সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, February 23, 2018

चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरित करा

मंत्रालयाकडून धडकले आदेश 
नागपूर/ विशेष प्रतिनिधी:                                
चंद्रपूर येथे शंभर विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. व परिषदेच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाची माहिती द्यावी यासाठी मेडिकलची संलग्न 500 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालये देखील कार्यान्वित होणार आहे.
 यासाठी लागणारी जमीन तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने जारी केले आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालयाच्या सध्या चंद्रपूर येथे शंभर खाटांच्या क्षमतेचे स्त्री व नवजात शिशु रुग्णालय कार्यरत आहे. ही संपूर्ण जागा सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला हस्तांतरित करावी असा अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे. यासंदर्भात 24 डिसेंबर 2014 मध्ये आरोग्यसेवा वैद्यकीय शिक्षण विभागात सामंजस्य करारही झाला होता. त्याच्या मुदत 24 डिसेंबर 2017 संपुष्टात आली. त्यामुळे या कराराचे नूतनीकरण करून व स्त्री व नवजात शिशु रुग्णालयाची संपूर्ण जागा हस्तांतरित करावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या कराराच्या नूतनीकरण संदर्भातील प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पार पाडायची आहे. 
रुग्णालयाच्या इमारतीमधील पाच हजार चौरस फुटाची जागा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि पाच हजार चौरस फूट इतकी जागा औषध भांडारासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित कायम राहील. उर्वरित पुढील तीन वर्षांसाठी सामंजस्य करार पद्धतीने वैद्यक शिक्षण व संशोधन विभागाला हस्तांतरित करावी लागणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या वैद्यकीय महाविद्यालयात कराव्या लागणाऱ्या फेरबदलाची प्रक्रिया शासनास प्रस्ताव सादर केल्यानंतर होईल असेही या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर मेडिकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.