केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांद्वारे क्षतीग्रस्त पिकांची पाहणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारांसह अवकाळी वादळी पाऊस झाल्याने हजारो हेक्टरमधील रब्बीचा हंगाम उद्ध्वस्त झाला असून या नुकसानीचे तातडीने सव्र्हेक्षण करवून नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने घोषणा करून शेतक-यांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्राकडे आर्थिक मदतीकरिता प्रस्ताव तयार करावेत. केंद्र स्तरावरून मदत घेवून शेतक-यांच्या डोळîात उभे राहिलेले अश्रू पुसावेत अशी सुचना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना फॅक्स संदेशाद्वारे पत्र पाठवून केली आहे.
दि. 13 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी व मारेगांव तालुक्यातील काही गावांना भेट देवून अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाहणी केली, यावेळी वणीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, जि.प. सदस्य बंडू चांदेकर, निळकंठराव धांडे, रमन डोये, गजानन विधाते, राजू येले व घोन्सा शिवारातील शेतकरी बांधव उपस्थित होते. राज्य शासनाने या नुकसानीचे सव्र्हेक्षण करण्याचे निर्देश दिले असल्याने हे सव्र्हेक्षण काटेकोरपणे करून शेतकÚयांना नुकसानीच्या पाश्र्वभुमीवर अधिकाधीक आर्थिक भरपाई मिळेल या अनुषंगाने सव्र्हेक्षण व्हावे अशी अपेक्षा ना. अहीर यांनी या पाहणी दौर्याप्रसंगी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी पावसाच्या तसेच गारपीटीच्या प्रभावामुळे गहू, हरभरा, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला तसेच अन्य रब्बी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या शेतकÚयाला तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याने मुख्यमंत्रयांनी पुढाकार घेत नुकसानग्रस्त शेतकÚयांसाठी मदतीची घोषणा करावी अशी सुचना ना. अहीर यांनी या पत्रातून केली आहे. आ.
12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारांमुळे चंद्रपूर जिल्हयात वरोरा, भद्रावती, राजुरा या तालुक्यातील शेतकÚयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गहू, हरभरा, तूर ही पिके पावसाने जमिनदोस्त केली आहेत. भद्रावती तालुक्यात प्रथमदर्शनी पाहणीनुसार सुमारे 52 गावातील शेतकÚयांना वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राजुरा तालुक्यातील मारडी व धिडसी येथेही शेतकÚयांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहणी अहवालानूसार निदर्शनास आले.
वरोरा तालुक्यामध्ये चरूरखटी एकोणा, माढेळी, चिकणी या गावांसह अन्य 30 गावातील रब्बी पिकांना फटका बसलेला आहे. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा ब्लाॅकमध्ये 12 गावांना गारांचा तडाखा बसल्याने रब्बीचे पिक मातीमोल झाल्याची प्रथमदर्शनी माहिती ना. हंसराज अहीर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्रयांना अवगत केली आहे. खरीप हंगामात अपुÚया पावसाअभावी नापीकीच्या झळा सोसत असलेल्या जिल्हîातील शेतकÚयांना रब्बी पिकांमुळे अर्थप्राप्तीची अपेक्षा असतांनाच नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बीचा हंगामही हातातून गेल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला असल्याने या शेतकÚयांना आर्थिक मदतीशिवाय, नुकसान भरपाईशिवाय अन्य पर्याय नसल्याने मुख्यमंत्री महोदयांनी शेतकÚयांना न्याय देण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा. केंद्राकडे अवकाळी पाऊसग्रस्त शेतकÚयांसाठी मदत देण्याकरिता प्रस्ताव सादर करावा. केंद्र सरकार राज्यातील शेतकÚयांना मदतीचा हात निश्चितपणे देईल असा विश्वास व्यक्त करून आपण यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करू असेही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचीसुध्दा ना.अहीर महसुल विभागाच्या अधिका-यांसोबत पाहणी करणार आहेत.