সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 17, 2018

पर्यायी बाजारपेठेसाठी मेट्रोचा पुढाकार

खोवा आणि पान विक्रेत्यांना मोठा दिलासा”

नागपूर १७ : : नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महा मेट्रो नागपूरने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. संत्रा मार्केट परिसरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य होऊ घातल्याने तेथील खोवा आणि पान विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. संत्रा मार्केट परिसरात मेट्रोचे काम होऊ घातल्याने तेथील विक्रेत्यांची गरज लक्षात घेता हा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. यासाठी नागपूर महानगर पालिकेने जवळच असलेल्या हिंदी भाषा शाळेच्या परिसरात जागेची व्यवस्था केल्याने महा मेट्रोने तेथे बांधकामाला सुरवात केली. बांधकामाची सुरवात गेल्यावर्षी १ सप्टेंबरला झाली होती. १५५० चौ.मी. क्षेत्रफळ इतक्या जागेत एकूण १०२ दुकाने आणि ९ गोदामाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच खोवा आणि पान विक्रेत्यांची गरज लक्षात घेता १ हजार लिटर क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम देखील याठिकाणी पूर्ण झाले आहे. सोबतच पुरुष आणि महिला व्यवसायिकांकरिता स्वछता गृहाचे निर्माण केले. वाहनतळ,गाड्यांकरिता वीज पुरवठा, आणि सुरक्षा भिंती सारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या गाळ्यांचे रीतसर उदघाटन करण्यासाठी आज शनिवारी व्यापारी संघटनेतर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दुकानांचे उदघाटन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि नागपूर शहराचे महापौर सौ. नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. महा मेट्रो तर्फे प्रकल्प संचालक महेश कुमार तर महानगर पालिकेतर्फे माजी महापौर प्रवीण दटके, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यावेळी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.