সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 19, 2018

अपघातग्रस्ताला मदत करून आशिषने घडविले माणुसकीचे दर्शन

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
 ड्युटी आटोपून घरी जात असतांना ब्रेकरवरून गाडी स्लीप होऊन जोरदार घासत जाऊन महाऔष्णिक वीज केंद्राच्या पुलावर रविवारी महाऔष्णिक वीज केंद्रात ज्युनियर ऑपरेटर म्हणून कार्यरत असेल्या रवींद्र दिलीप खाडिलकर गंभीर जखमी झाला.
रविवारी दुपारच्या 2.30 वाजताच्या सुमारास रवींद्र दिलीप खाडिलकर हा आपल्या घरी MH ३४ AR 9735   या आपल्या दुचाकीने जात होता ,रवींद्र हा भानापेठ वार्ड येथील रहिवासी आहे. ड्युटी आटोपून घरी जात असतांना  त्याची गाडी ब्रेकरवरून स्लीप झाली आणि तो जोरदार घासत गेला. यात तो बेशुद्ध झाला व गंभीर जखमी झाला. मात्र पुलावरून ये-जा करणाऱ्या लोकांपैकी रवींद्रला उचलायची हिम्मत कोणीच केली नाही,मात्र मागून येणाऱ्या आशिष पोहाणे या युवकाने आपली गाडी बाजूला घेत रवींद्रला उचलत तत्काळ ऍम्ब्युलन्सला फोन लावला. व एका गरजू रुग्णाला तत्काळ मदत करीत स्वतातल्या माणुसकीचे दर्शन
बघ्यांची भूमिका घेणाऱ्या ईतर लोकांना दाखवीले. आशिषचा रविंद्रला रुग्णालयात दाखल करायचा खटाटोप सुरु असतांना घटनास्थळावरून एक पोलीस वाहन जाते. ज्यात दोन पोलीस कर्मचारी बसले असतात . आशिषला पोलिसांचे वाहन दिसतातच मदतीसाठी आशिषने या पोलीस वाहनाला हात दाखविला मात्र याकडे दुर्लक्ष करीत ते पोलीस वाहन थेट निघून गेले,पोलिसांच्या या कृत्यामुळे घटनास्थळी पोलिसांबद्दल उलटसुलट चर्चा सुरु होत्या,त्यामुळे पोलिसात थोडीशीही माणुसकी शिल्लक नाही का? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो. 

आशिषच्या समयसूचकतेने व त्याच्या तत्परतेने जखमी रवींद्रला तत्काळ उपचार मिळाला त्यामुळे रवींद्र शुद्धीवर येताच त्याला संपूर्ण प्रकार समजला व त्याने आशीषचे धन्यवाद मानले.या संपूर्ण प्रकरना नंतर पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांच्या अश्यावागन्यामुळे सर्वसामान्यांचा पोलिसाकडे बघण्याचा दृष्टीकोन  नक्कीच बदलला आहे हे मात्र नक्की.






শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.