अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या सालबर्डी येथील नदीच्या हत्ती डोहात पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा करूण अंत झाल्याची घटना बुधवारी घडली आहे . १२ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या सालबर्डी महादेव यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भुयारात जातांना नदीच्या काठावर हत्ती डोह आहे. या डोहात पोहण्याची, उतरण्याची बंदी असून त्यासंदर्भात सुचनाफलक सुद्धा लावलेत. पण भाविक त्याकडे दुर्लक्ष करतात . या डोहात बुधवारी दोन तरुण पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन्ही तरुण बुडाले. त्यापैकी एका तरुणाचा मृत देह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून दुसऱ्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरू आहे . या दोन्ही युवकांची ओळख अद्याप पटलेली नसून आठनेर पोलीस त्यांची ओळख पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Thursday, February 15, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য