वर्धा/नागपूर दि 26 फेब्रुवारी 2018
वर्धा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन 28 फेब्रुवारी, 2018 बुधवार, रोजी सकाळी10.00 वाजता खासदार श्री. रामदास तडस यांच्या हस्ते होणार आहे . हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र प्रधान डाकघर सिव्हिल लाईन्स, वर्धा येथे आहे.
या केंद्रात पासपोर्ट प्रक्रियेसंदर्भातील कामकाजाकरिता ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. वर्धा जिल्ह्यातील अर्जदारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांचे अर्ज www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदवून व पासपोर्टसाठी लागू असणारे शुल्क भरुन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 26 फेब्रुवारी 2018रोजी दुपारी 3 वाजतापासून सदर केंद्रासाठी नोंदणी सुरू झाली आहे.
वर्धा येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर अन्य पासपोर्ट एजेंटना प्रवेश मिळणार नाही. अर्जदारांना स्वतः पासपोर्ट प्रक्रियेसाठी हजर राहणे आवश्यक आहे. तत्काल आणि पी.सी.सी. (पोलिस क्लियरन्स सर्टिफिकेट)या संवर्गातील अर्ज सद्यस्थितीत केंद्रावर स्वीकारले जाणार नाहीत , अशी माहिती उप-पारपत्र अधिकारी, नागपूर यांनी दिली आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला असून याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही उप-पारपत्र अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.