजे सरपंच भोयगाव, अनंत दरवेकर उपस्थित होते.यावेळी चिमुकल्यानी आपले नृत्य सादर केले. लहानांपासून तर मोठ्या विदयार्थी पर्यत उत्साहाने आपले नृत्य सादरी करीत होते.नृत्या चा माध्यमातुन समाज जागृतीचा संदेश देखील देत होते. पहिल्या व दुसऱ्या वर्गातील विद्यर्थानी उत्कृष्ट असे सादरीकरण करून लोकांची मने जिंकली तर त्यांचा नृत्याचा मनमुराद आनंद गावातील पालक वर्गानी लुटला व भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा दरवेकर यांनी केले. तर संचालन व आभार बाळू कस्तुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प इंग्लिश मिडीयम स्कुलचा सर्व सहायक शिक्षकांनी परिश्रम घेतले.