राज्यसरकारच्या
कंत्राटी कामगारविरोधी धोरणाविरोधात राज्यभरातील कंत्राटी कामगारांमध्ये
संतापाची लाट पसरली असून आज दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन
केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढला.
सकाळी ११ वाजता जिल्हापरिषदेसमोर सर्व
कर्मचारी एकवटले होते. त्यानंन्तर १२ वाजता जिल्हापरिषदेपासून मोर्चा काढत
गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या
मोर्चात हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
राज्याच्या
विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात राज्यात ३ लाख १६ हजार
तर जिल्ह्यात २ हजारावर कर्मचारी आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
प्रकल्पात सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्या १५ वर्षांपासून हे
कर्मचारी शासकीय सेवेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.मात्र
अलीकडेच शासनाने कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीचा अटी
व शर्ती बाबत तसेच या पदावर निरुक्त कर्मचाऱ्यांचा सेवा नियमित न करण्याचे
परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक संपूर्ण कंत्राटी कामगारांवर अन्याय
करणारे असल्याचा आरोप करत विविध मागण्यांना घेऊन आज दोन हजार कंत्राटी
कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले तसेच जिल्हाभरातील १४ संघटनांनी मिळून
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो कंत्राटी
कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मोर्चतील एका शिष्टमंडळाने
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले