সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 17, 2018

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या चमूची नेत्रादीपक कामगिरी

..अखिल भारतीय संस्कृतछात्राप्रातिभ समारोह..
रामटेक/प्रतिनिधी: 
तिरुपती स्थित राष्टिंय संस्कृत विद्यापीठाद्वारे अखिल भारतीय संस्कृतछात्राप्रातिभ  समारोहाचे आयोजन दि. 31 जानेवरी 2018 ते 03 फेब्रुवरी 2018 या दरम्यान करण्यात आले  होते. या  राष्ट्रस्तरीय स्पर्धांमध्ये 10 शास्त्रार्थ स्पर्धा, 05 सांस्कृतिक स्पर्धा व अन्त्याक्षरी,  समस्यापूर्ति, रसप्रश्न स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या विकासात प्राचीन  शास्त्रापरंपरेचे अन्यन्यसाधारण स्थान आहे. या शास्त्रापरंपरेचे जतन करण्यासाठी व संस्कृत
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षिक व सांस्कृतिक कौशल्याच्या विकासासाठी कटिबद्ध राष्ट्रीय संस्कृत  विद्यापीठाद्वारे या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 
शास्त्रा अध्ययनासह  शास्त्राभाषण इ. पारंपरिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे व त्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी निरंतर परिश्रम घेतात. याचेच फळ नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय संस्कृतछात्राप्रातिभ  समारोहात संस्कृत शास्त्र स्पर्धेच्या निमित्ताने समाजापुढे आले. या शास्त्राीय व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विश्वविद्यालयाच्या 12 विद्यार्थ्यांनी सहभाग तर नोंदविलाच पण आपल्या  शास्त्राज्ञानाच्या बळावर व प्रतिभाशक्तीच्या जोरावर या राष्ट्रस्तरीय  स्पर्धांमध्ये क्रमांक  पटकावून नेत्रादीपक कामगिरी केली या विविध स्पर्धांपैकी प्राविधिक स्पर्धेमध्ये श्रीवरदा माळगे यानी द्वितीय पुरस्कार,  एकपात्राभिनय स्पर्धेमध्ये गौरी सोनटक्के यानी द्वितीय पुरस्कार व लोकनृत्य स्पर्धेमध्ये श्रीवरदा माळगे, वृशाली दाणी, प्रज्ञा करकरे, दिव्याणी अनमोलवार, नयना भारसाकळे, परीक्षित झोडेकर, अनुज शर्मा, देवेश्वर आर्वीकर यांनी द्वितीय पुरस्कार प्राप्त केला.  तर वेदभाषण मध्ये रूपेश रुद्रकार, यानी सांत्वना पुरस्कार,सदर अखिल भारतीय संस्कृत छात्राप्रातिभ समारोहाचा समारोप समारोह दिनांक 03.02.2018 राष्टिंय संस्कृत विद्यापीठाच्या  एस्.बी.आर् मुक्ताकाश सभागृहात झाला होता. 
समारोप कार्यक्रमाचे मुख्यातिथी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी, अध्यक्ष राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे मा. कुलगुरु आचार्य मुरलीधर शर्मा व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना पदक पारितोषिके आणि प्रमाणपत्रा देऊन अभिनंदन करण्यात आले. विविध स्पर्धामध्ये विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने प्रस्तुतीकरण केले. विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी ‘‘शास्त्राजतनात युवापिढींचे योगदान आता काळाची गरज आहे व त्यांनी या स्पर्धेतील प्रावीण्याद्वारे आपण आपल्या शास्त्रानिष्ठा सिद्ध करून विश्वविद्यालयाला गौरव प्राप्त करून दिला’’ या शब्दांद्वारे
विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. अरविंद जोशी आणि सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी यांनी विजयी चमूचे अभिनंदन केले. डॉ. शिवराम भट्ट व प्रा.डॉ. नन्दा पुरी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली ही चमू या स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती.








শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.