- · सहा मोटरसायकलींसह 15 लाखाचे स्पेअर पार्ट जळाले
रामटेक /तालुका प्रतिनिधी-

नगरसेवक सुमीत कोठारी यांनी रामटेक पोलीसांना लेखी माहीती दिली असून, रामटेक पोलीसांनी याबाबत नोंद घतली आहे व पुढील तपास सुरू असल्याचे रामटेकचे पोलीस निरीक्श क योगेश पारधी यांनी सांगीतले.
श हरात बस स्थानक भागात बजाज कंपनीच्या दुचाकी वाहनांची विक्री व सेवा असे स्वरूप् असलेले हे भव्य शोरूम आहे.नगरसेवक सुमीत कोठारी यांचे वडीलबंधू सुनील कोठारी हे या शोरूमचे संचालक आहेत.ही संपुर्ण ईमारत कोठारी यांची असून या ईमारतीत त्यांचे अनेक व्यावसायाीक प्रतिश्ठाने आहेत.दिनांक 23/02/2018 च्या रात्रीतून शोरूममध्ये शॅर्टसर्किटजे आग लागली असावी. आज दुकान उघडण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले असतांना ही घटना उजेडात आली.दुकानातील सहा नव्या मोटरसायकली,स्पेअर पार्ट्स व दुकानातील लॅपटाॅप,प्रिंटर,टि.व्ही.,फर्नीचर व अन्य महत्वाची कागदपत्रे आगीत सापडली व यात सुमारे 30-32 लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज सुमीत कोठारी यांनी वर्तविला आहे. रामटेक श हरांत अलिकडच्या काळांतील आग लागून नुकसान झाल्याची ही मोठी घटना आहे. सुदैवाने या घटनेत रात्रीची वेळ असल्याने कोणतीही प्राणहानी झाली नसल्याचे रामटेक पोलीसांनी सांगीतले.