সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 28, 2018

जिल्हा क्रीडा भारती चंद्रपूर तर्फे आयर्नमॅन डॉ.विश्वास झाडे यांचा सत्कार

चंद्रपूर:ललित लांजेवार 
कोलंबो (श्रीलंका) येथे रविवार २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत डॉ. विश्वास झाडे यांनी विक्रम करत आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे. हा बहुमान पटकविणारे डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुर जिल्ह्यातील प्रथमच स्पर्धक ठरले आहे.या ट्रायथलॉन या स्पर्धेसाठी विदर्भातून चंद्रपूर येथील डॉ. विश्वास झाडे आणि नागपूरचे डॉ.अमित समर्थ यांनी भाग घेतला होता. हे दोघेही या स्पर्धेसाठी श्रीलंका येथे गेले होते.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल सोमवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडा भारती व जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयर्नमॅन डॉ. विश्वास झाडे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी क्रीडा भारतीचे जिल्हा प्रमुख डॉ.योगेश सालफळे,शहर प्रमुख डॉ.पंत,जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे,उपस्थित होते.
या स्पर्धेत २ किलोमीटर पोहणे यास वेळ १ तास , 90 किलोमीटर  सायकलीग ४ तास, 21 किलोमीटर धावणे ३ तास असा वेळ घेत हि स्पर्धा डॉ. विश्वास झाडे यांनी पूर्ण केली, या स्पर्धेचे वेळ ८ तास ३० मिनिटे  ठरविण्यात आले होते. तसेच डाँ विश्वास झाडे यांनी सदर स्पर्धा ८ तासातच पुर्ण केली. व आयर्नमॅन हा बहुमान पटकाविला आहे.
या सत्कार कार्यक्रमात पोलीस भरतीतील व जिल्ह्यातील सर्व खेळाळूनसाठी मोफत वैद्यकीय मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ.सालफळे म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना समोर आणण्यासाठी अनेक अडचणी येतात,या संपूर्ण अडचणी सोडविण्यास क्रीडा भारती चंद्रपूर विभाग नेहमी तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्तेक खेळाडूंना  कोणत्याही वैद्यकीय अडचणी असतील तर क्रीडा भारती व शहरातील तद्य डॉक्टरांकडून माफक दारात उपचार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या माफक उपचाराने खेळाडुंची चिंता कमी होणार  असून यातून आपल्याला चांगले खेडाळू निर्माण करण्यास मदत होणार आहे.

यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा भारतीचे सदस्य व्हावे असे आव्हाहन देखील केले.या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलन येथे रबरी सिंथेटीक ट्रॅकची देखील लवकरात लवकर भर पडणार असून असा प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.अशी माहिती दिली.यावेळी सत्कार समारंभासाठी चंद्रपूर शहरातील तद्य डॉ. रवी आलूरवार,डॉ.हर्ष मामिडवार,डॉ.उमेश अग्रवाल,डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.गुरुराज कुलकर्णी,डॉ.अनुराधा सालफळे क्रीडा भारती नागपूरचे कुंभारे सर,हेमंत घीवे,प्रकाश सुर्वे,मकरंद खाडे,प्रवीण चवरे,क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर,रोषण भुजाडे,अॅथलेटीक असोशिएशन चंद्रपूरचे सचिव सुरेश अडपेवार संदीप वझे, यासह अनेक खेळाडू विद्यार्थी विध्यार्थिनी उपस्थित होते.
ट्रायथलॉन म्हणजे काय? 
ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं. कोलंबो येथे आयोजित  ट्रायथलॉन स्पर्धेत २ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर धावण्याचा समावेश होता.‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन स्पर्धा ८.३० तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं.
कोण आहेत विश्वास झाडे
डॉ. विश्वास झाडे हे चंद्रपुरातील प्रसिद्ध ह्दयरोग तद्य असून मागिल २ वर्षापासून चंद्रपुर शहरातील विविध भागात ते रियाजासाठी जातात शहरातील जमनजट्टी तलाव परिसर , जिल्हा स्टेडिअम , सायकलने जाम पर्यतचा प्रवास तर धावण्याकरिता बल्लारशाह रोड व नागपुर रोड वर दूरपर्यंत नेहमी सराव करायचे तसेच व्यायाम करीत जिममध्ये सुध्दा जाणे असा नित्यक्रम त्यांचा होता. पहाटे सकाळीच ५ वा. सुरूवात करुन रात्री सर्व रुग्ण तेवढ्याच नम्रपणे हसुन - समजावून तपासण्याचे काम करणारे अतिशय जिद्द बाळगुण मनातला ध्यास पुर्णत्वास नेण्याचे काम करणारे डॉ.विश्वास झाडे  यांनी केला यांच्या भरिव कामगिरी बद्दल त्यांच्या या विक्रमसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.डॉ.विश्वास झाडे यांनी केलेल्या भरिव कामगिरी बद्दल काव्यशिल्पचाचा सलाम... 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.