সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 20, 2018

प्रवाशांची चांगलीच गोची

नागपूर : बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर महापालिकेची शहर बससेवा ठप्प पडली आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली होती.
नागपूर महापालिकेद्वारे शहर बससेवा संचालित करण्यात येत आहे. शहरात दररोज ३५० च्यावर बसेस धावतात. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर, कन्हान, वाडी, चौदा मैल, खापरखेडा, पारडी, नरसाळा, पिपळा असा शहरापासून जवळपास ३० किलोमीटरचा प्रवास करतात. शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसचा प्रवास करतात. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. बससेवेपासून महापालिकेला दररोज १८ ते २० लाखाचा महसूल मिळतो. ही बससेवा जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना तीन हजार ते नऊ हजार दरम्यान वेतन देण्यात येते. या तोकड्या मानधनावर काम करणे अशक्य असल्याने, भारतीय कामगार सेनेच्या निर्देशानुसार ऐन परीक्षेच्या तोंडावर संप पुकारला आहे. बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरने सर्व बसेस डेपोत सोडून पटवर्धन मैदानाजवळ आंदोलन सुरू केले आहे. महापालिका जोपर्यंत १८,३९८ रुपये किमान वेतन देत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र संपामुळे मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात, आयटीआयमध्ये येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना बसच्या संपामुळे सुटी मारावी लागली. काही मुले मित्रांच्या वाहनांवर आली. परत जातांना त्यांना त्रास झाला. शहरातील ‘आपली बस’च्या अनेक थांब्यावर शुकशुकाट दिसला. बसच्या डेपो परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. बाहेरगावाहून आलेले प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते. बसच्या संपामुळे आॅटोचालकांनी प्रवासी दर वाढविले होते. कळमेश्वर, वाडी, बुटीबोरीला जाणारे प्रवासी एसटी महामंडळाच्या बसची मोरभवन बसस्थानकावर वाट बघत होते. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे दिवस आहेत. अशा वेळी तरी प्रवासी वाहतूक बंद नसावी, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.